Skip to main content

हार्लेम, न्यूयॉर्कमधील पॉप-अप रेस्टॉरंट्स

कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सना हिवाळ्यातील महिन्यांमध्ये त्यांचे काम चालू ठेवण्यासाठी मदत करत आहोत.

कृष्णवर्णीयांच्या मालकीची रेस्टॉरंट्स कोविड-19 मुळे प्रमाणापेक्षा जास्त प्रभावित झाली होती. कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्स आणि व्यवसायांना 2020 च्या हिवाळ्यादरम्यान त्यांचे काम चालू ठेवण्यात मदत व्हावी म्हणून आम्ही हार्लेम, न्यू यॉर्क, यूएसच्या ऐतिहासिक परिसरात खुल्या वातावरणातील डायनिंग अनुभव देण्यासाठी व्हॅलिंक पीआरच्या व्हॅलेरी विल्सन, हार्लेम पार्क टू पार्क च्या निकोआ इव्हान्स-हेंड्रिक्स आणि ईटओक्रा यांच्याशी सहयोग केला. स्ट्रायव्हर्स रो येथील रेनेझाँ पॅव्हिलियन येथील जागेत एक सुरक्षित, उबदार आणि लोकांना एकत्र बाहेर बसून भेटण्याची सुविधा देऊन तिथे 6 स्वतंत्र रेस्टॉरंट्सना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी सहाय्य केले.

नवीन ग्राहकांना आपले लाजवाब खाद्यपदार्थ पेश करणाऱ्या पॉप-अप्स आणि रेस्टॉरंट अनुभवांना मदत करून आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या उपस्थितीला प्रोत्साहन देत आहोत आणि त्यांची भरभराट होण्यात मदत होईल अशा पद्धतीने त्यांना सतत सहाय्य मिळेल याची खातरजमा करत आहोत.

2020 च्या उन्हाळ्यातील हार्लेम ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर या म्युरलवर काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या 6 कलाकारांपैकी एकाच्या कलाकृतीची येथील प्रत्येक विभागाला जोड देण्यात आली होती. या रेस्टॉरंट्स आणि व्यवसायांसाठी आरामशीर डाइन-इन व्यवस्थेसाठी हीटर्स आणि भरपूर खेळत्या हवेची सुविधा पुरवण्यात आली होती.

या अत्यंत आव्हानात्मक काळात त्यांना मिळालेल्या या जागेमुळे त्यांचे व्यवसाय टिकून राहण्यात कशी मदत झाली हे या रेस्टॉरंट्सच्या मालकांनी स्पष्ट करून सांगितले. “लहान व्यवसायांना मदत करण्यासाठी धोरणे आणि उपाय योजण्यासाठी कॉर्पोरेशन्स आणि समुदाय कसे एकत्र काम करू शकतात याचा Uber Eats ने खरोखरच एक मानदंड स्थापित केला आहे,” रूबीज विंटेजचे सह-मालक ब्रायन वॉशिंग्टन-पामर म्हणाले. “कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सवर केंद्रित असलेल्या या राष्ट्रीय उपक्रमातून Uber Eats ला ते सेवा देत असलेल्या समुदायांच्या गरजा आणि महामारीचा विशेषतः कृष्णवर्णीय समुदायावर पडलेला प्रभाव यांच्याबद्दल किती अचूक जाणीव आहे हे दिसून येते.”

हार्लेममध्ये आम्ही सहाय्य करत असलेल्या उत्कृष्ट रेस्टॉरंट्सना भेट द्या.

आमच्या प्रभाव कार्याबद्दल अधिक वाचा

सर्वांसाठी हालचाल समान करत आहोत.

कृष्णवर्णीयांच्या व्यवसायांना जगभरात सहाय्य करत आहोत.

कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सना त्यांचा व्यवसाय नव्या परिसरांमध्ये विस्तारित करण्यास सक्षम करत आहोत.