Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

आमच्या तिमाही उत्पादन रिलीजमध्ये आमचे ताजे अपडेट्स जाणून घ्या

केवळ बिझनेस प्रोफाइल्ससाठी उपलब्ध असलेले आमचे प्रीमियम राईड पर्याय, कर्मचार्‍यांना फायदेशीर असलेली एक नवीन ऑफर आणि प्रतिनिधी प्रोफाइल्ससाठी सुरळीत ऑनबोर्डिंग यासारखे बिझनेस प्रवासाविषयीचे अपडेट्स जाणून घ्या.

बिझनेस प्रवासाविषयीचे अपडेट्स

Uber Business Black सह एक्झिक्यूटिव्ह्जचा प्रवास अधिक दर्जेदार करा

बिझनेससाठी प्रवास करणाऱ्या आधुनिक प्रवाशांसाठी खास डिझाइन केलेला Uber Business Black हा प्रवासाचा प्रीमियम उपाय सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. Uber Business Black लक्झरीमध्ये तडजोड न करता सुविधा देऊन Uber Black चा अनुभव आणखी दर्जेदार बनवतो. फक्त काही देशांमध्ये उपलब्ध आहे, अधिक जाणून घेण्यासाठी अ‍ॅप तपासा.

कर्मचार्‍यांना Uber चे विशेष लाभ ऑफर करा

युनायटेड स्टेट्समधील, पात्र Uber for Business संस्थेशी जोडलेले कर्मचारी Uber One च्या 3 विनामूल्य महिन्यांचा आनंद घेऊ शकतात, त्यानंतर पुढील 9 महिन्यांसाठी दरमहा $7.99 या दराने त्याचा वापर चालू ठेवू शकतात.* ऑफरचे नियम बदलू शकतात. यामुळे त्यांना बिझनेस राईड्सवर Uber One क्रेडिट्स मिळवण्याची संधी मिळते. हे क्रेडिट्स ते स्वतःसाठी Uber ट्रिप्स आणि Uber Eats च्या ऑर्डर्सवर रिडीम करू शकतात, यासाठी संस्थेला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

एक्झिक्यूटिव्ह्जच्या राईड्सचे नियोजन सहजपणे करा

आता एक्झिक्यूटिव्ह सहाय्यक हे डेस्कटॉपवर किंवा Uber अ‍ॅपवर एक्झिक्यूटिव्ह्जसाठी राईड्सची व्यवस्था सुरळीतपणे करण्यासाठी रायडरचे प्रतिनिधी म्हणून जोडले जाण्याची विनंती करू शकतात. प्रतिनिधी एकापेक्षा जास्त एक्झिक्यूटिव्ह्जसाठी राईड्सची विनंती करू शकतात, त्यात बदल करू शकतात आणि त्या रद्द करू शकतात. राईड्सचे बिल एक्झिक्यूटिव्हच्या पेमेंट पद्धतीवर आपोआप आकारले जाते.**

प्लॅटफॉर्म अपडेट्स

सहाय्यक संसाधने त्वरीत ॲक्सेस करा

मदत पाहिजे? Uber for Business डॅशबोर्डमधील आमचा नवीन चॅटबॉट मदतीसाठी नेहमी हजर आहे. मदत केंद्रातील संबंधित लेख सहजपणे अ‍ॅक्सेस करा किंवा एआय सहाय्यकाकडून मदत मागा. जास्त गुंतागुंतीच्या चौकशीसाठी, तुम्ही लाइव्ह एजंटशी संपर्क साधू शकता.

कर्मचार्‍यांना लिंक करणे आणखी सोपे करा

नवीन क्यूआर कोड जनरेटरमुळे ॲडमिन्स सहजपणे साइन-अप लिंक्स तयार करू शकतात आणि त्या एकाच वेळी अनेक कर्मचार्‍यांशी शेअर करू शकतात. कर्मचारी फक्त स्कॅन करतात, त्यांची माहिती सबमिट करतात आणि संस्थेत सामील होण्याची विनंती करतात. ॲडमिन्स थेट डॅशबोर्डच्या 'लोक' या पृष्ठावरून विनंत्या मंजूर किंवा नामंजूर करू शकतात.

पासकीजच्या मदतीने सुरक्षितता स्वतःच्या ताब्यात ठेवा

2-फॅक्टर ऑथेंटिकेशनचे नवीन स्वरूप असलेल्या पासकीजसह तुम्ही आता तुमच्या डॅशबोर्डमध्ये आणखी जलद लॉग इन करू शकता. तुम्ही पासकी सेट केल्यानंतर, तुमच्या डिव्हाइससाठी वापरता त्याच सुरक्षित साइन-इन पद्धतीसह लॉग इन करू शकता, जसे की फिंगरप्रिंट्स, चेहर्‍याची ओळख किंवा पासकोड.

29 ऑक्टोबर रोजी सखोल माहिती मिळवा

तुम्हाला Uber for Business चा आणखी दर्जेदार अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेल्या ताज्या अपडेट्सची सविस्तर माहिती आमच्या तज्ञांच्या टीमकडून जाणून घेण्यासाठी आमचा व्हर्च्युअल इव्हेंट नक्की पहा. इव्हेंट दरम्यान तुम्हाला रिअल-टाइम ग्राहक सहाय्याचा अ‍ॅक्सेस देखील मिळेल.

