Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

ड्रायव्हर्स त्यांच्या खात्यांचा ॲक्सेस का गमावू शकतात हे समजून घेणे

या पृष्ठावर, तुम्हाला ड्रायव्हर्स त्यांच्या खात्यांचा ॲक्सेस का गमावू शकतात याची सर्वसामान्य कारणे, ते कसे टाळावे आणि तुमच्यासोबत तसे घडल्यास काय करावे याबद्दलची माहिती मिळेल.

ड्रायव्हर्सबद्दलची आमची वचनबद्धता

Uber प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस सर्वांकरता खुला ठेवण्यासाठी आणि ड्रायव्हर्सना जेव्हा काम करायचे असेल तेव्हा त्यांना ऑनलाइन येण्यास मदत करण्यासाठी आम्ही अत्यंत प्रेरित आहोत. खात्याचा ॲक्सेस गमावणे ही घटना सर्रास घडत नाही, पण जेव्हा ती घडते तेव्हा ते खूप निराशाजनक असू शकते हे आम्ही जाणतो.

आमच्या प्रक्रिया निष्पक्ष, अचूक आणि पारदर्शक असल्याची खात्री करणे—आणि आम्ही योग्य काम करत आहोत याबद्दल ड्रायव्हर्सना विश्वास वाटणे ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही खालील तत्त्वे विकसित केली आहेत:

A black circle labeled with the number

ड्रायव्हर्सच्या खात्याचा ॲक्सेस कोणत्या वर्तनांनी धोक्यात येऊ शकतो याची त्यांना माहिती असणे आवश्यक आहे.

A black circle labeled with the number

वर्षानुवर्षे प्लॅटफॉर्म वापरत असलेल्या ड्रायव्हर्सनी Uber आणि त्यांच्या ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. गंभीर घटना वगळता, ॲक्सेसशी संबंधित निर्णयांमध्ये Uber प्लॅटफॉर्मवरील वेळ आणि ट्रिप्सची संख्या विचारात घेऊ शकते.

A black circle labeled with the number

ॲक्सेस गमावला गेल्यास, Uber आमच्या कम्युनिकेशन्समध्ये स्पष्ट, सहानुभूतीपूर्ण आणि सातत्यपूर्ण राहण्यासाठी तसेच आमच्या निर्णयामागील कारणांबद्दल स्पष्ट आणि पारदर्शक राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल, अपवाद फक्त तेव्हा केला जाईल जेव्हा असे करणे इतर युजर्ससाठी जोखमीचे ठरेल.

A black circle labeled with the number

सर्वात गंभीर प्रकरणे सोडल्यास, ड्रायव्हर्सकडे 7 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी ॲक्सेस काढून टाकणार्‍या आणि स्वतःहून निराकरण करता येणार नाही अशा कोणत्याही निर्णयाच्या आढाव्याची विनंती करण्याची क्षमता असायला हवी.

A black circle labeled with the number

खाते डिॲक्टिव्हेट करणे आणि आढावा घेणे यासंबंधीचे स्टँडर्ड्स तयार करताना, त्यांचा आढावा घेताना आणि ती अपडेट करताना Uber ने सुसंगत दृष्टीकोन ठेवला पाहिजे.

आमची खात्याचा आढावा घेण्याची प्रक्रिया

मानवी सहभाग

Uber प्लॅटफॉर्मची सुरक्षा आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी डेटा आणि तंत्रज्ञान ही उपयुक्त साधने असली तरी, ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींना निष्पक्ष वागणूक दिली जाते आणि फसव्या तक्रारींमुळे त्यांच्या खात्यांवर परिणाम होत नाही याची खात्री करण्यात मानवी पुनरावलोकने नेहमीच महत्त्वाची ठरणार आहेत.

