मुख्य सामग्रीवर जा

सर्वांसाठी सुरक्षितता आणि आदर

Uber'ची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे  

 

प्रत्येक अनुभव सुरक्षित, सन्माननीय आणि सकारात्मक वाटण्यात मदत करण्यासाठी आमची मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली गेली.

कार्यक्षेत्राप्रमाणे लागू असल्यानुसार, ड्रायव्हर्स, रायडर्स, डिलिव्हरी पार्टनर्स, Uber Eats वापरकर्ते, व्यापारी आणि Uber ची कोणतीही उत्पादने वापरणारे व्यवसाय यांसह परंतु त्यापुरते मर्यादित नसलेल्या आमच्या सर्व ऍप्सवर Uber खात्यासाठी साइन अप करणार्‍या प्रत्येकाने मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करावे अशी अपेक्षा आहे. ते ऑनलाइन सिस्टम किंवा फोनद्वारे ग्रीनलाइट हबमधील Uber कर्मचारी आणि कंत्राटदारांशी केलेल्या परस्पर संवादांवर देखील लागू होतात.

तुमच्या निवडींचे सामर्थ्य

लाखो लोकांना दररोज Uber वापराचा चांगला अनुभव येतो. हे सकारात्मक संवाद आपण कोण आहोत हे स्पष्ट करण्यात मदत करतात. Uber ला एक सुरक्षित आणि स्वागतार्ह समुदाय बनवण्यात मदत करण्याची निवड केल्याबद्दल आभार.

तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे

अनुभव चांगला असो वा वाईट, तो आम्हाला सांगणे हे आम्ही तुमच्यासाठी सोपे करत असतो. आमची टीम सातत्याने आमच्या मानकांमध्ये सुधारणा करत आहे आणि तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे आम्ही योग्य ती कृती करू शकतो आणि आमचे तंत्रज्ञान जसजसे विकसित होते त्यानुसार आमची मानके सुसंगत राखू शकतो.

हे पृष्ठ Uber च्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे सारांश देण्यासाठी एक संसाधन म्हणून आहे. आमची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे तपशीलवार वाचण्यासाठी, येथे जा. रायडर्स त्यांच्या वापर अटींमध्ये येथे ऍक्सेस करू शकतात. ड्रायव्हर्स Uber सोबत असलेल्या त्यांच्या कायदेशीर करारनाम्यात येथे ऍक्सेस करू शकतात.

आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांपैकी एकाही तत्त्वाचे अनुसरण न केल्यास तुमचा Uber खात्यामधील ऍक्सेस गमावला जाऊ शकतो. ज्या कृतींमुळे Uber समुदायाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होतो किंवा Uber च्या ब्रॅंडला, प्रतिष्ठेला किंवा व्यवसायाला हानी पोहचते असे आम्ही निर्धारित केल्यास, तुम्ही ऍपच्या बाहेर करत असलेल्या त्या काही कृतींचा समावेश यात असू शकतो.