पेमेंट्स कशी काम करतात
तुम्ही Uber सह गाडी चालवत असताना, कुठल्याही कागदपत्राशि'वाय तुमची कमाई आपोआप ट्रान्सफर केली जाते. बँक खाते कसे जोडायचे आणि कॅश आऊट कसे करायचे ते जाणून घ्या.
डिलिव्हरीविषयी माहिती शोधत आहात का?
बँक ट्रान्सफर कसे सेट अप करावे
1. अॅप वापरा किंवा ऑनलाइन साइन इन करा
ड्रायव्हर अॅपमध्ये तुमचे बँक खाते जोडण्यासाठी अॅप मेनूमध्ये पेमेंट वर जा. किंवा, drivers.uber.com ला भेट द्या, साइन इन करा आणि तुमच्या डॅशबोर्डमधील बँकिंग टॅबवर जा.
2. तुमचे बॅंक तपशील जोडा
तुमच्या बँकेचा तपशील, संपूर्ण पत्ता आणि जन्मतारीख तुमच्या अलीकडील बँक स्टेटमेंटमध्ये नमूद असल्याप्रमाणेच भरा. कोणतेही तपशील चुकीचे असल्यास, तुमची रक्कम जमा करण्यात विलंब होऊ शकतो.
3. तुमची बँक खाते माहिती सापडत नाही का?
तुम्हाला तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये तुमच्या बँकेचे तपशील दिसतील. तुम्हाला काही अतिरिक्त प्रश्न असल्यास, तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता.
Uber ला पेमेंट कसे सबमिट करायचे
तुम्ही घेतलेल्या पैशाचा एक भाग तुमच्यासाठी असला तरी दुसरा भाग Uber ला देणे गरजेचे आहे. Uber पार्टनर अॅपमधील व्यवहार अॅक्टिव्हिटी स्क्रीनवर तुम्ही Uber ला देणे लागत असलेल्या पेमेंटचा ट्रॅक ठेवू शकता.
पैसे परत करण्याचा पेमेंट पर्याय आणि सेट अप कसे करावे याबद्दल जाणून घेण्यासाठी खाली वाचा.
1. ऑनलाइन पेमेंट करा
पायर्या
अॅपमध्ये बाकी असलेल्या पेमेंटच्या सूचनेवर क्लिक करून कुठूनही अॅपमध्ये ऑनलाइन जा
तुम्ही ऑनलाइन पेमेंट केल्यास, तुमच्या खात्यात त्वरित पेमेंट अॅडजस्ट केले जाईल आणि 15-30 मिनिटात तुमचे फ्लीट पुन्हा सक्रिय केले जाईल.
किंवा
- कृपया गूगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून भिम अॅप डाउनलोड करा.
- भिम अॅप उघडा
- कृपया तुमची इच्छित भाषा भिम अॅपवर निवडा
- कृपया तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेल्या ओटीपीची पडताळणी करा. ओटीपीची विनंती अॅपमधून केली जाते आणि अॅपमध्ये आपोआप मिळते. ओटीपी स्वतः टाकण्याची गरज नाही. पुढील वर क्लिक करा
- कृपया ज्या बँकेत तुमचे सक्रिय बँक खाते आहे ते निवडा आणि तीच बँक तुमच्या Uber खात्याशी लिंक केलेली असल्याची खात्री करून घ्या
- यूपीआय पिन व्यवहार प्रमाणीकरणासाठी वापरला जातो.
- तुम्ही अन्य कोणत्याही यूपीआय सक्षम अॅपमध्ये यूपीआय पिन सेट केला असल्यास तुम्ही तोच यूपआय पिन भिम अॅपमध्ये देखील वापरू शकता.
- पुढील पायरीमध्ये, कृपया तुमच्या डेबिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि मुदत संपण्याची तारीख टाका. ठीक आहे वर क्लिक करा.
- बॅंक ओटीपीची विनंती अॅपमधून केली जाते आणि अॅपमध्ये आपोआप मिळते. ओटीपी स्वतः टाकण्याची गरज नाही.