आगाऊ सूचना

ड्रायव्हरना त्यांच्या खात्याचा ॲक्सेस गमावण्याचा धोका असल्यास आम्ही शक्य असेल तेव्हा त्यांना चेतावणीच्या मेसेजेसद्वारे सूचित करू. मात्र, काही वेळा अशा असतात की आम्हाला इशारा न देता अ‍ॅक्सेस काढून टाकावा लागतो, जसे की कायदेशीर किंवा सुरक्षिततेच्या कारणांनी.

अतिरिक्त माहिती देण्याची संधी

ड्रायव्हर्सकडे खाते डिॲक्टिव्हिशेनचा आढावा घेण्याची विनंती करण्याची आणि त्यांच्या केसच्या समर्थनार्थ ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग्जसारखी अतिरिक्त माहिती देण्याची क्षमता असायला हवी. म्हणूनच आम्ही ॲपमध्ये एक पुनरावलोकन केंद्र तयार केले आहे जे ड्रायव्हर्स त्यांच्या खात्याच्या डिॲक्टिव्हेशनबद्दल अपील करण्यासाठी वापरू शकतात.

खोट्या आरोपांपासून संरक्षण

अनेकदा परतावा मिळवण्याच्या उद्देशाने, आमच्या रेटिंग्जचा किंवा ग्राहक सहाय्य यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या रायडर्सना ओळखण्यासाठी आम्ही प्रक्रिया स्थापन केल्या आहेत. खाते डिॲक्टिव्हेट करण्याच्या निर्णयांमध्ये या ग्राहकांनी केलेल्या आरोपांचा विचार केला जाणार नाही याची खात्री करण्यात मदत व्हावी यासाठी आम्ही काम करत असतो.

ॲक्सेस का गमावला जातो आणि अशा परिस्थितीत काय करावे

ड्रायव्हरने त्यांच्या खात्याचा अ‍ॅक्सेस गमावण्याच्या कारणांमध्ये कालबाह्य झालेली कागदपत्रे किंवा त्यांच्या बॅकग्राउंड चेकमधील समस्या यासारख्या समस्या समाविष्ट असू शकतात.

कधीकधी, ड्रायव्हर्स गुणवत्तेशी संबंधित काही विशिष्ट समस्यांमुळे त्यांच्या खात्यांचा ॲक्सेस तात्पुरता किंवा कायमस्वरूपी गमावू शकतात, उदाहरणार्थ, रद्द करण्याचा दर असाधारणपणे जास्त असणे, ग्राहकांवर ट्रिप्स रद्द करण्यासाठी आणि Uber ॲपच्या बाहेर ट्रिप घेण्यासाठी दबाव टाकणे किंवा ग्राहकांवर रोख पैसे देण्यासाठी दबाव टाकणे किंवा Uber ॲपवर दाखवलेल्या भाड्याशिवाय अतिरिक्त रोख रक्कम मागणे. अशा परिस्थितीत, ड्रायव्हर ॲपमधून तुम्हाला लॉग आउट करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला अनेक वेळा सतर्क करतो.

ड्रायव्हर्सकडे खात्याच्या डिॲक्टिव्हेशनचा आढावा घेण्याची विनंती करण्याची आणि त्यांच्या केसच्या समर्थनार्थ पुरावे देण्याची क्षमता असायला हवी. म्हणूनच आम्ही ॲपमध्येच एक पुनरावलोकन केंद्र तयार केले आहे आणि त्याचा जगभरात विस्तार करणे सुरू ठेवले आहे.

ॲक्सेस गमावणे, अगदी तात्पुरता देखील, व्यत्यय आणू शकते, म्हणून आम्ही प्रत्येक रिपोर्टचा निष्पक्षपणे आणि तत्परतेने आढावा घेतो. खात्याचा ॲक्सेस पुन्हा मिळवण्यासाठी काही पावले उचलायची असल्यास, आम्ही ड्रायव्हरला पाठवतो त्या मेसेजमध्ये त्यांचा समावेश करू. मदतीसाठी Uber च्या ग्राहक सहाय्यक टीमशी कधीही संपर्क साधला जाऊ शकतो.

