मुख्य सामग्रीवर जा

तुमच्या कारच्या डिस्प्लेवर ड्रायव्हर अ‍ॅपचा आनंद घ्या

CarPlay किंवा Android Auto शी कनेक्ट करा आणि अधिक सुलभ ड्रायव्हिंग अनुभवासाठी, मोठ्या स्क्रीनवर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनचा आनंद घ्या तसेच ट्रिप स्वीकारण्याची सुविधा मिळवा.

 

तुम्ही तुमच्या कार डिस्प्लेसह हे करू शकता

वर्दळ असलेली क्षेत्रे शोधा

थेट तुमच्या कार डिस्प्लेवर हीटमॅपसह व्यस्त क्षेत्रांचा अधिक चांगला व्ह्यू मिळवा, जेणेकरून ट्रिप विनंत्या मिळवण्यासाठी कुठे जायचे हे जाणून घेणे सोपे होईल.

ट्रिप विनंत्या स्वीकारा

तुम्ही 'एक्सक्लुझिव्ह' आणि 'ट्रिप रडार' विनंत्या पाहू शकता आणि त्या स्वीकारू शकता. असे केल्यावर, तुम्हाला ट्रिपचा तपशील—जसे की आगाऊ भाडे*, ड्रॉप-ऑफची वेळ आणि अंतर—थेट तुमच्या कारच्या डिस्प्लेवर दिसेल.

आत्मविश्वासाने नेव्हिगेट करा

त्यापुढील सूचनांचे पालन करा आणि रस्त्यांची नावे, थांब्याची चिन्हे आणि रहदारी दिवे मोठ्या स्क्रीनवर पहा—जेणेकरून तुम्ही मार्ग अपडेट्स पहात हँड्स - फ्री अनुभवाचा आनंद घेऊ शकाल.

रायडरचा विश्वास संपादित करा

तुम्ही तुमच्या फोनवर तुमचे वैयक्तिक तपशील खाजगी ठेवत असताना प्रवासी त्यांचा मार्ग मोठ्या स्क्रीनवर पाहू शकतात.

इतर ड्रायव्हर आणि कुरिअर काय म्हणत आहेत ते ऐका

"नेव्हिगेशन पाहणे आणि त्याचे अनुसरण करणे सोपे करते"

मार्शल ओ. यांना ही गोष्ट आवडते की, CarPlay त्यांना “वळणे आणि गंतव्यस्थानांचा आधीच अंदाज घेण्यास” मदत करते, ज्यामुळे ते आपले लक्ष “रस्त्यावर” केंद्रित ठेवू शकतात.

“प्रवाशांना हे आवडते”

डारिया आर. यांना आपल्या ग्राहकांशी “अधिक संवाद साधायला” आणि त्याच वेळी “पुढील दिशा स्पष्टपणे पाहायला” आवडते.

"CarPlay वरील Driver अ‍ॅपमुळे माझा अनुभव सुधारला आहे"

कॉन्स्टन्स एस. यांच्या मते, "जेव्हा सर्व माहिती CarPlay स्क्रीनवर असते, तेव्हा दिशा अधिक स्पष्टपणे पाहणे सोपे जाते."

सुलभ सेटअप सूचना

  1. तुमचा अँड्रॉइड फोन किंवा आयफोन तुमच्या कारच्या डिस्प्लेशी वायरलेस पद्धतीने किंवा केबलच्या साहाय्याने जोडा.
  2. तुमचा फोन पेअर झाल्यानंतर Android Auto किंवा CarPlay आपोआप सुरू व्हायला हवे. जर तसे होत नसेल, तर सुरुवात करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा.
  3. तुमच्या फोनवरील ड्रायव्हर ॲप उघडा, त्यानंतर तुमच्या कारच्या डिस्प्लेवर ड्रायव्हर' ॲप शोधा आणि निवडा.
  4. एकदा Uber नकाशा उघडला की, व्यस्त भाग पाहण्यासाठी आणि विनंत्या स्वीकारण्यास सुरुवात करण्यासाठी तुमच्या कारच्या डिस्प्लेवरील गो ऑनलाइन वर टॅप करा.

तुमच्या टेस्ला डिस्प्लेवरून नेव्हिगेट करण्याचा प्रयत्न करत आहात?

तुमच्या टेस्लाच्या मोठ्या स्क्रीनवर अधिक स्पष्ट आणि सोयीस्कर नेव्हिगेशनचा आनंद घ्या, तसेच बॅटरीच्या क्षमतेचा विचार करून सुचवल्या जाणाऱ्या पर्यायांमुळे रेंजबाबतची चिंता कमी करा.

ॲपल CarPlay आणि Android Auto मध्ये आगाऊ भाडे, ड्रॉप ऑफ वेळ आणि अंतर केवळ अशा बाजारपेठांमध्येच दिसतात, जिथे ड्रायव्हर्स आणि कुरिअर्सना सध्या या तपशीलांचा ॲक्सेस उपलब्ध आहे.