Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

Uber चालवत असताना सुरक्षेस प्राधान्य देणे

योग्य रायडर पिकअप करण्यापासून ते मदतीसाठी कधी कॉल करावा हे जाणून घेण्यापर्यंत, प्रत्येक ट्रिप तणावमुक्त करण्याचे मार्ग येथे आहेत.

रायडर संबंधित माहिती शोधत आहात का? रायडर सुरक्षा पृष्ठ वर स्विच करा.

ड्रायव्हर सुरक्षितता टिप्स

आम्ही तुमची सुरक्षितता लक्षात घेऊन आमचे तंत्रज्ञान तयार करतो. पण तुम्ही ज्या कृती कराल, त्यादेखील तुम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करू शकतात. Uber चालवत असताना सुरक्षित राहण्यासाठी या टिप्स तयार करताना आम्ही कायदा अंमलबजावणी संस्थांशी सल्लामसलत केली.

1. तुमच्या रायडरची पडताळणी करणे

रायडर्सना तुमची लायसन्स प्लेट, तुमच्या कारचे मेक आणि मॉडेल तसेच त्यांच्या अ‍ॅप मध्ये दिसणारा तुमचा फोटो जुळतो आहे का ते तपासून तुम्हाला शोधण्यास सांगितले जाते. रायडर्स वाहनात प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही त्यांना तुमच्या नावाची पुष्टी करायला नक्की सांगू शकता.

2. गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित ठेवणे

तुम्ही सतर्क राहून, रस्त्यावर नजर ठेवून आणि झोपाळलेल्या अवस्थेत गाडी चालवणे टाळण्यासाठी विश्रांती घेऊन, रस्ते सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकता. लक्षात ठेवा: बहुतेक राज्ये आणि देशांमध्ये वाहन चालवत असताना मजकूर संदेश पाठवणे बेकायदेशीर आहे. काही ड्रायव्हर्स त्यांचे लक्ष विचलित होऊन काही दुर्घटना घडू नये म्हणून त्यांचा फोन, ते सहजपणे पाहू शकतील अशा ठिकाणी, माउंट वापरून त्यावर ठेवतात. काही शहरांमध्ये असे करणे कायद्याने आवश्यक आहे.

3. तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे

आम्ही असे तंत्रज्ञान वापरतो जे तुम्ही तुमच्या प्रवाशाला अ‍ॅपद्वारे कॉल करता किंवा संदेश पाठवता तेव्हा तुमचा फोन नंबर गुपित ठेवते जेणेकरून त्यांना तुमचा वैयक्तिक नंबर दिसणार नाही.*

4. सीट बेल्ट वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे

अनेक ठिकाणी, ड्रायव्हर्स आणि रायडर्स दोघांसाठी सीट बेल्ट वापरणे कायद्यानुसार आवश्यक आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल प्रमाणे कार अपघातांशी संबंधित घटनांमध्ये जीव वाचवणे आणि दुखापती होण्याचे प्रमाण कमी करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

5. पादचारी आणि सायकल चालकांवर लक्ष ठेवणे

वाहन चालवण्याच्या सामान्य नियमांनुसार, पादचारी तसेच दुचाकी चालवणारे यांच्यावर नजर ठेवणे गरजेचे असते. जेव्हा तुम्ही ड्रॉप ऑफ किंवा पिकअप साठी गाडी थांबवत असता किंवा जेव्हा तुम्ही'रात्री गाडी चालवत असता तेव्हा हे विशेष महत्वाचे असते.

6. तुमचे ड्रॉप ऑफ कायदेशीर ठेवणे

तुम्ही रायडर्सना कुठे ड्रॉप ऑफ करू शकता ह्या बद्दलचे स्थानिक कायदे जाणून घेतल्याने लोडिंग क्षेत्र, पार्क केलेली वाहने तसेच आणखी बर्‍याच गोष्टींशी गाठ पडल्यास तुम्हाला मदत होऊ शकते.

7. तुमच्या मनाचे ऐकणे

तुमची सहज प्रेरणा आणि अनुभव यावर विश्वास ठेवा आणि Uber सह गाडी चालवत असताना तुमच्या सर्वोत्तम आकलनाचा वापर करा. आपत्कालीन परिस्थितीत 'आहात असे कधीही वाटल्यास, तुम्ही तुमच्या अ‍ॅपमधील आपत्कालीन बटणाचा वापर करून त्वरित मदत मिळवू शकता. आणि लक्षात ठेवा की तुम्हाला असुरक्षित वाटल्यास तुम्ही कधीही राईड संपवू शकता.

8. दयाळूपणे आणि आदरपूर्वक वागणे

Uber' ची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे ही प्रत्येक अनुभव सुरक्षित, सन्माननीय आणि सकारात्मक वाटण्यात मदत करण्यासाठी विकसित करण्यात आली आहेत. या स्टॅंडर्ड्सचे'पालन करत राहणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे जेणेकरून आपण एक सुरक्षित आणि अगत्यशील समुदाय तयार करण्यात मदत करू शकू.

9. आम्हाला अभिप्राय देणे

प्रत्येक ट्रिपनंतर, तुम्हाला तुमच्या अ‍ॅपमधील मदत विभागाद्वारे रायडरला 1 ते 5 स्टार्स देऊन रेट करण्याची आणि तुमच्या टिप्पण्या जोडण्याची संधी मिळते. आमची 24/7 प्रतिसाद टीम घटनेचा आढावा घेईल.

आणि लक्षात ठेवा, प्रत्येक ट्रिपवर Uber चे सेफ्टी टूलकिट अ‍ॅक्सेस करण्यासाठी आणि आवश्यक असेल तेव्हा मदत मिळण्यासाठी तुम्ही अ‍ॅपमधील ढाल या चिन्हावर टॅप करू शकता.

प्रत्येकासाठी अधिक सुरक्षित प्रवास उपलब्ध करणे

Uber मधील सुरक्षिततेबद्दल अधिक जाणून घ्या

ड्रायव्हर सुरक्षा

ड्रायव्हरच्या सुरक्षेसाठी Uber वचनबद्ध आहे. विमा समावेशापासून ते अ‍ॅप-मधील सहाय्यक पर्यंत ड्रायव्हर अ‍ॅप आणि ड्रायव्हर अनुभवात सुरक्षा कशी समाविष्ट केली जाते ते जाणून घ्या.

सुरक्षेबद्दल आमची वचनबद्धता

Uber प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. अ‍ॅपमध्ये आणि त्यापलीकडे रायडर आणि ड्रायव्हरच्या अनुभवांमध्ये सुरक्षेचा समावेश कसा केला जातो यासह अधिक जाणून घ्या.

रायडर सुरक्षा

दररोज लक्षावधी राईड्सची विनंती केली जाते. प्रत्येक रायडरला ॲपमध्ये असणाऱ्या सुरक्षा वैशिष्ट्याचा अ‍ॅक्सेस असतो. आणि तुम्हाला गरज पडल्यास, प्रत्येक राईडसाठी एक सहाय्यक टीम असते.

*हे वैशिष्ट्य काम करत नसल्यास, फोन नंबर्स कदाचित अज्ञात ठेवले जाणार नाहीत.