Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

मदतनीस प्राणी वापरकर्ता मार्गदर्शक

अंध किंवा कमी दृष्टी असलेल्या रायडर्सना विश्वसनीय आणि सुलभपणे उपलब्ध असलेल्या वाहतूक उपायांचा ॲक्सेस मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.

Uber चे लाभ

आयओएस व्हॉईसओव्हर आणि अँड्रॉइड टॉकबॅक तंत्रज्ञान

आयओएस व्हॉईसओव्हर, अँड्रॉइड टॉकबॅक आणि पर्यायी ब्रेल डिस्प्लेसह, Uber केवळ बटणाच्या स्पर्शाने राईड मिळवणे शक्य करते. आयओएस वर व्हॉईसओव्हर सक्षम करण्यासाठी: तीनदा-टॅप किंवा सिरी शॉर्टकट्स वापरत सेटिंग्ज > सामान्य > ॲक्सेसिबिलिटी > व्हॉईसओव्हर पर्यायावर या. समर्थित वायरलेस ब्रेल डिस्प्लेच्या कनेक्शनसह व्हॉईसओव्हरचा वापर केला जाऊ शकतो आणि ते Uber उपलब्ध असलेल्या सर्व शहरांमध्ये आणि भाषांमध्ये उपलब्ध आहे.

कॅशलेस पेमेंट्स

Uber चा कॅशलेस पेमेंट पर्याय पेमेंट प्रक्रिया सुलभ करतो, रायडर्सची रोख रक्कम जवळ बाळगण्याची किंवा ड्रायव्हरसोबत नोटांची देवाणघेवाण करण्याची चिंता कमी होते.

सहज खर्च

प्रत्येक ट्रिप इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड केली जाते, आणि पावत्या आपोआप रायडर्सना ईमेल केल्या जातात, ज्यामुळे खर्चाचा अहवाल भरणे सोपे होते.

10,000+ शहरांमध्ये उपलब्ध

जगभरात, लक्षावधी लोक एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी Uber वापरत आहेत. राईड शोधण्यासाठी आता रस्त्यावर वाहनांना हात दाखवण्याची किंवा बाहेर वाट पाहण्याची गरज नाही. रायडर्स कुठूनही Uber ॲप सुरू करू शकतात आणि त्यांची कार येण्याची सुरक्षितपणे प्रतीक्षा करू शकतात—जे वाहन चालवू शकत नाहीत त्यांच्यासाठी वाहतुकीचा दुसरा पर्याय देत आहोत.

सर्वांसाठी समान ॲक्सेस

तुम्ही केलेली प्रत्येक ट्रिप विनंती Uber ॲपद्वारे जवळपासच्या ड्रायव्हरशी आपोआप जुळवली जाते, यामुळे विश्वासार्ह, परवडणारा वाहतूक उपाय मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या बेकायदेशीर भेदभावाच्या शक्यता कमी होतात. अंध किंवा दृष्टी कमी असणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या प्राण्यांसह प्रवास करणाऱ्या रायडर्ससाठी Uber ची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आणि मदतनीस प्राण्यांविषयी धोरण यांच्या अंतर्गत ड्रायव्हर्सनी मदतनीस प्राण्यांच्या वाहतुकीसंदर्भात सर्व लागू कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

तुमची अंदाजे आगमन वेळ आणि लोकेशन शेअर करा

अंध किंवा कमी दृष्टी असलेले रायडर्स, अतिरिक्त मनःशांतीसाठी विशिष्ट मार्ग आणि आगमनाच्या अंदाजे वेळेसह त्यांच्या प्रवासाचे तपशील मित्र किंवा कुटुंबासह सहजपणे शेअर करू शकतात. प्रियजनांना एक लिंक मिळेल जिथे ते ड्रायव्हरचे नाव आणि फोटो, तसेच वाहनाची माहिती आणि तुम्ही तुमच्या अंतिम ठिकाणी पोहोचेपर्यंत तुम्ही कुठे आहात याचा नकाशावर मागोवा घेऊ शकतील—हे सर्व Uber ॲप डाउनलोड न करता.

रिअल-टाइम ट्रॅकिंग

Uber प्रत्येक ट्रिपची नोंद ठेवण्यासाठी जीपीएस वापरते. यामुळे रायडर्सना कार्यक्षम मार्ग वापरले जात आहेत हे जाणून मनःशांती मिळते आणि त्यांना कोणत्याही प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे माध्यम मिळते आणि कुटुंब किंवा मित्रांसोबत ट्रिपची प्रगती शेअर करता येते.

Uber चे मदतनीस प्राणी धोरण शोधण्यासाठी मार्गदर्शक

संगणकावर

ॲक्सेसिबिलिटी मदत केंद्र

Uber ॲपमध्ये

ॲक्सेसिबिलिटी मदत केंद्र

  1. वरच्या डाव्या कोपऱ्यात मेनू बटणावर टॅप करा.
  2. मदत निवडा.
  3. खाली स्क्रोल करून ॲक्सेसिबिलिटी वर जा.
  4. मदतनीस प्राण्यांसह राईड करणे, नंतर यूएस निवडा. मदतनीस प्राणी धोरण निवडा.

