शेवटचे बदल केलेले: 13 जुलै, 2026
Uber गोपनीयता सूचना: प्रवासी आणि ऑर्डर प्राप्तकर्ते
जेव्हा तुम्ही Uber वापरता, तेव्हा तुमच्या वैयक्तिक डेटा संदर्भात तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवता. तो विश्वास जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्याची सुरुवात आमची गोपनीयता नियमावली समजून घेण्यात तुम्हाला मदत करण्यापासून होते.
या सूचनेत आम्ही संकलित करत असलेला वैयक्तिक डेटा, तो कशा पद्धतीने वापरला आणि शेअर केला जातो तसेच या डेटा संबंधित तुम्हाला उपलब्ध असलेल्या पर्यायांचे वर्णन केलेले आहे. आमचा गोपनीयता आढावा यासह तुम्ही हे वाचावे असे आम्ही सुचवतो, जे आमच्या गोपनीयता नियमावली विषयीचे मुख्य मुद्दे हायलाइट करते.
I. आढावा
II. डेटा संकलने आणि वापर
A. आम्ही संकलित करतो तो डेटा
B. आम्ही डेटा कसा वापरतो
C. मुख्य स्वयंचलित प्रक्रिया
D. कुकीज आणि संबंधित तंत्रज्ञान
E. डेटा शेअर करणे आणि प्रकटीकरण
F. डेटा राखून ठेवणे आणि हटवणे
III. निवड आणि पारदर्शकता
IV. कायदेशीर माहिती
A.डेटा नियंत्रक आणि डेटा संरक्षण अधिकारी
B. तुमचा डेटा वापरण्यासाठी आमचे कायदेशीर आधार
C. डेटा ट्रान्सफरसाठीची कायदेशीर चौकट
D. या गोपनीयता सूचनेवरील अपडेट्स
I. आढावा
व्याप्ती
तुम्ही राईड्स किंवा डिलिव्हरीजसहित उत्पादने किंवा सेवांची विनंती करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी Uber चे अॅप्स किंवा वेबसाइट्स वापरता तेव्हा ही सूचना लागू होते.
ही सूचना सांगते की तुम्ही Uber च्या अॅप्स किंवा वेबसाइट्सद्वारे उत्पादने किंवा सेवा मागवत किंवा वापरत असताना आम्ही तुमची माहिती कशाप्रकारे जमा करून त्याचा वापर कसा करतो, याशिवाय जेव्हा तुम्ही Uber Freight, ट्रेंडयोल्गो अॅप/ वेबसाईटकिंवा करीम राईडस वापरता.
ही सूचना विशेषतः लागू होते, जेव्हा तुम्ही:
तुमच्या Uber खाते (“रायडर”) द्वारे राईड्स तसेच, वाहतूक सेवांची विनंती करा किंवा प्राप्त करा.
डिलिव्हरी, पिकअप किंवा रिटर्नसाठी खाद्यपदार्थ, पॅकेजेस किंवा इतर उत्पादने आणि सेवा यांची विनंती करा किंवा प्राप्त करा, ज्यात Uber कुरियर, तुमच्या Uber Eats किंवा पोस्टमेट्स खाते यांचा समावेश आहे किंवा गेस्ट चेकआउट वैशिष्ट्यांद्वारे करा जे तुम्हाला तुमचे खाते (“ऑर्डर स्वीकारणारा व्यक्ती”) म्हणून तयार केल्याशिवाय आणि/किंवा साइन इन शिवाय डिलिव्हरी किंवा पिकअप सेवा ॲक्सेस करू देतात.
Uber च्या ॲप्स किंवा इतरांनी (“गेस्ट यूज़र”) विनंती केलेल्या वेबसाइट्सद्वारे सेवा मिळवा. यामध्ये Uber आरोग्य, सेंट्रल, Uber डायरेक्ट किंवा Uber for Business ग्राहक (एकत्रितपणे, “एंटरप्राइझ ग्राहक”), किंवा मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा इतर वैयक्तिक खाते मालकांद्वारे, तसेच Uber कनेक्ट द्वारे ऑर्डर केलेल्या राईड किंवा डिलिव्हरी सेवा प्राप्त करणाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये Uber गिफ्ट कार्ड्स मिळणा-यांचा देखील समावेश आहे.
ही सूचना Uber ने जमा केलेल्या आणि वापरलेल्या माहिती विषयनाही सांगत. अशाप्रकारे जमा केलेल्या आणि वापरलेल्या माहितीविषयी सांगणारी Uber ची सूचना येथे उपलब्ध आहे. जे Uber चा वापर विनंती करण्यासाठी, सेवा मिळवण्यासाठी किंवा देण्यासाठी करतात, त्यांना या सूचनेमध्ये “यूजर” असे म्हटले आहे.
आमच्या गोपनीयता नियमांचे पालन आम्ही ज्या ठिकाणी काम करतो तिथल्या लागू कायद्यांनुसार केले जाते. अशा कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती वापरणे आवश्यक आहे, कोणता प्रकार मान्य नाही किंवा कोणत्या प्रकारावर बंदी आहे, या पध्दती जगभरात वेगवेगळ्या असतात. म्हणूनच, जर तुम्ही राष्ट्रीय, राज्य किंवा इतर भौगोलिक सीमा ओलांडून प्रवास करत असाल, तर या सूचनेमध्ये सांगितलेली Uber ची डेटा प्रोसेसिंग नियमावली तुमच्या मूळ देशात किंवा प्रदेशातील नियमावलीपेक्षा वेगळी असू शकते.