ड्रायव्हर्सनी खात्याचा ॲक्सेस गमावण्याच्या कारणांबद्दल खाली अधिक जाणून घ्या.

  • सर्व ड्रायव्हर्सनी नियमित बॅकग्राउंड स्क्रीनिंगना सहमती देणे आवश्यक आहे, ज्यात त्यांच्या मोटार वाहनांच्या नोंदी आणि गुन्हेगारी इतिहासाचे मूल्यमापन करणे समाविष्ट असते. पात्रतेचे अचूक निकष ते कुठे ट्रिप्स घेतात यावर अवलंबून असतात आणि ते मुख्यत्वे त्यांच्या शहर किंवा राज्यात लागू असलेल्या कायद्यांवर आधारित असतात. बॅकग्राउंड चेक्सच्या आधारे ॲक्सेस गमावण्याची काही सामान्य कारणे येथे दिली आहेत:

    • लैंगिक अत्याचार, लहान मुलांविरुद्ध केलेले लैंगिक गुन्हे, खून/मनुष्यवध, दहशतवाद, मानवी तस्करी आणि अपहरण यांच्यासह अलीकडील काळात केलेले गंभीर फौजदारी गुन्हे
    • अद्याप प्रलंबित असलेले कोणतेही गंभीर गुन्ह्याचे आरोप
    • मागील 3 वर्षांमध्ये एकापेक्षा अधिक वाहतूक उल्लंघने किंवा अपघात
    • मागील 3 वर्षांमध्ये निलंबित लायसन्ससह वाहन चालवणे
    • मद्यपान करून गाडी चालवणे, बेपर्वाईने गाडी चालवणे किंवा हिट-अँड-रन यासारखे ड्रायव्हिंगशी संबंधित अलीकडील गंभीर गुन्हे

    स्थानिक लागू नियम, कायदे आणि पद्धती यांच्या आधारे, बॅकग्राउंड चेक्समध्ये ड्रायव्हरच्या 18 वर्षे वयापासून सुरू करून ड्रायव्हरच्या संपूर्ण प्रौढ इतिहासाचा समावेश असू शकतो.

  • रिअल-टाइम आयडी तपासणी अयशस्वी होणे
    गाडी चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख आमची स्क्रीनिंग तपासणी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीच्या ओळखीशी जुळते याची खात्री करण्यासाठी Uber रिअल-टाइम आयडी तपासणी वापरते. रिअल-टाइम फोटो त्यांच्या प्रोफाइल फोटोशी जुळणे आवश्यक आहे. रायडर्सची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ड्रायव्हर्सना त्यांचे खाते इतर कोणाबरोबर शेअर करण्याची किंवा इतर कोणाला वापरण्यास देण्याची परवानगी नाही.

    रिअल-टाइम आयडी तपासणीतील सामान्य चुकांची उदाहरणे

    • खाते मालकाशिवाय इतर कोणाला रिअल-टाइम फोटो काढू देणे
    • फोटोचा फोटो सबमिट करणे
    • ॲपमध्ये दिलेल्या फ्रेममध्ये चेहरा आणि मान असलेला, स्पष्ट, उत्तम प्रकाश असलेला फोटो न घेणे
    • ड्रायव्हरच्या दिसण्यात बदल झाला असल्यास, प्रोफाइल फोटो अपडेट न करणे

    फोटो पडताळणीविषयी अधिक जाणून घ्या


    असुरक्षित ड्रायव्हिंग
    यामध्ये ड्रायव्हर ॲप वापरताना ड्रायव्हरला एखाद्या ट्रिपदरम्यान अपघात झाल्याच्या किंवा रहदारीचे चालान मिळाल्याच्या तक्रारींचा किंवा खराब, असुरक्षित किंवा विचलित होऊन गाडी चालवण्याच्या वारंवार तक्रारींचा समावेश होतो.