मदतनीस प्राण्याला नाकारल्याची तक्रार नोंदवणे

घटनांची योग्य तपासणी केली गेली आहे, त्यांची कागदोपत्री नोंद ठेवली गेली आहे आणि तक्रारींचे निराकरण केले गेले आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आमची विशेष सहाय्य टीम मदतनीस प्राण्यांशी संबंधित सर्व तक्रारी हाताळते. या तक्रारी आमच्या ॲक्सेसिबिलिटी मदत केंद्रावरून दाखल केल्या जाऊ शकतात.

मदतनीस प्राणी नाकारण्याची तक्रार नोंदवण्याचे अनेक मार्ग आहेत:

Uber खाती असलेल्या वापरकर्त्यांसाठी, संगणकावर

ॲक्सेसिबिलिटी मदत केंद्र

  1. तुमची Uber लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून help.uber.com मध्ये साइन इन करा.
  2. खाली स्क्रोल करा आणि ॲक्सेसिबिलिटी वर क्लिक करा
  3. "मदतनीस प्राणी धोरण" शोधा आणि यूएस मदतनीस प्राणी धोरण निवडा.
  4. खाली स्क्रोल करून मला मदतनीस प्राण्यांविषयी समस्येची तक्रार करायची आहे निवडा.

पूर्ण केलेल्या ट्रिप्स

  1. तुमची Uber लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून help.uber.com मध्ये साइन इन करा.
  2. ट्रिप समस्या आणि परतावा पृष्ठावर, नकाशावरील ट्रिप इतिहास ड्रॉपडाउन मेनू वापरून संबंधित ट्रिप निवडा.
  3. निवडलेल्या ट्रिपच्या तपशिलांसाठी खाली अधिक वर क्लिक करा.
  4. सामान्य समस्या विभागात मला मदतनीस प्राण्यांविषयी समस्येची तक्रार करायची आहे निवडा.

Uber खाती नसलेल्या वापरकर्त्यांसाठी, संगणकावर

मदतनीस प्राणी तक्रार फॉर्म येथे शोधा.

Uber ॲपमध्ये

ॲक्सेसिबिलिटी मदत केंद्र

  1. वरच्या डाव्या कोपऱ्यात मेनूवर टॅप करा.
  2. मदत निवडा.
  3. नंतर ॲक्सेसिबिलिटी निवडा.
  4. मला मदतनीस प्राण्यांविषयी समस्येची तक्रार करायची आहे वर टॅप करा.

पूर्ण केलेल्या ट्रिप्स

  1. वरच्या डाव्या कोपऱ्यात मेनूवर टॅप करा.
  2. मदत निवडा.
  3. नंतर सर्व समस्या पहा निवडा.
  4. मला मदतनीस प्राण्यांविषयी समस्येची तक्रार करायची आहे वर टॅप करा.

शुल्क आणि परतावे

रद्द करणे शुल्क

सेवा नाकारल्यामुळे तुमच्याकडून रद्द करण्याचे शुल्क आकारले जात असल्यास, तुम्ही Uber ला समस्येची तक्रार केली तर हे शुल्क आमच्या सहाय्य टीमद्वारे परत केले जाईल. कृपया लक्षात घ्या की तुमच्या पेमेंट पद्धतीवर परताव्याची प्रक्रिया करण्यासाठी कामकाजाचे 5 दिवस लागू शकतात.

Uber दुसऱ्या सीटचा परतावा

तुम्ही UberPool च्या ट्रिपवर एखाद्या मदतनीस प्राण्यासोबत प्रवास करत असल्यास आणि तुमच्या मदतनीस प्राण्याच्या आकारामुळे तुम्हाला अतिरिक्त जागेची गरज भासल्यास शेअर केलेल्या त्या ट्रिपवर तुम्ही स्वतः, तुमचा मदतनीस प्राणी आणि इतर रायडर्स असे सर्व बसू शकतील याची खात्री करण्यासाठी तुम्ही 2 सीट्स निवडल्या पाहिजेत. तुम्ही येथे Uber ला लिहू शकता, आणि दुसऱ्या सीटच्या अतिरिक्त खर्चासाठी परतावा दिला जाऊ शकतो.

मदतनीस प्राण्यांविषयी धोरण

स्टेट आणि फेडरल कायदा Uber ड्रायव्हर ॲप वापरणाऱ्या ड्रायव्हर भागीदारांना मदतनीस प्राणी सोबत असलेल्या रायडर्सना मदतनीस प्राण्यांमुळे सेवा नाकारण्यापासून आणि मदतनीस प्राणी सोबत असलेल्या रायडर्सशी अन्यथाही भेदभाव करण्यापासून प्रतिबंधित करतो. Uber च्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आणि मदतनीस प्राण्यांविषयी धोरण यांमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, या कायदेशीर बंधनाचे उल्लंघन करून भेदभावपूर्ण वर्तन करणारे ड्रायव्हर त्यांची ड्रायव्हर ॲप वापरण्याची क्षमता गमावतील.

काही प्रश्न आहेत का?

आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत

तुमच्या Uber खात्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी, वारंवार विचारले जाणारे प्रश्न ब्राउझ करण्यासाठी किंवा अलीकडील ट्रिपवर अभिप्राय देण्यासाठी.

उत्तम सेवा द्या

दिव्यांग असलेल्या रायडर्सच्या वाहतुकीबद्दल अधिक जाणून घेण्यात स्वारस्य असल्यास, ड्रायव्हर्ससाठी ही संसाधने पहा

*फ्रान्समध्ये लागू नाही.