आमचे मागील तिमाहींचे उत्पादन रिलीज पहा

देश आणि डिव्हाइसचा प्रकार यांच्यानुसार वैशिष्ट्य आणि उत्पादनाची उपलब्धता बदलू शकते.

*या Uber One ऑफरमध्ये नोंदणी करून, कर्मचारी Uber for Business द्वारे प्रदान केलेल्या सदस्यता स्वयं-नूतनीकरण ऑफरमध्ये नोंदणी करत आहेत. लागू असलेल्या कोणत्याही विनामूल्य चाचणीची मुदत संपल्यानंतर त्यांच्याकडून, नियमांच्या आधारे, मासिक तत्त्वावर, त्यांनी रद्द करेपर्यंत किंवा ऑफर पूर्ण होईपर्यंत दरमहा $7.99 शुल्क आकारले जाईल. ऑफर पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी रद्द करेपर्यंत त्यांच्या मासिक सदस्यतेचे स्वयं-नूतनीकरण $9.99 या दराने केले जाईल. शुल्क टाळण्यासाठी ते त्यांच्या बिलिंग तारखेच्या 48 तास आधीपर्यंत अ‍ॅपमध्ये रद्द करू शकतात. ग्राहक कायद्यांनुसार त्यांच्या अधिकारांच्या अधीन राहून, त्यांचे आवर्ती पेमेंट परत करण्यायोग्य नाही. ऑफर/लाभ केवळ यूएस-स्थित Uber खात्यांसाठी यूएसमध्ये केलेल्या खरेदीवर वैध आहेत. ऑफर बदलाच्या, मर्यादित उपलब्धतेच्या अधीन आहे.

लाभ केवळ Uber One चिन्हाने चिन्हांकित पात्र स्टोअर्स आणि राईड्ससाठीच उपलब्ध. इतर शुल्क आणि कर लागू होतात, परंतु किमान ऑर्डर किंवा Uber One क्रेडिट्स-बॅक लाभांमध्ये मोजले जात नाहीत. सहभागी रेस्टॉरंट्स आणि किराणा नसलेले स्टोअर्स: $0 डिलिव्हरी फी आणि 10% पर्यंतची बचत मिळवण्यासाठी किमान $15 ची ऑर्डर. सहभागी किराणा स्टोअर्स: $0 डिलिव्हरी फी आणि 5% सूट मिळवण्यासाठी किमान $35 ची ऑर्डर. सदस्यता बचती या सेवा शुल्कामधील कपातीच्या स्वरूपात लागू केल्या जातात. पात्र राईड्स पूर्ण केल्यानंतर 6% Uber One क्रेडिट्स कमावता येतील. बदलाच्या अधीन. काही निर्बंध लागू. उपलब्ध ऑफर्ससाठी अ‍ॅप पहा.

नूतनीकरण करण्यायोग्य सदस्यतेचे नियम आणि अटी पहा.

**प्रतिनिधी काही विशिष्ट मार्केट्स आणि लोकेशन्समधील रायडर्ससाठीच ट्रिप्सची विनंती करू शकतील. उपलब्धतेसाठी अ‍ॅप पहा.

अशी वैशिष्ट्ये ज्यांच्यामुळे तुमच्या लोकांना त्यांची कदर केली जाते असे वाटेल

आमची ताजी अपडेट्स तुमच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या लोकांबद्दल कृतज्ञता दाखवण्यासाठी उपयुक्त आहेत. टीम्सना रिवॉर्ड देणाऱ्या आणि कामाच्या ठिकाणी सहजपणे लागू करता येणाऱ्या वैशिष्ट्यांमध्ये नवीन काय आहे ते जाणून घ्या.

आमच्या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये सामील होता आले नाही? तुमच्या संस्थेसाठी जे कोणी महत्त्वाचे आहेत त्यांच्यासाठी ही वैशिष्ट्ये कशी कामी आणायची हे जाणून घेण्यासाठी रेकॉर्डिंग अ‍ॅक्सेस करा.

तुम्हाला आमच्या व्हर्च्युअल इव्हेंट सामील होता आले नसल्यास

आमच्या व्हर्च्युअल इव्हेंट दरम्यान Uber for Business मधील आमच्या तज्ञांनी ताज्या उत्पादन अपडेट्सची सविस्तर माहिती दिली आहे. रेकॉर्डिंग पाहून, तुम्ही हे करू शकता:

  • तुमच्या कर्मचार्‍यांचा कामाच्या ठिकाणाचा अनुभव आणखी दर्जेदार करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या

  • आमची नवीनतम वैशिष्ट्ये तुमच्या संस्थेत सर्वत्र लागू कशी करायची याबद्दल उत्पादन तज्ञांकडून जाणून घ्या

  • तुमचा डॅशबोर्डचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी तयार केलेल्या आमच्या ताज्या प्लॅटफॉर्म अपडेट्सचे प्रात्यक्षिक पहा