Uber वापरुन अॅक्सेसिबीलिटी
आमच्या तंत्रज्ञानाने आणि ड्रायव्हर्सनी प्रदान केलेल्या वाहतुकीने बर्याच दिव्यांग लोकांच्या चलनवलनामध्ये बदल घडवून आणला आहे आणि आम्ही असे तंत्रज्ञाने विकसित करणे सुरू ठेवण्यास वचनबद्ध आहोत जी प्रत्येकाच्या समुदायात सहजपणे फिरण्याच्या क्षमतेला मदत करतात.
दिव्यांग रायडर्स
अशा वैशिष्ट्यांसह आणि क्षमतांसह Uberचे तंत्रज्ञान दिव्यांग रायडर्सची गतिशीलता आणि स्वातंत्र्य वाढविण्यात मदत करीत आहे:
कॅशलेस पेमेंट्स
Uber चा कॅशलेस पेमेंट पर्याय पेमेंट प्रक्रिया सुलभ करतो, रायडर्सना ड्रायव्हरकडून मिळालेली रोख रक्कम मोजणे किंवा नोटांची देवाणघेवाण करणे याची चिंता करावी लागत नाही.
मागणीनुसार वाहतूक
Uber अॅप दिव्यांग रायडर्ससाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सोपे करून टाकते, अगदी एका बटणाच्या स्पर्शाने. आता त्यांना एखाद्या प्रेषकाद्वारे राइड्सची सोय करावी लागणार नाही किंवा राइड शोधण्यासाठी इतर, कमी सोयीस्कर साधने वापरावी लागणार नाहीत.
आगाऊ भाडे
रायडर्सना त्यांनी प्रवासाची विनंती करण्यापूर्वी त्यांच्या प्रवासाची किंमत कळवण्यासाठी Uber आगाऊ भाडे पध्दत वापरते. यामुळे त्यांना मानसिक शांती मिळते आणि फसवणुकीचे धोके दूर करण्यात मदत होते.
भेदभावविरोधी धोरणे
रायडरने केलेली प्रत्येक ट्रिप विनंती Uber अॅपद्वारे जवळपासच्या ड्रायव्हरशी आपोआप जुळविली जाते, यामुळे विश्वासार्ह, परवडणारी वाहतूक मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या बेकायदेशीर भेदभावाच्या शक्यता कमी होतात.
सेवा देणाऱ्या प्राण्यांविषयी धोरण
अंध किंवा दृष्टी कमी असणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या प्राण्यांसह प्रवास करणार्या रायडर्ससाठी Uber ची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आणि सेवा देणाऱ्या प्राण्यांविषयी धोरण यांच्या अंतर्गत ड्रायव्हर्सने सेवा देणाऱ्या प्राण्यांच्या वाहतुकीसंदर्भात सर्व लागू कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
तुमची अंदाजे आगमन वेळ आणि ठिकाण शेअर करा
अतिरिक्त मनःशांतीसाठी रायडर्स त्यांच्या प्रवासाचा तपशील, विशिष्ट मार्गासह आणि पोहोचण्याच्या अंदाजे वेळेसह त्यांच्या प्रियजनांसोबत सहज शेअर करू शकतात. मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना एक लिंक मिळेल ज्यामध्ये त्यांना ड्रायव्हरचे नाव, फोटो आणि वाहनाची माहिती मिळेल आणि रायडर आपल्या अंतिम ठिकाणी पोहोचेपर्यंत प्रत्यक्ष त्यावेळी नकाशावर कोठे आहे, हे ते ट्रॅक करू शकतील - हे सर्व काही Uber अॅप डाउनलोड न करता.
हालचाली करण्यामध्ये अक्षम असलेले दिव्यांग रायडर्स
डब्ल्यूएव्ही (व्हीलचेअर-अॅक्सेसिबल वाहने) यांसह, हालचाली करण्यामध्ये अक्षम अशा दिव्यांग रायडर्ससाठी वाहतूक अधिक सुलभ आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत.
सुसज्ज वाहने
जे रायडर्स फोल्ड न होणार्या मोटरचलित व्हीलचेअर्स वापरतात त्यांना, रॅम्प्स किंवा लिफ्ट्सने सुसज्ज असे व्हीलचेअरला प्रवेश करण्यायोग्य वाहन असलेल्या ड्रायव्हर्सच्या संपर्कात आणून देण्याचे काम Uberच्या डब्ल्यूएव्हीद्वारे केले जाते.
जगभरात उपलब्ध
कोणते व्हीलचेअर-अॅक्सेसिबल वाहनांचे पर्याय रायडर्स आणि ड्रायव्हर्स यांच्या गरजांसाठी योग्य आहेत ठरवण्यासाठी आम्ही जगभरातील शहरांमध्ये (बंगलोर, बोस्टन, शिकागो, लंडन, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, टोरंटो आणि वॉशिंग्टन डी.सी.) अनेक डब्ल्यूएव्ही मॉडेल्स वापरत आहोत.