याव्यतिरिक्त, तुम्ही Uber चा वापर करत असल्यास कृपया खालील गोष्टी लक्षात घ्या:
अर्जेन्टिना
Access सार्वजनिक माहिती उपलब्ध करून देणारी संस्था, तिच्या 25.326 कायद्याच्या नियमन संस्थेची भूमिका बजावत असताना डेटा मधील कोणत्याही व्यक्तीने डेटा संरक्षण नियमनाच्या उल्लंघनामुळे त्यांच्या अधिकारांवर परिणाम झाला आहे असा विश्वास असल्यामुळे केलेल्या तक्रारी आणि सादर केलेले रिपोर्ट्स स्वीकारण्यासाठी जबाबदार आहे.
ऑस्ट्रेलिया
तुम्ही ऑस्ट्रेलियन गोपनीयता तत्त्वांच्या आमच्या अनुपालनाबद्दलUber शी येथे संपर्क साधू शकता असा संपर्क साधल्यास त्याला Uber च्या ग्राहक सेवा आणि/किंवा संबंधित गोपनीयता कार्यसंघाद्वारे रास्त कालावधीत संबोधित केले जाईल. तुम्ही अशा अनुपालनाशी संबंधित समस्यांसाठी ऑस्ट्रेलियन माहिती आयुक्त कार्यालयाशी देखीलयेथे संपर्क साधू शकता.
ब्राझिल
ब्राझीलच्या सामान्य डेटा संरक्षण कायद्यांतर्गत (Lei Geral de Proteção de Dados - एलजीपीडी) आवश्यक असलेल्या Uber च्या गोपनीयता नियमावलीसंबंधित माहिती कृपया इथे पहा.
कोलंबिया, होंडुरास आणि जमैका
या सूचनेनुसार “प्रवासी” आणि “चालक” यांना अनुक्रमे “भाड्याने घेणारे” आणि “भाड्याने देणारे” म्हणून ओळखले जाते
युरोपियन इकॉनॉमिक एरिया (“EEA”), युनायटेड किंगडम (“UK”), आणि स्वित्झर्लंड
डेटा संरक्षण आणि या प्रदेशांमधील इतर कायद्यांतर्गत, जसे की युरोपियन युनियनच्या सामान्य डेटा संरक्षण नियमन (“जीडीपीआर”) अंतर्गत, Uber EEA, UK किंवा स्वित्झर्लंडमध्ये या सूचनेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, काही डेटाचे संकलन आणि वापर करत नाही. असे डेटा संकलन आणि वापर तारांकित चिन्हाने दर्शवले जातात (*). तुम्ही या क्षेत्रांच्या बाहेर Uber वापरत असल्यास, तुमचा डेटा संकलित केला जाऊ शकतो आणि तारकाने दर्शविलेल्या उद्देशांसाठी वापरला जाऊ शकतो.
Uber स्वित्झर्लंड GmbH (स्टॉकर्सट्रॅसे 33 8002 झुरिच, स्वित्झर्लंड) हे डेटा संरक्षणासाठी फेडरल कायद्याच्या उद्देशाने Uber चे नियुक्त प्रतिनिधी आहेत आणि या कायद्यासंदर्भात त्यांच्याशी येथे किंवा मेलद्वारे संपर्क साधला जाऊ शकतो.
आम्ही तुमचा डेटा कसा वापरतो यासंबंधित तुम्हाला समस्या असल्यास येथेसूचीबद्ध केलेल्या संपर्क माहितीद्वारे तुमच्या देशातील डेटा संरक्षण प्राधिकरणाशी (“डीपीए”) संपर्क साधण्याचा अधिकार देखील तुम्हाला आहे.
केनिया
तुम्ही Uber च्या अनुपालनाशी संबंधित प्रश्नांसह किंवा केनियाच्या डेटा संरक्षण कायदा 2019 अंतर्गत तुमच्या अधिकारांचा वापर करण्याची विनंती करण्यासाठी Uber शीयेथे संपर्क साधू शकता. तुम्ही अशा अनुपालन किंवा तुमच्या अधिकारांच्या वापराशी संबंधित समस्यांसह डेटा संरक्षण आयुक्त कार्यालयाशी देखील येथे संपर्क साधू शकता.
सौदी अरेबियाचे राज्य
सौदी पर्सनल डेटा प्रोटेक्शन लॉ (PDPL) सौदी अरेबिया राज्यात आम्ही वैयक्तिक माहिती कशी वापरतो यावर लागू आहे. PDPL च्या नुसार,Uber Saudi Limited डेटा कंट्रोलर म्हणजे Uber Technologies Inc यांचा स्थानिक प्रतिनिधी म्हणून काम करतो.
तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहिती मिळवण्याचा, ती माहिती अॅक्सेस करण्याचा, त्यात सुधारणा करण्याचा किंवा ती काढून टाकण्याची विनंती करण्याचा अधिकार आहे. तुम्ही जिथे लागू असेल तिथे तुम्ही दिलेली परवानगी काढून टाकू शकता. तुमच्या अधिकारांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया आमची गोपनीयता सूचना पहा.
हे अधिकार वापरण्यासाठी किंवा Uber च्या डेटा प्रोटेक्शन ऑफिसर (DPO) यांच्याशी संपर्क करण्यासाठी, कृपया येथे क्लिक करा.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमची माहिती वापरताना PDPL चे उल्लंघन झाले आहे, तर तुम्हाला येथे सौदी डेटा एंड आर्टिफ़िशियल इंटेलिजेंस अथॉरिटी (SDAIA) कडे तक्रार नोंदवण्याचा अधिकार आहे.