    नशेत किंवा झोप येत असताना गाडी चालवणे
    यामध्ये झोप येत असताना किंवा अल्कोहोल, बेकायदेशीर ड्रग्ज किंवा मोटार वाहन चालवताना घेऊ नयेत अशा ओव्हर-द-काउंटर अथवा प्रिस्क्रिप्शनच्या औषधांच्या प्रभावाखाली असताना वाहन चालवण्याच्या तक्रारींचा समावेश आहे. यात कारमध्ये ड्रग्ज आणि/किंवा अल्कोहोलचे खुले कंटेनर्स असल्याच्या तक्रारींचासुद्धा समावेश आहे. अल्कोहोल किंवा ड्रग्जचा वास आल्यास—मग तो राईड पूर्ण करून गेलेल्या रायडर्समुळे का असेना—त्याचा अर्थ ड्रायव्हर नशेत आहे असा लावला जाऊ शकतो आणि आम्ही त्याची चौकशी पूर्ण करत असताना Uber ला कायद्यानुसार खाते तात्पुरते होल्डवर ठेवावे लागू शकते.


    भांडणे आणि छळ
    आक्रमक, भांडखोर किंवा त्रास देणारे वर्तन दिसून येणे. यामध्ये हे समाविष्ट आहेत:

    • अपमानजनक, धमकावणारी किंवा अयोग्य असू शकेल अशी भाषा वापरणे, हावभाव करणे किंवा कृती करणे
    • लैंगिक क्रियांचे चित्रण असलेल्या किंवा शारीरिक हिंसा दाखवणाऱ्या ग्राफिक इमेजेस Uber समुदायातील इतरांशी शेअर करणे, यात Uber च्या ऑनलाइन सहाय्य प्रणालींद्वारे किंवा Uber प्लॅटफॉर्मच्या अनुभवाच्या संबंधात अशा इमेजेसना अवांछितपणे शेअर करणे समाविष्ट आहे


    लैंगिक गैरवर्तन किंवा हल्ला
    ड्रायव्हर्स, रायडर्स आणि तृतीय पक्षांसह कोणीही केलेल्या लैंगिक हल्ल्याचा आणि लैंगिक गैरवर्तनाचा समावेश असलेल्या कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाला Uber वापरताना परवानगी नाही आणि ते बेकायदेशीसुद्धा असेल. लैंगिक अत्याचार म्हणजे असे प्रत्यक्ष किंवा प्रयत्न केले गेलेले शारीरिक आचरण जे लैंगिक असते आणि संमतीशिवाय केले जाते, जसे की स्पर्श करणे, चुंबन घेणे किंवा लैंगिक संबंध. लैंगिक गैरवर्तनामध्ये अशा अ-शारीरिक वर्तनाचा समावेश होतो जे लैंगिक किंवा रोमँटिक असते आणि संमतीशिवाय केले जाते, किंवा त्याचा कोणावर तरी धमकावल्याचा अथवा घाबरवल्याचा प्रभाव पडतो. ड्रायव्हर किंवा डिलिव्हरी करणारी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला ओळखत असली तरीही किंवा त्यांनी संमती दिलेली असली तरीही, Uber चा 'नो-सेक्स' नियम लैंगिक संपर्काला प्रतिबंधित करतो.


    चुकीचा ड्रायव्हर
    तुम्ही तुमच्या मालकीच्या नसलेल्या खात्यावरून वाहन चालवत असल्यास किंवा तुम्ही इतर कोणालाही तुमच्या प्रोफाइलवरून गाडी चालवण्यास परवानगी देत असल्यास, तुम्ही तुमच्या खात्याचा ॲक्सेस गमावू शकता. हे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून केले जाते. रायडर्स अशा घटनांविरुद्ध तक्रार करू शकतात आणि त्यामुळे खात्याचा ॲक्सेस गमावला जाऊ शकतो.