“[डब्ल्यूएव्ही] लॉन्च करून, Uber व्हीलचेअर-अॅक्सेसिबल वाहनांची आवश्यकता असलेल्या लोकांना अगदी एका बटणाच्या स्पर्शाने मागणीनुसार राइडची विनंती करण्याची संधी देत आहे. दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याचे काम करणारी एक संस्था म्हणून, व्हीलचेअर-अॅक्सेसिबल वाहने हवीत अशी इच्छा असलेल्या आपल्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देण्याबद्दल मी Uberचे कौतुक करतो."
एरिक लिप, कार्यकारी संचालक, ओपन डोअर्स संघटना
“जगभरात फिरणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी UberX हा गेम चेंजर आहे आणि ग्राहकांसाठी अधिकाधिक पर्याय आणि संधी उपलब्ध करुन देण्यासाठी Uberने तीच सर्जनशीलता दाखवली आहे हे पाहून मला अत्यंत आनंद झाला…. व्हीलचेअर-अॅक्सेसिबल वाहनांची आवश्यकता भासल्यास फक्त एक बटण दाबून राइड मिळविण्यासाठी डब्ल्यूएव्ही लोकांना सक्षम करेल.”
टोनी कोल्हो, सह-लेखक, अमेरिकन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट
अंध किंवा दृष्टी कमी असणारे रायडर्स
आयओएस व्हॉईसओव्हर, अँड्रॉइड टॉकबॅक आणि वायरलेस ब्रेल स्क्रीन सुसंगतता यांच्यासह, Uber अॅप अंध किंवा दृष्टी कमी असलेल्या रायडर्सना जेथे जायचे आहे तेथे जाणे सुलभ करते.
सेवा देणाऱ्या प्राण्यांसह असलेले रायडर्स
युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये आम्ही Uber ड्रायव्हर्सना सेवा देणाऱ्या प्राण्यांसह रायडर्स वाहतूक करण्यासंबंधी असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल माहिती देण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. त्यांमध्ये यांचा समावेश होतो:
नवीन आणि सध्याच्या ड्रायव्हर्सकरिता ॲप-मधील सूचना
सर्व नवीन आणि विद्यमान ड्रायव्हर्सना अॅपमध्ये एक सूचना प्राप्त होईल ज्यानुसार त्यांना ट्रिपमध्ये सेवा देणार्या प्राण्यांचा स्वीकार करण्याशी संबंधित करार आणि कायदेशीर जबाबदाऱ्या मान्य करण्याची आवश्यकता आहे.
सेवा देणाऱ्या प्राण्यांस नकारासंबंधी तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया
घटनांची योग्य तपासणी केली गेली आहे, त्यांची कागदोपत्री नोंद ठेवली गेली आहे आणि तक्रारींचे निराकरण केले गेले आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आमची विशेष सहाय्य टीम सेवा देणार्या प्राण्यांशी संबंधित सर्व तक्रारी हाताळते. हे अहवाल Uber अॅप मधील अॅक्सेसिबिलिटी मदत केंद्रात किंवा कॉम्प्युटरवर हा फॉर्म भरून दाखल करता येतात.
सेवा देणाऱ्या प्राण्यांविषयीचे अपडेटेड धोरण
Uber ने आपले मदतनीस प्राण्यांविषयी धोरण अपडेट केले आहे, जे मदतनीस प्राण्यांसह प्रवास करणार्या रायडर्ससंदर्भात ड्रायव्हर्सची कंत्राटी आणि कायदेशीर जबाबदारी, तसेच रायडर्सच्या तक्रारींकडे लक्ष देण्याची कंपनीची सातत्यपूर्ण वचनबद्धता अधोरेखित करते
आमच्या यूएस सर्व्हिस अॅनिमल पॉलिसी आणि सेवा देणाऱ्या प्राण्यांस नकार देण्यासंबंधीच्या तक्रारी नोंदविण्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हे मार्गदर्शक तपासा.
हजारो लोक त्यांच्या शहरांमध्ये फिरण्यासाठी आणि दररोजची कामे पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी सेवा देणाऱ्या प्राण्यांवर/सहाय्यक कुत्र्यांवर अवलंबून असतात. एमिली डेव्हिसन आणि तिचा मार्गदर्शक कुत्रा, युनिटी यांचा खालील व्हिडिओ पाहून अधिक जाणून घ्या.