तुम्हाला गोपनीयता सूचनेशी संबंधित काही प्रश्न, मत आणि विनंत्या असल्यास, तुम्ही मेलद्वारे Uber शी संपर्क करू शकता:
- स्थानिक कार्यालय: Uber Saudi Limited, बिल्डिंग नंबर 6247, अल ओलाया सेंट., अल मुरुज जिल्हा, रियाध 12281 - 2783, सौदी अरेबिया राज्य (थोडक्यात पत्ता: RHGA6247).
- ग्लोबल HQ: Uber Technologies, Inc., 1515 3र्ड स्ट्रीट, सॅन फ्रान्सिस्को, CA 94158.
मेक्सिको
नायजेरिया
क्यूबेक, कॅनडा
तुम्ही Uber कडून स्वयंचलित निर्णय घेण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या डेटाविषयी जाणून घेण्यासाठी, ज्यामध्ये असे निर्णय घेण्यासाठी विचारात घेतलेले घटक, अशा निर्णयांबाबत कोणत्याही वैयक्तिक डेटामध्ये सुधारणा करण्याची विनंती करण्यासाठी आणि Uber कर्मचार्यांनी अशा कोणत्याही निर्णयांचा आढावा घेण्याची विनंती करण्यासाठी Uber शी येथे संपर्क साधू शकता.
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरियामध्ये या सूचनेमध्ये वर्णन केलेले काही डेटा संकलन आणि वापर Uber करत नाही. दक्षिण कोरियाच्या वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याशी संबंधित Uber च्या गोपनीयता पद्धतींशी संबंधित माहितीसाठी कृपया येथे जा.
त ैवान
तैवानच्या वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा आणि त्यासंबंधित नियमांनुसार तसेच इतर संबंधित माहितीसाठी, सीमापार डेटा ट्रान्सफर करताना Uber ने अवलंबलेल्या उपाय योजनांच्या तसेच इतर संबंधित माहितीसाठी, कृपया येथे पहा.
तैवान पेमेंट डेटा गोपनीयता सूचनेवरील माहितीसाठी, ज्यामध्ये आम्ही तुमचा पेमेंट संबंधित वैयक्तिक डेटा कसा संकलित करतो, वापरतो आणि शेअर करतो या संबंधित माहिती दिली आहे ती सूचना पाहण्यासाठी कृपया येथेजा.
तुर्कीये
Uber चे तुर्कीमधील गोपनीयता नियम आणि तुर्कीच्या वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा क्र. 6698 ("KVKK") अंतर्गत वैयक्तिक माहिती वापरणे याविषयी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे जा.
युनायटेड स्टेट्स
कृपया कॅलिफोर्निया ग्राहक गोपनीयता कायद्यासह US राज्य गोपनीयता कायद्यांशी संबंधित Uber च्या गोपनीयता नियमावलीच्या माहितीसाठीयेथे जा. तुम्ही नेवाडा किंवा वॉशिंग्टनमध्ये Uber वापरत असल्यास, या राज्यांच्या गोपनीयता कायद्यांतर्गत ग्राहक आरोग्य माहितीचे संकलन आणि वापराशी संबंधित Uber च्या नियमावलींबद्दल माहिती मिळवण्यासाठी कृपया येथे येथे जा.
विशिष्ट देश किंवा प्रदेशातील आमच्या कार्यपद्धतींविषयी कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया आमच्याशी येथे संपर्क साधा.
II. डेटा संच आणि वापर
A. आम्ही संकलित करत असलेला डेटा
Uber डेटा संकलित करते:
1. जो तुम्ही प्रदान करता
2. जेव्हा तुम्ही आमच्या सेवा वापरता
3. इतर सोर्सकडून आलेला डेटा.
कृपया आम्ही संकलित करत असलेला डेटा आणि आणि आम्ही तो कसा वापरतो याचा सारांश पाहण्यासाठीयेथे जा.
Uber खालील डेटा संकलित करते:
1. तुम्ही प्रदान केलेला डेटा: यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:
डेटा वर्ग | डेटाचा प्रकार |
|---|---|
a. खात्याची माहिती. तुम्ही तुमचे Uber खाते तयार किंवा अपडे ट करता तेव्हा आम्ही डेटा जमा करतो. |
|
b. डेमोग्राफिक डेटा. काही फीचर्स सक्षम करण्यासाठी आवश्यक असेल, तर आम्ही डेमोग्राफिक डेटा जमा करतो. उदाहरणार्थ:
|
|
c. ओळख पडताळणीची माहिती. हे आम्ही तुमच्या खात्याची किंवा ओळखीची पडताळणी करण्यासाठी संकलित केलेल्या डेटाशी संबंधित आहे. यामध्ये बायोमेट्रिक डेटाचा समावेश असू शकतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शारीरिक किंवा जैविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखता येते. उदाहरणार्थ, तुमचे खाते तुमच्याशिवाय इतर कोणाकडून वापरले जात नसल्याची पुष्टी करण्यासाठी किंवा फसवी खाती तयार करण्यापासून रोखण्यासाठी जेव्हा आम्ही चेहरा पडताळणी तंत्रज्ञान वापरतो तेव्हा बायोमेट्रिक डेटा जनरेट केला जातो. |
|
d. युजरने दिलेली माहिती. हे आम्ही जमा केलेल्या डेटाशी संबंधित आहे जेव्हा तुम्ही:
|
|
2. तुम्ही आमच्या सेवा वापरता तेव्हा जमा केलेला डेटा: यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:
डेटा वर्ग | डेटाचा प्रकार |
|---|---|