    मंजुरी नसलेली वाहने वापरणे
    फक्त ड्रायव्हरच्या प्रोफाइलशी संबंधित आणि त्यांच्या शहराच्या किमान आवश्यकता पूर्ण करणारी वाहने किंवा वाहतुकीची इतर साधने स्वीकारली जातील.

    मंजुरी नसलेल्या वाहनांशी संबंधित सामान्य चुकांची उदाहरणे

    • Uber ला वाहनाची अपडेट केलेली माहिती न देणे

    वाहन आवश्यकतांविषयी अधिक जाणून घ्या


    असुरक्षित वाहने
    यामध्ये उद्योगाच्या सुरक्षा आणि देखभालीच्या स्टँडर्ड्सनुसार वाहनाची देखभाल न करणे समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, ब्रेक्स, सीट बेल्ट्स आणि टायर्स चांगल्या चालू स्थितीत न ठेवणे; वाहन वापरातून काढून घेण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे; आणि डॅशबोर्डमधील चेतावणीच्या लाइट्सकडे दुर्लक्ष करणे.

  • आमचा प्लॅटफॉर्म शक्य तितक्या व्यवस्थितपणे आणि सुरक्षितपणे चालवण्यासाठी, आम्ही आमच्या नियमांचे पालन करण्यासाठी आणि फसवणुकीच्या ॲक्टिव्हिटीजपासून दूर राहण्यासाठी Uber प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या प्रत्येकावर अवलंबून असतो. आम्ही Uber वापरणाऱ्या प्रत्येकावर परिणाम करणारी फसवणूक रोखण्यासाठी आणि शोधून काढण्यासाठी नेहमीच काम करत असतो.

    आमच्या नियम आणि अटींचे उल्लंघन करणारी फसवणुकीची ॲक्टिव्हिटी शोधण्यासाठी Uber स्वयंचलित आणि मॅन्युअल प्रणालींवर अवलंबून असते ज्यात फसवणूक तज्ज्ञांद्वारे आढावा घेणे समाविष्ट आहे. काही प्रकरणांमध्ये, अशा ॲक्टिव्हिटीमुळे युजरचे खाते डिॲक्टिव्हेट केले जाऊ शकते.


    ज्यांच्यामुळे खाते डिॲक्टिव्हेट केले जाऊ शकते अशा फसवणुकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत परंतु हे त्यापुरते मर्यादित नाही:

    • जाणूनबुजून ट्रिपची वेळ किंवा अंतर वाढवणे
    • ट्रिपच्या विनंत्या पूर्ण करण्याचा हेतू नसताना त्या स्वीकारणे, यामध्ये युजर्सना रद्द करण्यास भाग पाडणे समाविष्ट आहे
    • बनावट, डुप्लिकेट किंवा अन्यथा अयोग्य खाती तयार करणे
    • अनावश्यक फी किंवा शुल्क मागणे, जसे की पार्किंग फी भाड्यात समाविष्ट असूनही ती ग्राहकांकडून मागणे
    • फसव्या किंवा बनावट ट्रिप्सची हेतुपुरस्सर विनंती करणे, त्या स्वीकारणे किंवा पूर्ण करणे
    • डिलिव्हरी आयटम पिकअप न करता त्याची डिलिव्हरी पूर्ण करण्याचा दावा करणे
    • डिलिव्हरी आयटम पिकअप करणे परंतु आयटमचा संपूर्ण किंवा काही भाग स्वतःकडे ठेवणे आणि संपूर्ण ऑर्डर डिलिव्हर न करणे
    • प्लॅटफॉर्म आणि जीपीएस प्रणालीच्या सुरळीत कामात व्यत्यय आणणे किंवा त्यात छेडछाड करणे, यामध्ये Uber प्लॅटफॉर्मच्या सुरळीत कार्याला रोखण्यासाठी किंवा त्याला टाळून काम करण्यासाठी अनधिकृत किंवा छेडछाड केलेली डिव्हायसेस, ॲप्स किंवा प्रोग्रॅम्स वापरणे हे समाविष्ट आहे
    • प्रमोशन्स किंवा रेफरल्ससारख्या कोणत्याही कार्यक्रमाचा गैरवापर करणे किंवा त्यांचा त्यांच्या इच्छित हेतूसाठी वापर न करणे
    • फसवणूक करणाऱ्या किंवा बेकायदेशीर कारणांसाठी शुल्कांबाबत विवाद करणे
    • बनावट कागदपत्रे