"मला विश्वास आहे की या शतकात Uber ही माझ्या आणि इतर अंध लोकांच्या स्वावलंबीपणासाठी झालेली सर्वात महत्त्वपूर्ण प्रगती आहे."
-माईक मे, माजी कार्यकारी संचालक, बीव्हीआय वर्कफोर्स इनोव्हेशन सेंटर, एन्व्हिजन इंक.
कर्णबधिर किंवा ज्यांना कमी ऐकू येते असे रायडर्स
Uber Eats अॅपच्या पूर्ण कार्यक्षमतेसाठी ऑडिओची आवश्यकता नाही. दिसणाऱ्या आणि व्हायब्रेट होणार्या सूचना यासारखे सहाय्यक तंत्रज्ञान कर्णबधिर किंवा कमी ऐकू येणार्या रायडर्सना Uber अॅपचा सहजपणे वापर करण्यास मदत करते, आणि अंतिम ठिकाण भरण्याची क्षमता यासारख्या अॅपमधील वैशिष्ट्यांमुळे ड्रायव्हर आणि रायडर यांच्यातील शब्दांविना संवाद सुलभ होऊ शकतो.
सहाय्याची गरज असलेले रायडर्स
Uber मध्ये आम्ही प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी, वाहतुकीच्या उपायांचा अॅक्सेस वाढवण्याचा प्रयत्न करतो. Assist अशा लोकांना मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे ज्यांना अतिरिक्त मदत घेण्याची इच्छा असेल. Assist सह, उत्तम रेटिंग मिळालेल्या ड्रायव्हर्सना तृतीय-पक्षी संस्थांकडून रायडर्सना वाहनात प्रवेश करण्यात मदत करण्यासंबंधीचे स्वतंत्र प्रशिक्षण घेता येते. Assist सध्या जगातील 40 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे.
दिव्यांग Uber Eats ग्राहक
अंध किंवा दृष्टी कमी असणारे ग्राहक
आयओएस व्हॉईसओव्हर आणि अँड्रॉइड टॉकबॅकसह, Uber Eats अॅप अंध किंवा कमी दृष्टी असलेल्या ग्राहकांना एका बटणाच्या स्पर्शात रेस्टॉरंट्समधून जेवणाची ऑर्डर देणे सुलभ करते. या अॅक्सेसिबीलिटी वैशिष्ट्यांसह Uber Eats अॅप कसे वापरावे ते पहा.
कर्णबधिर किंवा कमी ऐकू येणारे ग्राहक
Uber Eats अॅपच्या पूर्ण कार्यक्षमतेसाठी ऑडिओची आवश्यकता नाही. दिसणाऱ्या आणि कंपन करणाऱ्या सूचनांसारखे सहाय्यक तंत्रज्ञान कर्णबधिर किंवा कमी ऐकू येणार्या ग्राहकांना Uber Eats ॲपचा वापर करण्यास मदत करू शकते. डिलिव्हरीचे अंतिम ठिकाण प्रविष्ट करण्याची क्षमता यासारखी अॅप-मधील वैशिष्ट्ये ग्राहक व डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीमध्ये शब्दांविना संवाद सुलभ करू शकतात.
दिव्यांग ड्रायव्हर्स
हालचाली करण्यामध्ये अक्षम असे दिव्यांग ड्रायव्हर्स
हालचाली करण्यामध्ये अक्षम अशा दिव्यांग लोकांना Uber आर्थिक संधी प्राप्त करून देते. बदल केलेली वाहने आणि हाताने चालवायची नियंत्रणे वापरणाऱ्या ड्रायव्हर्सचे Uber आपल्या प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. कायदेशीररित्या वाहन चालवण्यास पात्र अशी कोणतीही व्यक्ती Uber सह गाडी चालवण्यासाठी अर्ज करू शकते.
कर्णबधिर किंवा कमी ऐकू येणारे ड्रायव्हर्स
कर्णबधिर किंवा कमी ऐकू येणार्या ड्रायव्हर्ससाठी सोयीस्कर अशा आर्थिक संधी Uber प्राप्त करून देते. युएसमधील Uber प्लॅटफॉर्मवर कर्णबधिर किंवा कमी ऐकू येणारे असे हजारो ड्रायव्हर्स व्यवस्थित ऐकू येणार्या ड्रायव्हर्सपेक्षा दरमहा सरासरी जास्त राइडस् देतात. युएसमधील कर्णबधिर ड्रायव्हर्सनी एकत्रितपणे कोट्यवधी डॉलर्स कमावले आहेत - तेसुद्धा केवळ लोकांना त्यांच्या समुदायामध्ये हवे तिथे जाण्यास मदत करुन.
सप्टेंबर 2016 मध्ये, रुबरमॅन फॅमिली फाऊंडेशनने Uberला दिव्यांग लोकांना साहाय्य करण्यात अग्रगण्य असलेल्या 18 कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणून मान्यता दिली.