a. लोकेशन डेटा. तुम्ही राईडची विनंती केल्यास, आम्ही तुमच्या ट्रिप दरम्यान तुमच्या ड्रायव्हरचे लोकेशन ट्रॅक करतो आणि तो डेटा तुमच्या खात्याशी लिंक करतो. हे आम्हाला तुमच्या ट्रिपवर तुम्ही कुठे आहात हे दाखविण्यात मदत करते. आम्ही तुमचे अंदाजे लोकेशन देखील निर्धारित करतो आणि तुम्ही आम्हाला तुमच्या फोनवरील सेटिंग्जमधून तसे करण्याची परवानगी दिल्यास आम्ही तुमचे अचूक लोकेशन निर्धारित करू शकतो. तुम्ही तसे केल्यास, तुम्ही राईड किंवा ऑर्डरची विनंती केल्यापासून राईड पूर्ण होईपर्यंत किंवा तुमची ऑर्डर डिलिव्हर होईपर्यंत आम्ही तुमच्या अचूक लोकेशनची माहिती घेत राहू. तुमच्या फोनच्या स्क्रीनवर Uber अॅप उघडलेले असताना देखील आम्ही अशा प्रकारचा डेटा गोळा करतो. आम्हाला तुमच्या अचूक लोकेशनची माहिती घेऊ न देता देखील तुम्ही Uber वापरू शकता. परंतु , हे तुमच्यासाठी कमी सोयीस्कर असेल , कारण अशा वेळी, आम्हाला तुम्हाला शोधण्याची परवानगी न देता तुम्हाला तुमचे लोकेशन तुमच्या फोनमध्ये टाइप करावे लागेल. ही माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ”निवड आणि पारदर्शकता” विभाग पहा, जिथे Uber ने तुमचा अचूक लोकेशन डेटा जमा करण्यावर नियंत्रण कसे करायचे हे सांगितले आहे. |
|
b. ट्रिप/ऑर्डर माहिती. हे तुमच्या ट्रिप किंवा ऑर्डर्सविषयी आम्ही जमा करत असलेल्या तपशीलांशी संबंधित आहे, ज्यामध्ये अतिथि चेकआऊट वैशिष्ट्यातून दिल्या गेलेल्या ऑर्डर्सचा समावेश आहे. |
|
c. वापरासंबंधित डेटा. हे तुम्ही Uber च्या अॅप्स आणि वेबसाइट्सशी कसा संवाद साधता याच्या डेटाशी संबंधित आहे. |
|
d. डिव्हाइस डेटा. हे तुम्ही Uber ॲक्सेस करण्यासाठी वापरत असलेल्या डिव्हाईसच्या डेटाशी संबंधित आहे. |
|
e. संदेशवहनाचा डेटा. याचा संदर्भ, तुम्ही (i) ग्राहक सहाय्यासाठी Uber शी संपर्क साधण्यासाठी, सुरक्षिततेच्या समस्येचा अहवाल देण्यासाठी किंवा इतर प्रश्न विचारण्यासाठी आणि (ii) Uber च्या ॲप्सद्वारे रायडर्स आणि ऑर्डर प्राप्तकर्त्यांशी संवाद साधता तेव्हा आम्ही गोळा करत असलेल्या डेटाचा असतो. |
|
f. वाहनातील रेकॉर्डिंग्ज. तुम्ही स्वायत्त वाहनातून राईड घेतल्यास, आम्ही केबिनमधील कॅमेऱ्यांनी घेतलेले तुमचे व्हिडिओ संकलित करू. आम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग देखील जमा करू शकतो, जसे की तुम्ही ट्रिप दरम्यान ग्राहक सहाय्याच्या उद्देशाने Uber शी केलेला संपर्क. |
|
3. इतर सोर्सकडून आलेला डेटा: यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
डेटा वर्ग | डेटाचा प्रकार |
|---|---|
a. कायदा अंमलबजावणी करणारे अधिकारी, सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि इतर सरकारी अधिकारी. |
|
b. मार्केटिंग भागीदार, जाहिरातदार आणि सेवा प्रदाते. यामध्ये कॅश बॅक प्रोग्राम्स,* आणि डेटा पुनर्विक्रेते* यांच्याशी संबंधित बँकांचा समावेश आहे. |
|
c. तुमची ओळख पडताळण ी करण्यात किंवा फसवणूक कोठे होत आहे हे शोधून काढण्यात आम्हाला मदत करणारे सेवा प्रदाते. |
|
d. Uber खाते मालक. हे अशा Uber खाते मालकांशी संबंधित आहे, जे तुमच्यासाठी सेवांची विनंती करतात (जसे की मित्र किंवा कुट ुंबातील सदस्य), किंवा जे तुम्हाला त्यांच्या खात्यांद्वारे सेवांची विनंती करू देतात (जसे की एंटरप्राइझ ग्राहक). |
|
e. Uber बिजनेस पार्टनर (खाते तयार व ॲक्सेस करणे आणि APIs ). Uber ला तुमचा डेटा अशा व्यवसाय भागीदारांकडून मिळू शकतो ज्याद्वारे तुम्ही तुमचे Uber खाते तयार करता किंवा अॅक्सेस करता, जसे की पेमेंट प्रदाते, सोशल मीडिया सेवा, लॉयल्टी कार्यक्रम भागीदार किंवा Uber चे एपीआय वापरणारे ॲप्स किंवा वेबसाइट्स किंवा ज्यांचे एपीआय Uber वापरते. | तुम्ही तुमचे Uber खाते तयार करण्यासाठी किंवा ॲक्सेस करण्यास ाठी वापरत असलेला व्यवसाय भागीदार किंवा वापरलेले एपीआय यानुसार बदलते. |
f. Uber बिजनेस पार्टनर्स (डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स). तुम्हाला एखाद्या वित्तीय संस्थेने Uber सोबत भागीदारी करून जारी केलेल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सच्याच्या संदर्भात बिजनेस पार्टनर्सकडून अटी व शर्तींमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत तुमचा डेटा मिळू शकतो. |
|
g. ग्राहक सहाय्य समस्या, दावे किंवा विवाद यांच्या संदर्भात माहिती देणारे वापरकर्ते किंवा इतर. |
|
h. Uber च्या रेफरल प्रोग्राम्समध्ये सहभागी होणारे वापरकर्ते. उदाहरणार्थ, दुसऱ्या वापरकर्त्याने तुम्हाला Uber असा संदर्भ दिल्यास, आम्हाला त्या वापरकर्त्याकडून तुमचा डेटा मिळतो. |
|
B. आम्ही डेटा कसा वापरतो
विश्वसनीय आणि सोयीस्कर वाहतूक, डिलिव्हरी आणि इतर उत्पादने आणि सेवा सक्षम करण्यासाठी Uber वैयक्तिक डेटा वापरते. आम्ही डेटा यासाठी देखील वापरतो:
- आमचे वापरकर्ते आणि सेवांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी
- मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी
- वापरकर्त्यांदरम्यान संदेशवहन सक्षम करण्यासाठी
- ग्राहक सहाय्यासाठी
- संशोधन आणि विकासासाठी
- वापरकर्त्यांना मार्केटिंग नसलेले संवाद पाठवण्यासाठी
- कायदेशीर कारवाईच्या संदर्भात
1. आमच्या सेवा पुरवण्यासाठी. Uber सेवा पुरवणे, पर्सनलाईज करणे, नियंत्रित करणे आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी डेटाचा वापर करते.