- कृपया तुमचा नवीन यूपीआय पिन (एमपिन) सेट करा. पुष्टी करण्यासाठी कृपया यूपीआय पिन पुन्हा प्रविष्ट करा. तुमची अॅप नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
- भिम अॅप सुरळीतपणे चालू आहे हे सुनिश्चित करण्यासाठी, कृपया अॅपमधून तुमच्या खात्यातील शिल्लक तपासा आणि त्याची पडताळणी करा.
- कृपया तुमचा आभासी पेमेंट पत्ता (व्हीपीए) आयडी किंवा यूपीआय आयडी सेट करण्यासाठी 'प्रोफाइल' पृष्ठावर जा. एक भागीदार एकाच बँक खात्यासाठी दोन आभासी पेमेंट पत्ते सेट करू शकतो.
- भिम अॅपमध्ये 3 पर्याय आहेत - “पाठवा”, “मिळवा” आणि “स्कॅन & पेमेंट करा”
- तुम्हाला ऑनलाइन पेमेंट कसे करावे या संबंधित व्हिडिओसह पुढील 5 मिनिटांत आमच्याकडून मिळेल. तुमचे यूपीआय खाते वापरून ऑनलाइन पैसे कसे भरावे हे समजून घेण्यासाठी कृपया तो पहा.
2. ऑफलाइन पेमेंट करा
पायर्या
- शहरातील रोख रक्कम संकलन केंद्रांबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया येथे जा:
- अॅप मधील मदत विभाग >> अॅप वापरणे >> पेमेंट मदत >> केंद्र यादी
- शहरातील सर्व रोख रक्कम संकलन केंद्र असलेला एक गूगल नकाशा उघडेल
- तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रावर क्लिक करू शकता आणि त्या केंद्रावर नॅव्हिगेट करू शकता
- तुम्ही व्यापाऱ्याला रोख रक्कम देऊन पेमेंट करू शकता, तुमच्या खात्यात पेमेंट अॅडजस्ट केले जाईल आणि 15-30 मिनिटांमध्ये तुमचे फ्लीट पुन्हा सक्रिय केले जाईल.
- शहरातील रोख रक्कम संकलन केंद्रांबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया येथे जा:
3. भागीदार सेवा केंद्र
पायर्या
- तुमच्या साहाय्यासाठी कृपया भागीदार सेवा केंद्रास भेट द्या:
- स्मार्टफोन
- बँक खात्याचे एटीएम/डेबिट कार्ड
- बँक नोंदणीकृत फोन नंबर सिम
- ते तुम्हाला यूपीआय अॅप इंस्टॉल करण्यात मदत करतील आणि तुम्ही त्याचा वापर करून ऑनलाइन पेमेंट करू शकता. कृपया पेमेंट करण्यासाठी वापरलेले बँक खाते किंवा व्हीपीए यामध्ये पुरेसे पैसे असावेत याची नोंद घ्या.
- तुमचे यूपीआय आयडी भिम अॅपशी लिंक केल्यानंतर, तुम्हाला भविष्यात पेमेंट्स करण्यासाठी पीएसकेमध्ये येण्याची आवश्यकता नाही.
- तुम्ही एजंटला पैसे देऊ शकता, तुमच्या खात्यात पेमेंट अॅडजस्ट केले जाते आणि 24 तासांमध्ये तुमचे फ्लीट पुन्हा सक्रिय केले जाईल.
महत्त्वपूर्ण टीपः
Uber ला पेमेंट देणे लागत असताना तुमच्या खात्यात पुरेसा निधी आहे हे सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यात रोख वितरणातून जमा केलेली रक्कम भरत राहण्याची शिफारस केली जाते. Uber कडून आठवड्यातून एकदा पेमेंट घेतले जाईल.
Uber ला पेमेंट न मिळाल्यास तुम्हाला रोख रकमेच्या डिलिव्हरी ट्रिप्सचा अॅक्सेस गमवावा लागू शकतो. Uber ला एकाधिक पेमेंट्स न मिळाल्यास, तुमचे डिलिव्हरी खाते निष्क्रिय केले जाऊ शकते.
अधिक विषयांची माहिती पहा
या वेबपेजवर दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरात लागू होणार नाही. ती कधीही बदलू शकते आणि कोणतीही सूचना न देता अपडेट केली जाऊ शकते.
कंपनी