मुख्य सामग्रीवर जा

परफिशिएंट Uber for Business सोबत बिजनेस ट्रॅव्हल आणि खर्चाचा हिशोब सोपे करते

कारमध्ये मास्क घालून बसलेली आशियाई महिला

ग्राहकांशी संपर्क करून आणि त्यांचा बिजनेस वाढवण्यासाठी लिडिंग ग्लोबल डिजिटल सल्लागार कंपनी म्हणून, परफिशिएंट दर आठवड्याला शेकडो कर्मचाऱ्यांना ऑटोमोटिव्हपासून हेल्थकेअरपर्यंत विविध उद्योगांतील ग्राहकांना मदत करण्यासाठी पाठवते.

परफिशिएंटचा कॉर्पोरेट ट्रॅव्हल डिपार्टमेंट आपल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास शक्यतो सोपा आणि वेळ प्रोडक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न करते. तसेच ट्रॅव्हल मॅनेजर्सना एक्सपेन्सेस ट्रॅक करण्यासाठी आणि नवीन कर्मचाऱ्यांना ऑनबोर्ड करण्यासाठी एक सोपा पर्याय द्यायचा आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, जेव्हा कंपनीने अधिकृत राइडशेअर पार्टनर शोध घेतला, तेव्हा लगेच Uber चा विचार आला.

“राइडशेअरिंग म्हटल की Uber चे नाव समोर येते आणि त्यांची कस्टमर सर्व्हिस देण्यासाठी असलेली ओळख, अजून चांगले होण्यासाठीचे प्रयत्न, तसेच सहजपणे वापरता येणे यांमुळे ती आमची टॉप चॉईस आहे,” असे परफिशिएंटच्या कॉर्पोरेट ट्रॅव्हल अँड एक्सपेंस मॅनेजर, मॅटी यालाली म्हणतात. “राइडशेअर ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन परफिशिएंटच्या सहका-यांसाठी एक सोयीस्कर पर्याय ठरला आहे.”

Uber for Business मुळे प्रवासातही कर्मचा-यांची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली दिसून येते

कर्मचाऱ्यांकडून Uber for Business चांगला प्रतिसाद मिळाला आहे. "आमच्या काही कर्मचाऱ्यांचा खूप वेळ प्रवासात जातो, Uber मुळे खूप वेळ वाचतो आणि त्रासही खूप कमी होतो," असे यल्लाली सांगतात. “यामध्ये जेव्हा ते प्रवासात आहेत आणि त्यांचे एक्सपेन्स रिपोर्टस तयार करतात या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे.”

कर्मचारी Uber मोबाईल ॲपमधून त्यांच्या बिजनेस आणि पर्सनल अकाऊंटमध्ये टॉगल करून सहजपणे त्यांची वर्क प्रोफाइल ॲक्सेस करतात. ते 70 पेक्षा जास्त देशांमध्ये भाषा किंवा करन्सी या समस्यांच्या चिंतेशिवाय राईड्सची विनंती करू शकतात आणि ती शेड्यूल करू शकतात, तसेच मुख्य खर्च प्रोव्हायडर्सना एकत्र केल्याने ऑटोमॅटिक ई-पावती पाठवू शकतात.

फिडबॅकदेखील सकारात्मक आहेत. "आमच्या कर्मचा-यांना शहरातील अनोळखी रस्ते शोधण्यात वेळ घालवण्याऐवजी Uber ने सेफली प्रवास करत कामावर लक्ष देता येते हे आवडते ," असे यल्लाली सांगतात. “यामुळे केवळ प्रोडक्टिव्हिटी वाढत नाही, तर प्रवासातील ताण काही प्रमाणात कमी करण्यात मदत करू शकते.”

"मी Uber for Business 100% सुचवेन. मी इतर कंपन्यांनाही हे वापरून पाहण्यास सांगेन. मुख्य खर्च व्यवस्थापन प्रोव्हायडर्सना एकत्र केल्याने खर्चाचा रिपोर्ट तयार करण्यासाठी लागणारा बराच वेळ वाचतो."

मॅटी यालाली, कॉर्पोरेट ट्रॅव्हल आणि एक्सपेंस मॅनेजर, परफिशिएंट

ट्रॅव्हल मॅनेजमेंटसाठी आणि राईडच्या विनंती करण्यासाठी एक विशेष प्लॅटफॉर्म

Uber for Business सोबत, यालाली आणि तिची टीम हे करू शकतात:

  • कर्मचा-यांसाठी कस्टमायजेबल ट्रॅव्हल पॉलिसी सेट करा आणि Uber for Businessच्या डॅशबोर्डमधून वापराचे मेट्रिक्स ट्रॅक करा
  • राईडच्या आधीच भरलेल्या पावत्या आणि खर्च कोडच्या सूचना यांच्यासोबत खर्चाचे रिपोर्ट ऑटोमेट करा
  • कॉर्पोरेट कार्ड व्यवहारीशी संबंधित ट्रिप मॅच करा
  • एका क्लिकवर नवीन कर्मचा-यांना सहजपणे ऑनबोर्ड करा
  • Uber for Business आणि एक्सपेन्स इंटिग्रेटर यांच्यामध्ये कर्मचा-यांची लिस्ट ऑटोमेटेड सिंक करून त्यांच्या स्टेटसविषयी अप टू डेट राहा

“मी 100% Uber for Business सुचवेन. मी इतर कंपन्यांनी नक्की वापरून पाहावे,” असे यालाली सांगतात. “मुख्य खर्च व्यवस्थापन प्रोव्हायडर्सना एकत्र केल्याने खर्चाचा रिपोर्ट तयार करण्यासाठी लागणारा बराच वेळ वाचतो.”

Uber for Business हा कोणत्याही साइजच्या कंपन्यांसाठी राईड, मील आणि लोकल डिलिव्हरी करणे या गोष्टी मॅनेज करण्यासाठी ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. Uber for Business मधून बिजनेस ट्रॅव्हल कसे सोपे करून वेळ आणि खर्च वाचवू शकता हे जाणून घेण्यासाठी, हा छोटा फॉर्म भरा.

कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना सहभागी करा

Uber for Business मदतीस येऊ शकते.