    फसवणूक करणारी कागदपत्रे
    बदल केलेल्या किंवा चुकीच्या कागदपत्रांना परवानगी नाही.

    फसवणूक करणाऱ्या कागदपत्रांशी संबंधित सामान्य चुकांची उदाहरणे

    • मूळ कागदपत्रांऐवजी फोटोकॉपी, स्कॅन केलेली कागदपत्रे किंवा फोटोंचे फोटो सबमिट करणे
    • कागदपत्रांमध्ये प्रत्यक्ष किंवा डिजिटल स्वरूपात बदल करणे (जसे की काट मारणे/पांढऱ्या रंगाने मिटवणे, अनावश्यक हस्तलेखन आणि इतर बदल)
    • कागदपत्रांचे फोनवरून घेतलेले स्क्रीनशॉट्स सबमिट करणे
    • पूर्णपणे दिसत नसलेले आणि स्पष्ट नसलेले कागदपत्र सबमिट करणे


    ओळखीबाबत फसवणूक
    यामध्ये ड्रायव्हरची खोटी माहिती देणे, दुसर्‍याची ओळख धारण करणे, दुसर्‍या कोणाबरोबर खाते शेअर करणे, स्वतःच्या मालकीची नसलेली वैयक्तिक कागदपत्रे सबमिट करणे किंवा ओळख पडताळणीची तपासणी टाळण्याचा प्रयत्न करणे यांचा समावेश आहे.

    ओळखीबाबत फसवणुकीशी संबंधित सामान्य चुकांची उदाहरणे

    • Uber ला सबमिट केलेले पूर्ण कायदेशीर नाव, जन्मतारीख, ओळख क्रमांक आणि खात्याशी संबंधित इतर माहिती अचूक असल्याची खात्री न करणे
    • ड्रायव्हरने आपण जे नाही आहोत ते कोणीतरी असल्याचे दाखवणे
    • स्वतःची नसलेली आणि त्यांना वापरण्याची परवानगी नसलेली कागदपत्रे सबमिट करणे
    • त्यांचे खाते दुसर्‍या कोणाबरोबर शेअर करणे (रायडर्सच्या सुरक्षिततेसाठी ड्रायव्हर्सना त्यांचे खाते इतर कोणाबरोबर शेअर करण्याची किंवा इतर कोणाला वापरण्यास देण्याची परवानगी नाही)


    फसवणूक करणारी डुप्लिकेट खाती
    अयोग्य डुप्लिकेट खाती तयार करण्यास परवानगी नाही. ड्रायव्हरला त्यांच्या खात्यात साइन इन करताना किंवा प्लॅटफॉर्म वापरताना समस्या येत असल्यास, त्यांनी डुप्लिकेट खाते तयार करण्याऐवजी सहाय्याशी संपर्क साधावा.


    आर्थिक फसवणूक
    फसवणूक करणाऱ्या आर्थिक ॲक्टिव्हिटीमध्ये हेतूपुरस्सर ट्रिपची वेळ किंवा अंतर अयोग्यरित्या वाढवणे किंवा शुल्क आणि प्रमोशन्सचा गैरवापर करणे समाविष्ट आहे, परंतु हे यापुरतेच मर्यादित नाही.

