सुरक्षेबद्दल आमची वचनबद्धता
तुम्हाला मोकळेपणाने फिरता यावे, तुमच्या वेळेचा सदुपयोग करता यावा आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांशी आणि स्थळांशी तुम्हाला कनेक्टेड राहता यावे हीच आमची इच्छा आहे. म्हणूनच चुकीचे प्रसंग कमी करण्याच्या उद्देशाने, आम्ही नवीन स्टॅंडर्ड्स तयार करण्यापासून ते तंत्रज्ञान विकसित करण्यापर्यंत सर्व उपायांद्वारे सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत.
कोविड-19 दरम्यान एकमेकांना सुरक्षित ठेवण्यात मदत करत आहोत
आम्ही कोरोना व्हायरस (कोविड-19) च्या परिस्थितीचे सक्रियपणे निरीक्षण करत आहोत आणि जे आमच्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहेत त्यांना निरोगी व सुरक्षित ठेवण्यासाठी सतत कार्यरत आहोत.
आमचे नवीन सुरुवात ते शेवट सुरक्षा स्टॅंडर्ड
आमचे समुदाय पुन्हा हालचाल करू लागले असल्याने तुम्हाला Uber सोबत राईड घेताना सुरक्षित वाटावे अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही आमचे नवीन सुरुवात ते शेवट सुरक्षा स्टॅंडर्ड सादर करत आहोत. Uber च्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे समर्थित असलेल्या, सामायिक जबाबदारीला प्रोत्साहित करणार्या आणि आरोग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळालेल्या या नवीन उपाययोजना आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणार्या प्रत्येकाच्या आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.
यामध्ये एकत्र
सर्व रायडर्स आणि ड्रायव्हर्सना चेहर्यावरील आवरण किंवा मास्क घालणे आवश्यक आहे.
चेहर्यावरील आवरणाची तपासणी
आम्ही ड्रायव्हर्सना गाडी चालवण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्या स्वतःचा फोटो घेण्यास सांगतो आणि आमचे तंत्रज्ञान त्यांनी चेहर्यावरील आवरण लावले आहे का याची पडताळणी करण्यात मदत करते.
ड्रायव्हर्ससाठी आरोग्य आणि सुरक्षेचे पुरवठे
आम्ही ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी करणाऱ्या लोकांना चेहर्यावरील आवरणे, जंतुनाशके आणि खाणे डिलिव्हर करण्यासाठी हातमोजे यांसारख्या आरोग्य आणि सुरक्षेच्या वस्तू पुरवण्यासाठी काम करत आहोत.
तज्ज्ञांंच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन
आम्ही सुरक्षिततेच्या टिप्स आणि संसाधने शेअर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) सह काम करत आहोत.
राईड सुरक्षिततेसंबंधित अभिप्राय
आता तुम्ही ड्रायव्हरने चेहर्यावरील आवरण किंवा मास्क घातलेला नाही, यांसारख्या आरोग्य संबंधित मुद्द्यांविषयी अभिप्राय देऊ शकाल. यामुळे आम्हाला सुधारणा करण्यात मदत होते आणि प्रत्येकाला जबाबदार धरता येते.
तुमच्या अनुभवासोबतच सुरक्षा कशी अंतर्भूत केली जाते
ॲपमधील सुरक्षा वैशिष्ट्ये
तुमच्या ट्रिपचे तपशील तुमच्या जवळच्या माणसांसोबत शेअर करा. राईड दरम्यान तुमच्या ट्रिपवर नजर ठेवा. आमच्या तंत्रज्ञानामुळे तुम्ही शांत मनाने प्रवास करू शकता.
एकीकृत समुदाय
लाखो राइडर्स आणि ड्राइवर्स समुदाय मार्गदर्शकतत्त्वांचा एक संच आपसात शेअर करतात व त्याद्वारे योग्य कृती करण्यासाठी एकमेकांना जबाबदार राहतात.
प्रत्येक गोष्टीत सहाय्य
एक खास प्रशिक्षित टीम 24/7 उपलब्ध आहे. ॲपमधून दिवसा आणि रात्री कधीही, कोणत्याही प्रश्नासाठी किंवा सुरक्षा संबंधी चिंतेसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचा.
प्रत्येकासाठी अधिक सुरक्षित प्रवास उपलब्ध करणे
ड्रायव्हर सुरक्षितता
कोणत्याही प्रश्नासाठी किंवा सुरक्षा संबंधी प्रश्नांसाठी 24/7 सहाय्यावर विसंबून रहा. तुमची ट्रिप तुमच्या जवळच्या माणसांसोबत शेअर करा. आमचे लक्ष्य तुमची सुरक्षा हे आहे, जेणेकरून तुम्ही संधी मिळेल तिथे जाऊ शकता.
रायडर सुरक्षा
दररोज लाखो राइडची विनंती केली जाते. प्रत्येक रायडरला ॲपमध्ये असणाऱ्या सुरक्षा वैशिष्ट्याचा अॅक्सेस असतो. आणि तुम्हाला गरज पडल्यास, प्रत्येक राइडसाठी एक सहाय्यक टीम असते.
“आमच्या तंत्रज्ञानाद्वारे दररोज जगभरातील शहरांमध्ये लाखो लोकांना एकत्रितपणे कारमध्ये बसवले जाते. लोकांना सुरक्षित राहण्यात मदत करणे ही एक मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही ती गंभीरपणे घेतो.”
दारा खोस्रोवशाही, Uber सीईओ
बदल घडवण्यासाठी भागीदारी करणे
सुरक्षेप्रती असलेली आमची बांधीलकी फक्त तुमच्या राईडपुरता मर्यादित नाही. आम्ही सर्वांसाठी रस्ते आणि शहरे सुरक्षित राखण्यासाठी आघाडीच्या तज्ञांसोबत एकत्र येऊन काम करतो आहोत. त्यांच्यात सार्वजनिक सुरक्षा अधिकाऱ्यांपासून ते हिंसा-विरोधी संस्थांपर्यंत अनेकांचा समावेश आहे.
काही आवश्यकता आणि वैशिष्ट्ये प्रदेशानुसार बदलतात आणि कदाचित उपलब्ध नसतील.