डेटाचा वापर | वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आ हे |
|---|---|
a. तुमचे खाते तयार करणे आणि अपडेट करणे |
|
b. सेवा आणि फीचर्स सक्षम करणे. यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:
|
|
c. रायडर/ स्वीकार करणारी व्यक्ती यांच्यासाठी असलेलेभाडे आणि ड्रायव्हर/डिलिव्हरी व्यक्ती यांच्यासाठी असलेले भाडेमोजत आहे. |
|
d. पेमेंट प्रक्रिया करणे आणि पेमेंट आणि Uber Money सारखी ई-मनी उत्पादने सक्षम करणे. |
|
e. तुमचे खाते पर्सनलाईज करत आहे. उदाहरणार्थ, आम्ही तुमच्या आधीच्या ऑर्डर्स, ट्रिप्स आणि डिलिव्हरी लोकेशनवर आधारित तुम्हाला पर्सनलाइज्ड रेस्टॉरंट किंवा खाद्यपदार्थाची शिफारस किंवा ट्रिपविषयी सूचना देऊ शकतो. |
|
f. तुम्हाला ट्रिप किंवा डिलिव्हरी अपडेट्स देणे आणि पावत्या तयार करणे. |
|
g. आमच्या नियम, सेवा किंवा धोरणांमधील बदलांची तुम्हाला माहिती देत आहोत. |
|
h. आमच्या सेवा चालू ठेवण्यासाठी आवश्यक कार्ये करणे, ज्यामध्ये सॉफ्टवेअर बग्ज आणि ऑपरेशनल समस्यांचे निवारण करणे समाविष्ट आहे. |
|
2. सुरक्षितता आणि फसवणूक प्रतिबंध आणि शोध यासाठी. आपल्या सेवा आणि वापरकर्ते यांची सुरक्षा आणि सुरक्षितता राखण्यात मदत करण्यासाठी आम्ही डेटाचा वापर करतो.
डेटाचा वापर | वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे |
|---|---|
a. तुमचे खाते, ओळख किंवा सुरक्षा आवश्यकतांचे पालन तपासणे. यामध्ये समावेश आहे:
|
|
b. गेस्ट वापरकर्त्यांद्वारे होणारी फसवणूक रोखणे, शोधणे आणि त्याविरुद्ध लढा देणे. |
|
c. ज्या वापरकर्त्यांमध्ये वादविवाद होण्याचा जास्त धोका आहे अशा वापरकर्त्यांच्या जोड्या टाळण्यासाठी अंदाज लावणे आणि त्यासाठी मदत करणे,* किंवा जेथे एका वापरकर्त्याने यापूर्वी दुसऱ्या वापरकर्त्याला कमी (उदाहरणार्थ, एक स्टार) रेटिंग दिलेले असेल. |
|
d. ट्रिप्स किंवा डिलिव्हरीज दरम्यान सुरक्षा तज्ञांकडून थेट सहाय्य प्रदान करणे. |
|
e. Uber च्या नियम आणि अटी, समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आणि तुम्हाला कळवण्यात आलेल्या इतर धोरणे आणि मानकांची अंमलबजावणी करणे. |
|
3. मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी. Uber तिच्या आणि Uber भागीदारांच्या सेवांचे मार्केटिंग करण्यासाठी डेटा (अतिथी वापरकर्त्यांचा डेटा वगळता) वापरते.
डेटाचा वापर | वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे |
|---|---|
a. Uber उत्पादने आणि सेवांशी संबंधित तसेच इतर कंपन्यांनी ऑफर केलेली मार्केटिंग संप्रेषणे आणि जाहिराती पर्सनलाइज करणे उदाहरणार्थ, Uber हे करू शकते:
|
|
b. विनंतीची वेळ आणि विनंती केलेल्या सेवांसह तुमच्या सध्याच्या ट्रिप किंवा डिलिव्हरी विनंतीबद्दलच्या डेटानुसार जाहिराती दाखवणे. उदाहरणार्थ, तुम्ही सुपरमार्केटला जाण्यासाठी ट्रिपची विनंती केली तर आम्ही त्या सुपरमार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या तृतीय-पक्ष उत्पादनांसाठी ॲपमधील जाहिराती दाखवू शकतो. |
|
c. मार्केटिंग आणि जाहिराती किती प्रभावी आहेत ह्याचे मोजमापन करणे आणि आमच्या जाहिरात आणि मार्केटिंग मोहिमा ऑप्टिमाइझ करणे. उदाहरणार्थ, Uber हे करू शकते:
|
|
4. वापरकर्त्यांदरम्यान संभाषण सक्षम करण्यासाठी.