    आर्थिक फसवणुकीशी संबंधित सामान्य चुकांची उदाहरणे

    • रायडर्सना ट्रिप रद्द करण्यास भाग पाडणे
    • ट्रिपची वेळ किंवा अंतर वाढवणे
    • फी किंवा परताव्यासाठी खोटे क्लेम सबमिट करणे किंवा ऑफर्स आणि प्रमोशन्सचा गैरवापर करणे
    • ट्रिपपूर्वी कॉल करणाऱ्या आणि ड्रायव्हरला ॲपवरील ट्रिप रद्द करून (ड्रायव्हरला रोख पैसे देऊन) ती ऑफलाइन करणे यासारख्या, Uber च्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी करायला सांगणाऱ्या रायडर्सना सहकार्य करणे

  • ड्रायव्हर त्यांच्या खात्याचा ॲक्सेस खालील कारणांमुळे गमावू शकतात:

    • वंश, वर्ण, दिव्यांगता, लिंग ओळख, वैवाहिक स्थिती, गरोदर असणे, राष्ट्रीय मूळ, वय, धर्म, लिंग, लैंगिक प्रवृत्ती किंवा संबंधित कायद्यानुसार संरक्षित केलेल्या इतर कोणत्याही वैशिष्ट्याच्या आधारे भेदभाव करणे किंवा आक्षेपार्ह टिप्पणी करणे.
    • व्हीलचेअर्स किंवा इतर सहाय्यक साधनांमुळे रायडर्सना ट्रिप्स नाकारणे किंवा रद्द करणे

    अधिक जाणून घ्या


    भेदभावाशी संबंधित सामान्य चुकांची उदाहरणे

    • व्हीलचेअर्स किंवा वॉकरसारखी इतर सहाय्यक साधने कारमध्ये फिट करण्यात मदत करण्यास नकार देणे. ही साधने अनेकदा घडी करून किंवा डिसअसेंबल करून डिकीमध्ये व्यवस्थित ठेवली जाऊ शकतात.
    • एखाद्या व्यक्तीचा वंश, वर्ण, दिव्यांगता, लिंग ओळख, वैवाहिक स्थिती, गरोदरपणा, राष्ट्रीय मूळ, वय, धर्म, लिंग आणि लैंगिक प्रवृत्ती अशा वैयक्तिक वैशिष्ट्यांच्या आधारे नकारात्मक टिप्पणी करणे.

  • ड्रायव्हर त्यांच्या शहरातील किमान सरासरी रेटिंगपेक्षा कमी असलेल्या रेटिंग्जसाठी Uber प्लॅटफॉर्मचा पूर्ण किंवा आंशिक ॲक्सेस गमावू शकतात. त्यांचे रेटिंग किमान मर्यादेच्या जवळ येत असल्यास, आम्ही त्यांना तसे कळवू आणि त्यांना रायडर्सकडून मिळणारे त्यांचे रेटिंग सुधारण्यात मदत करू शकेल अशी माहिती शेअर करू शकतो.


    ड्रायव्हर्ससाठी संसाधने
    ड्रायव्हर रेटिंग्ज ही रायडर्सनी दिलेल्या शेवटच्या 500 रेटिंग्जची सरासरी असतात. काही गोष्टी ड्रायव्हरच्या नियंत्रणाबाहेर असतात आणि त्या त्यांच्या रेटिंगवर परिणाम करू शकतात हे आम्हाला समजते. आम्ही अत्यधिक नकारात्मक किंवा पूर्वग्रहदूषित रायडर्सनी दिलेल्या रेटिंग्ज आणि ड्रायव्हरच्या नियंत्रणाबाहेरच्या बाबींवरील अभिप्राय असलेल्या रेटिंग्ज वगळण्यासाठी एक प्रणाली तयार केली आहे. येथे अधिक जाणून घ्या.

