नवीन ड्राइवर ॲप सादर करत आहोत, रस्त्याने प्रवास करताना तुमचा भागीदार
नवीन ड्राइवर ॲप रिअल-टाइम माहिती देऊन स्मार्ट पद्धतीने कमाई करण्यात तुमची मदत करते. वापरण्यास सोपे आणि जास्त विश्वसनीय असे हे ॲप—तुम्हाला सर्व प्रकारचे सहाय्य देते— अगदी तुमच्या भागीदारासारखे.
गर्दी असताना कुठे गाडी चालवायची याबाबत सूचना मिळवा
तुमच्या नकाशावर जवळपासच्या आणखी ट्रिप्स शोधण्यासाठी टॅप करा आणि ॲपला तुम्हाला तिथपर्यंत मार्गदर्शन करण्यास सांगा.
तुम्ही पुढे कुठे जाऊ शकता ते जाणून घ्या
जेव्हा तुम्ही गर्दीच्या भागात असाल तेव्हा तुमच्या नकाशाच्या स्क्रीनवर तळाशी असलेल्या स्टेटस बारमुळे तुम्हाला ते कळून येईल. त्यामुळे, थांबायचे की गाडी चालवणे सुरू ठेवायचे याबाबत तुम्हाला माहितीवर आधारित निर्णय घेता येइल.
तुमची कमाई एका नजरेत कशी ट्रॅक करायची
तुमचे दैनिक आणि साप्ताहिक लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने तुमची प्रगती सुलभपणे ट्रॅक करा. तुम्ही तुमच्या कमाईचा सारांश देखील फक्त एका टॅपने पाहू शकता.
कमाईचा ट्रॅक कसा ठेवायचा: तुमच्या कमाईच्या स्क्रीनवर भाडे चिन्हावर टॅप करा, त्यानंतर तुमच्या कमाईची पाहणी करण्यासाठी उजवीकडे आणि डावीकडे स्वाईप करा.
तुमच्या दिवसाची सुलभपणे आखणी करा
तासानुसार ट्रेंड्स पहा, प्राधान्ये ठरवा आणि प्रमोशन्स पहा—सर्व काही एकाच जागी.
ट्रिप प्लॅनर कसा शोधायचा: तुमच्या नकाशा स्क्रीनवर तळाशी डावीकडे बाणाच्या चिन्हावर टॅप करा. डिलिव्हरी भागीदारांसाठी, हे वैशिष्ट्य तुमच्या ॲपमध्ये लवकरच उपलब्ध होईल.
तुमच्याकडे सेवा नसेल तेव्हा देखील ॲपवर विसंबून रहा
तुमचे कनेक्शन गेले आहे? काहीही झाले तरी तुम्ही ट्रिप्स चालू आणि समाप्त करू शकता.
अद्ययावत रहा
आगामी कार्यक्रम आणि कमाईच्या संधी पासून ते तुमच्या खात्यविषयीची माहिती आणि नवीन वैशिष्ट्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीबाबत मेसेज मिळवा.
सूचना कशा शोधायच्या: तुम्हाला कधीही नवीन मेसेज आला की तुमच्या नकाशाच्या स्क्रीनवर सर्वात वर उजव्या कोपऱ्यातील तुमच्या फोटोवर एक बिल्ला दिसेल. ते वाचण्यासाठी त्यावर टॅप करा.
अॅप कसे वापरायचे ते जाणून घ्या
ही तुमची पहिली ट्रिप असू दे किंवा 100वी, तुमच्याकडे आता टिप्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओंनी भरपूर गो-टू हे साधन आहे.
ड्राइवर ॲप मूलभूत माहिती कशी शोधायची: तुमच्या नकाशाच्या स्क्रीनवर सर्वात वर उजवीकडे तुमच्या फोटोवर टॅप करा. त्यानंतर खाते च्या वर असलेल्या मदत वर टॅप करा.
जास्त कमाईवर नेव्हिगेट करा
बूस्ट भागावर टॅप करा, येथे तुम्ही तुमच्या स्टॅंडर्ड भाड्यापेक्षा जास्त कमाई करू शकता आणि ॲप तुम्हाला विचारेल की तुम्हाला तिथून नॅव्हिगेट करायचे आहे का.
ड्रायव्हर अॅप कसे कार्य करते
ऑनलाइन जाणे
ड्रायव्हर अॅप नेहमीच उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही जेव्हाही गाडी चालवण्यास किंवा डिलिव्हरी करण्यास तयार असाल तेव्हा अॅप उघडा आणि GO वर टॅप करा.
ट्रिप आणि डिलिव्हरीच्या विनंत्या स्वीकार करणे
ऑनलाइन गेल्यावर तुम्हाला आपोआप तुमच्या भागातील विनंत्या मिळायला लागतील. तुमचा फोन आवाज देईल. स्वीकार करण्यासाठी स्वाईप करा.
प्रत्येक वळणावर दिशानिर्देश
अॅपमुळे तुमच्या ग्राहकाला शोधणे आणि त्याच्या अंतिम ठिकाणावर जाणे सोपे होते.
प्रत्येक ट्रिपमधून कमाई
प्रत्येक ट्रिपनंतर तुम्ही किती कमाई केली आहे ते पहा आणि तुम्ही तुमचे दैनिक आणि साप्ताहिक कमाई लक्ष्य गाठता आहात की नाही ते ट्रॅक करा. कमाई आपोआप दर आठवड्याला तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर होते.
रेटिंग सिस्टिम
रायडर्स, ड्रायव्हर्स तसेच इतर ग्राहकांना प्रत्येक ट्रिपबाबत प्रतिसाद देण्यास सांगितले जाईल.
वैशिष्ट्यांची उपलब्धता तुमचे शहर आणि प्रदेश यानुसार बदलू शकते.
कंपनी