“कर्णबधिरांसाठी किंवा कमी ऐकू येणार्यांसाठी Uberने आपल्या अॅपमध्येच अॅक्सेसिबल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि कर्णबधिर समुदायाला Uberसह वाहन चालवून पैसे कमावण्याची अभूतपूर्व संधी प्रदान केली आहे. सीएसडीबरोबरची ही भागीदारी म्हणजे कर्णबधिर वाहनचालकांकरिता लोकांना राइड देण्याची सोपी संधीच नव्हे तर - ही लोकांना जोडण्याची आणि कर्णबधिर लोकांच्या क्षमता आणि माणुसकीसंबंधी नवीन जाणीव निर्माण करण्याची संधी आहे.”
- क्रिस सूकप, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्णबधिरांसाठी संप्रेषण सेवा
कर्णबधिर किंवा कमी ऐकू येणार्या ड्रायव्हर्ससाठी उत्पादन वैशिष्ट्ये
याव्यतिरिक्त, कर्णबधिर पुरुष आणि स्त्रियांना देता येणाऱ्या संधींचा विस्तार करण्यासाठी, आम्ही कम्युनिकेशन सर्व्हिस फॉर द डेफ या युनायटेड स्टेट्समधील कर्णबधिर नेतृत्व असलेल्या सर्वात मोठ्या ना-नफा संस्थेशी भागीदारी केली. ड्रायव्हरचा अनुभव सुधारण्यासाठी पूर्णपणे वैकल्पिक उत्पादन क्षमतांची मालिका तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी आम्ही कर्णबधिर समुदायाच्या सदस्यांसहदेखील कार्य केले आहे जसे की नॅशनल असोसिएशन ऑफ द डेफ आणि टेलिकम्युनिकेशन्स फॉर द डेफ अँड हार्ड ऑफ हियरिंग (टीडीआय), ज्यात या क्षमतांचा समावेश आहेः
अॅपमध्ये ही वैशिष्ट्ये सक्षम करीत आहे
ड्रायव्हर्स अॅपमध्ये कर्णबधिर किंवा कमी ऐकू येणारे म्हणून स्वत:ची ओळख पटवू शकतात, ज्यामुळे ड्रायव्हर्स आणि त्यांच्या रायडर्ससाठी खालील वैशिष्ट्ये उघडतात.
फ्लॅशिंग ट्रिप विनंती
Uber ड्रायव्हर अॅप फ्लॅशिंग लाइटमार्फत आणि ध्वनि-सूचनेसह नवीन ट्रिप विनंती आल्याचे सूचित करते. यामुळे एक राइड देण्याची आणि पैसे कमवण्याची नवीन संधी येते तेव्हा वाहनचालकांच्या ते सहजपणे लक्षात येते.
कॉल करण्याऐवजी केवळ टेक्स्ट मेसेज
कर्णबधिर किंवा कमी ऐकू येणाऱ्या ड्रायव्हरला कॉल करण्याची क्षमता रायडरसाठी बंद केली आहे. त्याऐवजी, रायडर्सना त्यांच्याशी संवाद साधण्याची आवश्यकता असल्यास, त्यांना संदेश पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. हे सेटिंग वापरणाऱ्या ड्रायव्हर्सच्याबाबतीत अयशस्वी फोन कॉलनंतर राइड्स रद्द होण्याची शक्यता कमी असते.
रायडरच्या अंतिम ठिकाणाबद्दलची सूचना
रायडर्सना त्यांचे अंतिम ठिकाण भरण्यासाठी अॅप एक अधिकची सूचना जोडेल आणि त्यांचा ड्रायव्हर कर्णबधिर किंवा कमी ऐकू येणारा आहे हे त्यांना सांगेल. असे सेटिंग चालू केलेल्या ड्रायव्हरने एखादी राइड स्वीकारल्यानंतर, रायडरला त्यांचे अंतिम ठिकाण विचारणारा ठळक स्क्रीन दिसेल. एकदा राइड सुरू झाल्यानंतर Uber त्यांना एकामागून एक दिशानिर्देश देऊ शकेल.
या वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ पहा.
आम्ही मदत करू शकतो
मदत आणि साहाय्य
तुमच्या Uber खात्याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी, वारंवार विचारले जाणारे प्रश्न ब्राउझ करण्यासाठी किंवा अलीकडील ट्रिपवर अभिप्राय देण्यासाठी आमच्या मदत केंद्रास भेट द्या.
ड्रायव्हर संसाधने
दिव्यांग असलेल्या रायडर्सच्या वाहतुकीबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास ड्रायव्हर्ससाठी आमची संसाधने तपासा.