Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

कृष्णवर्णीयांचे व्यवसाय महत्त्वाचे आहेत

कृष्णवर्णीयांच्या व्यवसायांना जगभरात सहाय्य करत आहोत.

ब्लॅक बिझनेसेस मॅटर मॅचिंग फंड या माध्यमातून कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सना मदत करण्यासाठी Uber ने मार्कस सॅम्युएलसन या पारितोषिकप्राप्त शेफ, रेस्टॉरंट मालक, लेखक आणि अन्न कार्यकर्त्याशी सहयोग केला आहे. हा निधी कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या, महामारीमुळे आणि ऐतिहासिकदृष्ट्या अल्प-भांडवलामुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालेल्या रेस्टॉरंट्सना अनुदान आणि सहाय्य देतो.

आम्ही सॅम्युएलसन आणि 4 उत्कृष्ट शेफ्स आणि रेस्टॉरंट मालकांच्या सहयोगाने तयार केलेल्या नव्या डिजिटल एपिसोड मालिकेसह कृष्णवर्णीयांच्या खाद्यपदार्थांचा सामर्थ्यवान इतिहास आणि सर्जनशीलता साजरी करायलासुद्धा उत्सुक आहोत: नीना कॉम्पटन, क्वेम ओनवुआची, रॉडनी स्कॉट आणि लेटिसिया स्काय यंग. आम्हाला आशा आहे की हा चित्रपट केवळ विचारपूर्वक खाण्यालाच प्रेरणा देणार नाही तर लोकांना कृष्णवर्णीय रेस्टॉरंटच्या मालकांकडून आजवर न सांगितलेल्या कित्येक कथासुद्धा ऐकायला मिळतील.

Uber Eats ॲपवर इतरत्र, अमेरिकेतील ब्लॅक रेस्टॉरंट वीकसारख्या उपक्रमांमुळे कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या व्यवसायांना Uber Eats फीडच्या सर्वोच्च स्थानी पोहचण्यास मदत झाली, त्यामुळे स्थानिकांना त्यांच्या आसपासच्या भागातील खाण्यापिण्याच्या नव्या ठिकाणांचा शोध लागला. युकेमध्ये, आम्ही या समुदायांना चांगल्याप्रकारे सहाय्य कसे पुरवू शकतो हे ओळखण्यासाठी कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक रेस्टॉरंट मालकांच्या थेट अनुभवाबद्दल 'बी इनक्लुझिव्ह हॉस्पिटॅलिटी'सह आम्ही काही संशोधन पूर्ण केले आहे.

कॅनडामध्ये, Uber ने कॅनेडियन ब्लॅक चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर भागीदारी करून ब्लॅक पेजेस सुरू केली आहेत — ही देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या असलेल्या छोट्या व्यवसायांसाठीची पहिली राष्ट्रीय डिजिटल डिरेक्टरी आहे. ब्लॅक पेजेसमध्ये सामील होणे विनामूल्य आहे आणि ती पाहणे विनामूल्य आहे, त्यामुळे कृष्णवर्णीयांच्या मालकीची रेस्टॉरंट्स, किरकोळ दुकाने, विक्रेते आणि उद्योजक सहज शोधायला आणि त्यांना सहाय्य करायला उपयुक्त ठरेल असा एक नवीन ऑनलाइन स्रोत कॅनडातील लोकांकडे असेल, हे सुनिश्चित झाले आहे.

हे सर्व उपक्रम म्हणजे अमेरिकेमध्ये आणि जगभरात कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सना प्रकाशात आणण्याच्या दीर्घकालीन वचनबद्धतेची केवळ एक सुरुवात आहे. आम्ही या व्यवसायांना सहाय्य करण्यासाठी, त्यांना महामारीच्या परिणामातून बाहेर पडून पूर्ववत होण्यासाठी, वांशिक समानता तयार करण्यासाठी आणि अधिक सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी मदत करण्याकरता नवीन शहरांकडे वाटचाल करणार आहोत.

कृष्णवर्णीयांच्या व्यवसायांना सहाय्य करण्याच्या आमच्या कार्याबद्दल तुम्ही येथे

अधिक वाचू शकता.

आमच्या प्रभाव कार्याबद्दल अधिक वाचा

आमच्या वचनबद्धता

सर्वांसाठी हालचाल समान करत आहोत.

वॉशिंग्टन, डीसीमधील पॉप-अप रेस्टॉरंट्स

कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सना त्यांचा व्यवसाय नव्या परिसरांमध्ये विस्तारित करण्यास सक्षम करत आहोत.

सर्व ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींचे‍ आभार

महामारीदरम्यान हजारो ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्ती जे काही महत्त्वाचे आहे त्याची वाहतूक करत राहिले.