Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

ऑडिओ रेकॉर्डिंग

प्रत्येकाला आत्मविश्वासाने राईड करण्याचा आणि गाडी चालवण्याचा अधिकार आहे, हे आम्ही समजतो. यामुळे'च आम्ही तंत्रज्ञान विकसित करण्यावर आणि आमच्या राइड्स अधिक सुरक्षित बनवण्यासाठी नव्या पद्धती शोधण्यावर लक्ष केंद्रित करतो.

सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देतो

तुम्हाला राईड दरम्यान अस्वस्थ वाटत असल्यास, तुम्ही आता अ‍ॅपमधूनच ट्रिपचा ऑडिओ रेकॉर्ड करू शकता.

ऑडिओ रेकॉर्डिंग पर्याय अ‍ॅक्सेस करण्यासाठी सुरक्षा वैशिष्ट्य शील्डवर क्लिक करा. ट्रिप अ‍ॅपमध्ये रेकॉर्ड केली जाईल आणि राईड संपल्यानंतर तुम्ही ते Uber सह शेअर करण्याचे निवडू शकता.

तुमची गोपनीयता संरक्षित केलेली आहे

वाहनातील दुसऱ्या पक्षाला सूचित केले जाणार नाही. सर्व ऑडिओ कूटबद्ध आहे आणि तुमच्या डिव्हाइसवर राहतो. ड्रायव्हर्स किंवा रायडर्स दोघेही रेकॉर्डिंग ऐकू शकत नाहीत.

तपास करण्यात Uber ला मदत करा

आम्ही सुरक्षासंबंधी अहवालांकडे गंभीरपणे लक्ष देतो. तुम्ही एखादी तक्रार दाखल केल्यास, सुरक्षा टीम तुम्ही जोडलेल्या रेकॉर्डिंगचे परीक्षण करते.

नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न

  • ऑडिओ रेकॉर्डिंग ही ट्रिपदरम्यान सुरक्षित, आरामदायक परस्परसंवादांना चालना देण्यासाठी डिझाइन केलेली ॲपमधील एक नवीन क्षमता आहे. रेकॉर्डिंग्ज फक्त वापरकर्त्यांद्वारे सक्रिय केली जाऊ शकतात आणि डिव्हाइसवर सुरक्षितपणे स्टोअर केली जाऊ शकतात. ती ऐकली जाऊ शकत नाहीत आणि फक्त Uber च्या अ‍ॅपद्वारे पाठवलेल्या सुरक्षा अहवालामध्ये जोडली जाऊ शकतात. जोपर्यंत असे केले जात नाही तोपर्यंत, Uber कोणत्याही प्रकारचा कंटेंट ॲक्सेस करू शकत नाही.

  • हे सुरक्षा टूलकिटद्वारे उपलब्ध आहे, जे ट्रिप घेताना नकाशावरील शील्ड चिन्हावर टॅप करून आढळू शकते.

    आम्ही सध्या रायडर्ससाठी ऑडिओ रेकॉर्डिंग वैशिष्ट्य अपडेट करत आहोत. ते येत्या आठवड्यात पुन्हा उपलब्ध होईल

  • हे वैशिष्ट्य उपलब्ध असलेल्या काही निवडक शहरांमध्ये, रायडर्स आणि ड्रायव्हर्स त्यांच्या स्वतःच्या स्मार्टफोनद्वारे रेकॉर्डिंग सुरू करू शकतात. वाहनातील दुसऱ्या पक्षाला याबाबत सूचित केले जाणार नाही, मात्र ही क्षमता उपलब्ध असल्याची सूचना सर्व रायडर्स आणि ड्रायव्हर्सना देण्यात आली आहे.

  • रायडर्स आणि ड्रायव्हर्स दोघेही स्वतंत्रपणे त्यांच्या डिव्हाइसद्वारे रेकॉर्ड करण्याचे निवडू शकतात. रेकॉर्डिंग सुरक्षा अहवालामध्ये जोडले असेल तरच Uber ते ऐकू शकते. कायदेशीररीत्या आवश्यक असल्यास Uber कायदा अंमलबजावणी यांसारख्या एखाद्या सक्षम प्राधिकरणाला ही शेअर केलेली रेकॉर्डिंग देऊ शकते.