    ड्रायव्हर्स रायडर्सकडून मिळणाऱ्या कमी रेटिंग्ज कशा टाळू शकतात
    ड्रायव्हर्स एक कोर्स करून राईड्स देण्याचा ॲक्सेस पुन्हा कसा मिळवू शकतात


  • या पृष्ठावर ड्रायव्हर्स त्यांच्या खात्याचा ॲक्सेस का गमावू शकतात याची सामान्य कारणे दिली गेली आहेत. प्लॅटफॉर्मचे सर्व युजर्स (रायडर्ससह) अशा कारणांनी ॲक्सेस गमावू शकतात. सर्व युजर्ससाठी खात्याचा ॲक्सेस गमावण्याबद्दल अधिक माहितीसाठी आमची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे पहा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • तुम्हाला प्लॅटफॉर्मवरून नाकारले गेले असल्यास ॲपवर एक लाइव्ह पुनरावलोकन केंद्र आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आढावा घेण्याची विनंती करून व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्ज तसेच फोटोजसह संबंधित सहाय्यक माहिती अपलोड करणे निवडू शकता.

  • एजंट्स Uber ॲपद्वारे केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग्जचा आढावा घेऊ शकतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथे आढावा घेण्याची विनंती करू शकता आणि व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्ज तसेच फोटोजसह संबंधित सहाय्यक माहिती अपलोड करणे निवडू शकता.

  • आढावा घेण्यासाठी लागणारा वेळ प्रत्येक प्रकरणानुसार वेगवेगळा असू शकतो. ड्रायव्हरने आढावा घेण्याची विनंती सबमिट केल्यावर, त्यांना प्रक्रियेसाठी लागणारा अपेक्षित वेळ आणि स्थितीबद्दल सूचित केले जाईल. आढावा घेणे सुरू असताना खाती डिॲक्टिव्हेटेड ठेवली जातात.

  • नाही. आम्ही अनेकदा दुसरी बाजू घेतो असे ड्रायव्हर्सना वाटते हे आम्हाला ठाऊक आहे, परंतु Uber वापरणारा प्रत्येकजण एकसारख्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतो. परतावा किंवा सूट मिळवण्यासाठी काही लोक आमच्या रेटिंग आणि ग्राहक सहाय्य प्रणालींचा गैरवापर करू शकतात हे दुर्दैवाने खरे आहे. अशा ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आणि खाते डिॲक्टिव्हेट करण्याच्या निर्णयांमध्ये त्यांच्या आरोपांचा विचार केला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही योग्य त्या प्रक्रिया राबवल्या आहेत.

धोरणाची उल्लंघने: या पृष्ठावर खात्याचा ॲक्सेस गमावण्याची सामान्य कारणे दिली गेली आहेत, परंतु एखाद्या ड्रायव्हरने Uber सोबतच्या त्यांच्या करारातील कोणत्याही अटींचे, किंवा समुदाय मार्गदर्शक तत्त्वांसह लागू असलेल्या कोणत्याही अटी किंवा धोरणांचे उल्लंघन केल्यास ते Uber प्लॅटफॉर्मचा सर्व किंवा आंशिक ॲक्सेस गमावू शकतात. ड्रायव्हरला येणे बाकी असलेल्या कोणत्याही रकमेमधून प्लॅटफॉर्मच्या गैरवापराशी संबंधित नुकसान वजा करण्याचा, भरपाई करण्याचा किंवा वसूल करण्याचा तसेच योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. अयोग्य वर्तनाचा संशय आल्यास ज्या रकमांमधून कपात केली जाऊ शकते, भरपाई किंवा शुल्क आकारले जाऊ शकते त्यांची उदाहरणे फी, प्रमोशन्स, रेफरलची मूल्ये, प्रमोशनल कोड्स, ट्रिपची भाडी, ट्रिपच्या अ‍ॅडजस्टमेंटची भाडी, रद्द करण्याची फी, प्रमोशनल ट्रिपची भाडी आणि इतर पेमेंट्स ही आहेत, परंतु ती तेवढीच मर्यादित नाहीत.