डेटाचा वापर | वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे |
|---|---|
उदाहरणार्थ, पिकअप लोकेशनची पुष्टी करण्यासाठी ड्रायव्हर तुम्हाला मेसेज किंवा कॉल करू शकतो, हरवलेली वस्तु परत मिळवण्यासाठी तुम्ही ड्रायव्हरला कॉल करू शकता किंवा रेस्टॉरंट किंवा डिलिव्हरी करणारी व्यक्ती तुमच्या ऑर्डरबद्दल माहितीसाठी तुमच्याशी संपर्क साधू शकते. |
|
5. ग्राहकांना सहाय्य करण्यासाठी.
डेटाचा वापर | वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे |
|---|---|
यामध्ये वापरकर्त्याच्या समस्यांची, वापरकर्त्याने तक्रार केलेल्या गैरवर्तनाची (जसे की अयोग्य मेसेज किंवा फसवणूक) चौकशी करणे आणि त्याचे निराकरण करणे, आमच्या ग्राहक सहाय्य प्रतिसाद आणि प्रक्रियांवर लक्ष ठेवणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे आणि ग्राहक सहाय्य समस्यांशी संबंधित संशोधन अभ्यासातील संभाव्य सहभागी ओळखणे तसेच युजरचे प्रश्न आणि समस्यांची तपासणी करणे आणि त्यांचे निराकरण करणे समाविष्ट आहे. Uber यासाठी GenAI साधने चा वापर करू शकते. |
|
6. संशोधन आणि विकासासाठी.
डेटाचा वापर | वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे |
|---|---|
आम्ही प्रशिक्षण मशीन लर्निंग मॉडेल्ससह विश्लेषण, संशोधन आणि उत्पादन विकासासाठी डेटा वापरतो. यामुळे आम्हाला आमच्या सेवा अधिक सोयीस्कर आणि वापरण्यास सुलभ करण्यात, आमच्या सेवांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढविण्यात आणि नवीन सेवा फीचर्स विकसित करण्यात मदत होते. |
|
7. मार्केटिंगविषयी नसलेले संप्रेषण.
डेटाचा वापर | वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे |
|---|---|
यामध्ये आमच्या सेवांशी संबंधित निवडणुका, मतपत्रिका, जनमत आणि इतर राजकीय प्रक्रियांसंबंधित सर्वेक्षणे आणि संदेशवहन यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी Uber च्या सेवांशी संबंधित मतदानविषयक साधने किंवा प्रलंबित कायद्याबद्दल आम्ही तुम्हाला सूचित करू. |
|
8. कायदेशीर कारवाई आणि आवश्यकता.
डेटाचा वापर | वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे |
|---|---|
आम्ही Uber च्या सेवांच्या वापराशी संबंधित, दावे किंवा विवादांचे परीक्षण करण्यासाठी किंवा त्यांची नोंद घेण्यासाठी; लागू कायदे, नियम, किंवा ऑपरेटिंग लायसन्स किंवा करार, वि मा पॉलिसी यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी; किंवा कायदेशीर प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी किंवा सरकारी विनंतीनुसार, डेटाचा वापर करू शकतो. |
|
C. मुख्य स्वयंचलित प्रक्रिया
Uber आमची उत्पादने आणि सेवांचे काही भाग सक्षम करण्यासाठी स्वयंचलित प्रक्रियांचा वापर करते, ज्यामध्ये सेवा डिलिव्हरी आणि युजर सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या कार्यांचा समावेश आहे जसे की जुळणी, किंमत आणि फसवणूक प्रतिबंध आणि शोध.
Uber आपल्या सेवांचे आवश्यक भाग सक्षम करण्यासाठी स्वयंचलित प्रक्रियांवर अवलंबून आहे, यामध्ये जुळणी (विनंती करणार्या वापरकर्त्यांच्या जोड्या लावणे आणि वाहतूक आणि/किंवा डिलिव्हरी सेवा प्रदान करणे), किंमत (अशा सेवांसाठी देय रकमेचा हिशेब करणे) आणि फसवणूक शोधणे आणि प्रतिबंध करणे समाविष्ट आहे. या प्रक्रियांमुळे Uber ला दररोज जगभरातील लाखो वापरकर्त्यांना अखंड आणि सुरक्षित अनुभव प्रदान करता येतो.
या विभागात स्वयंचलित जुळणी, किंमत आणि फसवणूक प्रतिबंध आणि शोध प्रक्रिया कशा काम करतात याचे वर्णन केले आहे, ज्यात त्यांचा तुमच्या Uber च्या अनुभवावर आणि या प्रक्रिया सक्षम करण्यासाठी वापरल्या जाणार्या वैयक्तिक आणि वैयक्तिक नसलेल्या डेटावर कसा परिणाम होतो हे समाविष्ट आहे.
जर तुम्हाला या प्रक्रियांबद्दल काही प्रश्न किंवा समस्या असतील, तर तुम्ही Uber शी येथे संपर्क साधू शकता.
