Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

वर्णद्वेषाबद्दल शून्य सहनशीलता

आपल्या जगामध्ये वर्णद्वेष आणि भेदभावाला स्थान नाही — त्यांच्याशी लढण्यासाठी आम्ही या गोष्टी करत आहोत.

1 कोटी विनामूल्य राईड्स, मील्स आणि डिलिव्हरीज ऑफर करण्याबद्दल आम्हाला अभिमान असला तरी, आमच्या असे लक्षात आले की महामारीखेरीजही अशी काही संकटे आहेत जिथे आम्ही लक्ष देणे आवश्यक आहे. 2020 च्या उन्हाळ्यात ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर निषेध आंदोलनाच्या वेळी आम्ही कृष्णवर्णीय समुदायाच्या बाजूने उभे राहिलो आणि फक्त समानतेच्या बाजूने उभी राहण्याचीच नाही तर एक सक्रिय वर्णद्वेष-विरोधी कंपनी बनण्याची प्रतिज्ञा घेतली. आमच्या प्लॅटफॉर्मवर आणि आमच्या कंपनीमध्ये प्रत्येकाला मुक्तपणे आणि सुरक्षितपणे हालचाल करता येईल हे सुनिश्चित करणे हे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी, आम्ही हे महत्त्वपूर्ण काम पुढे नेण्याकरता 14 सार्वजनिक वचनबद्धता जाहीर केल्या.

याव्यतिरिक्त, सर्वांना सर्वत्र आपलेपणाची भावना मिळावी यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यासाठी आम्ही उत्पन्नातील समानतेपासून ड्रायव्हर्स, डिलिव्हरी व्यक्ती आणि ग्राहक सहाय्य कर्मचारी यांना त्यांच्या कारकिर्दीतील प्रगतीसाठी मार्ग निर्माण करून देणे यापर्यंत अनेक उपाय योजत असतो. आमच्या प्रगतीबद्दल पारदर्शकता ही आमच्यासाठी मूलभूत गोष्ट आहे.

आज जगाला जी वांशिक न्याय चळवळ पहायला मिळते आहे, तिचे Uber समर्थन करत आहे.

वर्णद्वेष-विरोध आणि अजाणतेपणी होणाऱ्या पक्षपाताबद्दल नवीन संसाधने तयार करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही तज्ज्ञांनादेखील पाचारण केले आहे आणि ती ड्रायव्हर्स आणि रायडर्सना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भेदभावाबद्दल शून्य सहिष्णुता, ग्राहक सहाय्य टीमसाठी विशेष प्रशिक्षण आणि अ‍ॅपवर अनुचित घटनांची नोंद करण्यात अधिक सुलभता यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

समान हक्कांचे समर्थन करण्यासाठी आम्ही अनेक नवीन कार्यक्रम आणि संसाधने विकसित करत आहोत आणि काही प्रमुख संस्थांना सहाय्य करत आहोत. समानतेच्या आमच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आम्ही ज्या 3 संघटनांसह काम करत आहोत त्या या आहेत:

सेंटर फॉर पोलिसिंग इक्विटी (यूएस)

पोलिसांच्या वर्तनाचे मूल्यांकन आणि धोरणांमध्ये सुधार व्हावा यासाठी आम्ही पोलिसांसोबतच्या त्यांच्या कामाला सहाय्य करत आहोत, जेणेकरून पोलिसिंगमधील पक्षपातीपणा - ज्यामुळे अनेकदा मृत्यू होतात आणि तुरुंगवास घडतात - थांबवला जाऊ शकेल. ब्युरो ऑफ जस्टिस स्टॅटिस्टिक्सच्या संशोधनात असे दिसून आले आहे की अमेरिकेत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी गौरवर्णीय लोकांच्या तुलनेत कृष्णवर्णीय लोकांविरुद्ध बळाचा वापर करण्याची शक्यता 2 ते 4 पट जास्त आहे.

होलाबॅक! (यूएस)

आम्ही एशियन अमेरिकन्स अ‍ॅडव्हान्सिंग जस्टिस (एएएजे) शी भागीदारी करून त्यांच्या एएपीआय छळ-विरोधी प्रशिक्षण कार्यक्रमांना (2021 या संपूर्ण वर्षासाठी) निधी देणार आहोत. आम्ही अमेरिकेत Uber सह गाडी चालवणारे, डिलिव्हर करणारे, राईड करणारे, खाणारे आणि काम करणारे यांना उपलब्ध असेल असे त्रयस्थ दर्शक हस्तक्षेप शिक्षण तयार करून आमची ही भागीदारी आणखी घट्ट करत आहोत.

प्रिझन रिफॉर्म ट्रस्ट (यूके)

आम्ही एक न्याय्य, मानवी आणि प्रभावी दंड व्यवस्था तयार करण्याच्या त्यांच्या कार्यास समर्थन देत आहोत. त्यांचे काम यूकेमधील गुन्हेगारी न्याय व्यवस्थेतील वांशिक विषमतेचा सामना करते. कारागृहात आणि तिथपर्यंतचा प्रवास, अशा दोन्हींमध्ये कृष्णवर्णीयांच्या बाबतीत प्रमाणाबाहेर निष्कर्षांवर उपाययोजना करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

गरीबीला आव्हान देणे, वांशिक न्यायासाठी लढा देणे आणि सर्वत्र न्याय्य वागणुकीचा पुरस्कार करण्यासाठी या संघटनांना त्यांच्या दैनंदिन कामात सहाय्य करत असतानाच समानतेचे ध्येय पुढे नेण्यासाठी आम्ही आमचे ज्ञान आणि नेटवर्क यांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो.

कृष्ण‍वर्णीयांच्या-मालकीच्या रेस्टॉरंट्सना सहाय्य करण्याच्या आमच्या कार्याबद्दल येथेअधिक जाणून घ्या, आणि आमच्या वर्णद्वेष-विरोधी वचनबद्धता येथेपहा.

प्रभाव कार्याबद्दल अधिक वाचा

आमच्या वचनबद्धता

सर्वांसाठी हालचाल समान करत आहोत.

हार्लेम, न्यूयॉर्कमधील पॉप-अप रेस्टॉरंट्स

कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सना हिवाळ्यातील महिन्यांमध्ये त्यांचे काम चालू ठेवण्यासाठी मदत करत आहोत.

वॉशिंग्टन, डीसीमधील पॉप-अप रेस्टॉरंट्स

कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सना त्यांचा व्यवसाय नव्या परिसरांमध्ये विस्तारित करण्यास सक्षम करत आहोत.