1. जुळवत आहे
तुम्हाला ड्रायव्हर्स किंवा डिलिव्हरी करणाऱ्या लोकांशी सोयीस्कररीत्या जुळवण्यासाठी Uber अल्गोरिदम वापरते. यामुळे आम्हाला तुम्हाला प्रतीक्षा करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यात आणि ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी करणार्या लोकांची कार्यक्षमता वाढवण्यात मदत होते.
तुम्ही वाहतुकीची किंवा डिलिव्हरीजची विनंती करता तेव्हा जुळणी प्रक्रिया ट्रिगर केली जाते. त्यानंतर, आमचे अल्गोरिदम सर्वोत्कृष्ट जुळणी निश्चित करण्यासाठी विविध घटकांचे मूल्यांकन करतात, ज्यात तुमचे स्थान, विनंती केलेले अंतिम ठिकाण, ड्रायव्हर्स किंवा डिलिव्हरी व्यक्तींच्या जवळचे स्थान आणि उपलब्धता, रहदारीची परिस्थिती आणि ऐतिहासिक डेटा (यामध्ये, काही मार्केट्समध्ये, तुम्ही आणि ड्रायव्हरने यापूर्वी एकमेकांचा नकारात्मक अनुभव येणे रिपोर्ट केले आहे का याचा समावेश आहे).
त्यानंतर या प्रक्रियेद्वारे जुळलेल्या ड्रायव्हर/डिलिव्हरी व्यक्तीला ट्रिप किंवा डिलिव्हरी विनंतीची माहिती दिली जाते. एकदा ट्रिप किंवा ऑर्डर स्वीकारली की आम्ही तुम्हाला आणि ड्रायव्हर/डिलिव्हरी व्यक्तीला जुळणी झाल्याचे पुष्टीकरण पाठवतो.
आमच्या प्लॅटफॉर्मवरील सर्व वापरकर्त्यांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही आमची जुळणी प्रक्रिया सतत सुधारत असतो आणि तुम्ही Uber वापरता त्या लोकेशननुसार वेगवेगळ्या घटकांचा विचार करतो.
Uber च्या जुळणी प्रक्रियेबद्दल अतिरिक्त माहिती येथेउपलब्ध आहे.
2. किंमत
तुम्ही वाहतुकीची किंवा डिलिव्हरीची विनंती करता तेव्हा, Uber खालील घटकांच्या आधारे तुम्हाला द्यावी लागणारी किंमत ठरवण्यासाठी अल्गोरिदम वापरते:
- ट्रिप/ऑर्डर माहिती, ज्यामध्ये तुम्ही विनंती केलेल्या सेवेचा प्रकार (उदाहरणार्थ, UberX, UberXL, Uber Black), रेस्टॉरंट किंवा व्यापाऱ्याचे नाव आणि लोकेशन आणि ऑर्डरची किंमत
- तुमचे लोकेशन
- अंतिम ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ आणि अंतर
- ड्रायव्हर्स किंवा डिलिव्हरी करणार्या व्यक्तींची उपलब्धता आणि त्यांचे अंतर
- दिवसातील वेळ
- ट्रॅफिकची स्थिती
- ट्रॅफिकची स्थिती आणि सिझननुसार होणारे बदल यांची मागील माहिती.
टोल्स किंवा लागू झालेले सरचार्ज, आणखी पैसे, बचत, प्रमोशन्स आणि सबस्क्रिप्शन, आणि मार्गानुसार झालेले बदल यांमुळे तुमच्या भाड्यात बदल होऊ शकतो.
जास्त मागणीमुळे वाढलेल्या भाड्याच्या किंमती वेगवेगळ्या असू शकतात, जी दिलेल्या भागात उपलब्ध ड्रायव्हर्सपेक्षा जास्त रायडर्स असल्यास आपोआप लागू होते. यामुळे अधिक ड्रायव्हर्सना गर्दीच्या ठिकाणी सेवा देण्यास प्रोत्साहित केले जाते आणि विश्वसनीयता कायम आणि समतोल ठेवण्यासाठी रायडरच्या मागणीत बदल केले जातात.
Uber च्या किंमत ठरवण्याच्या प्रोसेसबद्दल अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.
3. फसवणूक प्रतिबंध आणि शोध
Uber किंवा आमच्या वापरकर्त्यांविरूद्ध फसवणूक टाळण्यासाठी आणि ती होत आहे का हे पाहण्यासाठी Uber अल्गोरिदम वापरते. यामध्ये खाते टेकओव्हर, वापरकर्त्याचे संशयास्पद वर्तन आणि तृतीय-पक्ष एग्रीगेटर्सद्वारे अनधिकृत अॅक्सेस करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवणे समाविष्ट आहेत.
ही साधने फसवे वर्तन सूचित करणारे पॅटर्न शोधतात, जसे की वापरकर्त्याच्या नेहमीच्या वागण्यापेक्षा एकदम वेगळे असलेले वर्तन. हे करण्यासाठी, Uber लोकेशन डेटा, पेमेंट माहिती आणि Uber वापर यासह वापरकर्त्यांकडून गोळा केलेल्या किंवा त्यांनी तयार केलेल्या माहितीचे रिअल-टाइम मॉनिटरिंग करते. आम्ही संशयास्पद वर्तन शोधण्यात मदत करण्यासाठी डेटा इतिहासचे देखील परीक्षण करतो आणि रिअल-टाइम डेटाशी त्याची तुलना करतो.
संभाव्य फसव्या कृती आढळल्यास Uber त्यांच्या सेवांवरील तुमचा अॅक्सेस मर्यादित करू शकते किंवा अशा अॅक्सेसला परवानगी देण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ओळखीची पडताळणी करणे यासारखी एखादी विशिष्ट कृती करणे आवश्यक आहे.
या प्रक्रियेबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, तुम्ही Uber ग्राहक सहाय्यकाशी येथे संपर्क साधू शकता.
E. डेटा शेअर करणे आणि प्रकटीकरण
आमच्या सेवा किंवा फीचर्स उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असेल तेथे तुमच्या विनंतीनुसार किंवा तुमच्या संमतीने आम्ही तुमचा डेटा इतर वापरकर्त्यांसोबत शेअर करतो. कायदेशीर कारणांमुळे किंवा दावे किंवा विवादांच्या संबंधात आम्ही हा डेटा आमच्या संलग्न कंपन्या, सहाय्यक कंपन्या आणि भागीदारांसह देखील शेअर करू शक तो.
Uber डेटा शेअर करू शकते:
1. इतर वापरकर्त्यांसह
यामध्ये यांच्यासोबत डेटा शेअर करणे समाविष्ट असू शकते:
प्राप्तकर्ता | डेटा शेअर केला |
|---|---|
तुमचा ड्रायव्हर |
|
शेअर्डराईड्सदरम्यान इतर रायडर किंवा भेटवस्तू प्राप्तकर्ते |
|
तुम्ही जिथून ऑर्डर करत आहात ती रेस्टॉरंट्स/ ते दुकानदार आणि तुमच्याकडे डिलिव्हरी करणारी व्यक्ती |
|
तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही Uber खात्याचा मालक. यामध्ये तुम्ही वापरत असल्यास याचा समावेश आहे सीनियर अकाऊंट, किशोरांसाठी Uber खाते, किंवा कुटुंब प्रोफाइलशी लिंक केलेले कोणतेही खाते. यामध्ये तुम्ही अतिथी वापरकर्ता म्हणून राईड किंवा डिलिव्हरी सेवेची विनंती केल्यास किंवा प्राप्त केल्यास याचा देखील समावेश आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही Uber for Business खाते मालकाशी (म्हणजे तुमचा नियोक्ता) संबद्ध ईमेल पत्ता वापरून खाते तयार केल्यास, तुम्हाला त्या Uber for Business खात्यावरील ट्रिप्स किंवा ऑर्डर्स संबंधित खर्च करण्यात मदत करण्यासाठी आम्ही तुमचा खाते डेटा (जसे की नाव आणि ईमेल पत्ता) अशा खाते मालकाशी शेअर करू शकतो.* आम्ही तुमच्या ट्रिपशी संबंधित समस्या, जसे की सुरक्षिततेच्या घटना किंवा तक्रारींबद्दल, त्या खाते मालकाशी देखील माहिती शेअर करू शकतो. |
|
तुमच्या सामूहिक ऑर्डरमधील इतर प्राप्तकर्ते |
|
जे लोक तुम्हाला Uber ला रेफर करतात. त्यांचा रेफरल बोनस निश्चित करण्यासाठी आम्ही तुमचा डेटा आवश्यकतेनुसार शेअर करू शकतो |
|
इतर Uber Eats वापरकर्ते. तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटबद्दल अभिप्राय पोस्ट केला किंवा Uber Eats वरील तुमचे एखादे आवडते रेस्टॉरंटलिस्ट केले आणि त्या लिस्टचे शेयरिंग शेअरिंग “पब्लिक” सेट केले, तर आम्ही तुमचा डेटा शेअर करतो. |
|
2. विनंतीनुसार किंवा तुमच्या संमतीने
यामध्ये यांच्यासोबत डेटा शेअर करणे समाविष्ट असू शकते:
प्राप्तकर्ता | डेटा शेअर केला |
|---|---|
ज्यांच्यासह तुम्ही डेटा-श ेअरिंग फीचर्स वापरता ते वापरकर्ते. यामध्ये तुम्हाला तुमची आगमनाची अंदाजे वेळ आणि लोकेशन शेअर करण्याची किंवा तुमचे भाडे विभाजित करण्याची परवानगी देणाऱ्या फीचर्सचा समावेश आहे. | वापरलेल्या वैशिष्ट्यानुसार हे समाविष्ट असू शकते:
|
Uber व्यवसाय भागीदार. प्रमोशन्स, स्पर्धा किंवा विशेष सेवांच्या उद्देशाने तुम्ही Uber मधून ज्या कंपन्यांचे अॅप्स किंवा वेबसाईट्स अॅक्सेस करता त्यांच्यासह आम्ही डेटा शेअर करतो. | तुम्ही Uber द्वारे कोणत्या उद्देशाने अॅप किंवा वेबसाइट ॲक्सेस करता आणि कोणत्या उद्देशाने करत ा, हे समाविष्ट असू शकते:
|
आपत्कालीन सेवा. आपत्कालीन परिस्थितीत किंवा काही घटनांनंतर आम्ही तुम्हाला तुमचा डेटा पोलिस, अग्निशमन आणि रुग्णवाहिका सेवांसोबत शेअर करू देतो. अधिक माहितीसाठी, कृपया खाली दिलेले““निवड आणि पारदर्शकता”” आणि “आपत्कालीन डेटा शेअरिंग”” विभाग पहा. |
|
विमा कंपन्या. तुमच्याबरोबर एखादी घटना घडली, किंवा तुम्ही Uber च्या सेवांशी संबंधित विमा कंपनीकडे तक्रार नोंदवली किंवा दावा नोंदवला असेल, तर Uber त्या दाव्याचे निराकरण किंवा तो हाताळण्याच्या उद्देशाने त्या विमा कंपनीला हा डेटा शेअर करेल. | दाव्याचे निराकरण करण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी आवश्यक असलेला डेटा, ज्यामध्ये हे समाविष्ट असू शकते:
|