Please enable Javascript
Skip to main content

किशोर खात्याची उपलब्धता शहरानुसार बदलते. अधिक जाणून घेण्यासाठी कृपया खालील वारंवार विचारले जाणारे प्रश्न वाचा.

X small

Uber वर किशोर खाती

जग जसजसे वाढत आहे आणि बदलत आहे, तसतसे ड्रायव्हर्स आणि रायडर्सना सुरक्षित अनुभव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला आम्ही नेहमीच प्राधान्य देत राहू. विशेषतः किशोरवयीन मुलांसाठी राईड्स सुरू करण्याच्या बाबतीत हे आम्ही सत्यात उतरविले आहे.

13-17 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी त्यांच्या कायदेशीर पालकाच्या संमतीने Uber प्लॅटफॉर्म वापरण्याचा एकमेव अधिकृत मार्ग म्हणजे किशोर खाती होय. त्यांच्या कौटुंबिक प्रोफाइलमध्ये किशोर खाते जोडणाऱ्या पालकांना त्यांच्या किशोरवयीन मुलाने प्रत्येक वेळी राईडची विनंती केल्यावर तसे सूचित केले जाईल—आणि त्यांना रिअल-टाइम सूचना तसेच लाइव्ह ट्रिप ट्रॅकिंग मिळेल जेणेकरून ते त्यांच्या किशोरवयीन मुलाच्या राईडला पिकअपपासून ड्रॉपऑफपर्यंत ॲपमध्ये फॉलो करू शकतील.

किशोरांसाठी अनिवार्य सुरक्षा प्रशिक्षण

किशोरवयीन मुलाने त्यांच्या पहिल्या राईडची विनंती करण्यापूर्वी, त्यांनी सुरक्षितता प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे जी त्यांना त्यांच्यासाठी प्रत्येक राईडवर उपलब्ध असलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल माहिती देते.

जागृत पालक

किशोरवयीन मुलाने त्यांचे खाते सेट केल्यानंतर पालकांना, त्याच्या किशोरवयीन मुलाला त्याच्या पहिल्या राईडसाठी तयार कसे करावे याबद्दल, टिप्स मिळतील. पालकांना लाईव्ह ट्रिप ट्रॅकिंगचा अ‍ॅक्सेस असेल आणि त्यांच्या किशोरवयीन मुलाने केलेल्या प्रत्येक ट्रिप विनंतीसाठीचे स्थिती अपडेट्स देखील प्राप्त होतील. ट्रिप दरम्यान ते तुमच्याशी थेट संपर्क देखील साधू शकतील.

नेहमी सक्षम असलेले सुरक्षा वैशिष्ट्य

किशोर रायडर्सना पिन पडताळणी आणि RideCheck™ यांसारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा नेहमी अ‍ॅक्सेस असेल. ते त्यांच्या राईड्स दरम्यान ऑडिओ रेकॉर्डिंग चालू करणे देखील निवडू शकतात.

नेहमी सक्षम असलेले सुरक्षा वैशिष्ट्य

ही सुरक्षा वैशिष्ट्ये नेहमी सक्षम असतात


माझ्या राईडची पडताळणी करा
किशोरवयीन मुलाने कारमध्ये बसण्यापूर्वी, त्यांना तुम्हाला एक युनिक पिन द्यावा लागेल. ड्रायव्हर अ‍ॅपमध्ये योग्य कोड टाकेपर्यंत तुम्ही ट्रिप सुरू करू शकणार नाही. यामुळे किशोरवयीन मुलाला ते योग्य कारमध्ये बसत असल्याची खात्री करून घेण्यात मदत होईल होईल—आणि तुम्ही योग्य रायडर निवडत आहात हे देखील सुनिश्चित होईल.


RideCheck™

जर राईड फारच वेगळ्या मार्गाने घेण्यात आली, अनपेक्षितपणे थांबवली गेली किंवा लवकर संपविण्यात आली, तर RideCheck™ तुम्हाला आणि तुमच्या किशोरवयीन रायडरला सतर्क करेल आणि तुम्ही ठीक आहात का किंवा तुम्हाला मदत हवी आहे का हे जाणून घेण्यासाठी अ‍ॅपमध्ये तुम्हाला संदेश पाठवेल.

हे सुरक्षा वैशिष्ट्य, निवडले असल्यास, नेहमी सक्षम असते


ऑडिओ रेकॉर्डिंग
तुम्ही आणि/किंवा तुमचे रायडर्स अ‍ॅपद्वारे तुमच्या डिव्हाइसवर ऑडिओ रेकॉर्ड करू शकता. ट्रिपची सुरुवात रेकॉर्ड करण्यात आली आहे याची खात्री करण्यासाठी, तुम्ही त्यांची ट्रिप विनंती स्वीकारल्यावर रेकॉर्डिंग सुरू होईल. ह्या वैशिष्ट्यामुळे ट्रिप्स दरम्यान सुरक्षित तसेच सहज संवाद निर्माण करण्यात मदत होते. किशोरवयीन रायडर्स प्रत्येक ट्रिपवर आपोआप ऑडिओ रेकॉर्ड करण्याचा पर्याय निवडू शकतात.

ऑडिओ रेकॉर्डिंग फोनवर साठवले आणि एन्क्रिप्ट केले जाईल जेणेकरून कोणालाही—अगदी रेकॉर्डिंग सुरू केलेल्या व्यक्तीलाही—ते ॲक्सेस करता येणार नाही. वापरकर्त्याने आमच्या सहाय्य कार्यसंघासह घटनेचा अहवाल उघडून ऑडिओ फाइल समाविष्ट केल्यास, Uber ते अ‍ॅक्सेस करू शकते. जोपर्यंत असे केले जात नाही तोपर्यंत, Uber कोणत्याही प्रकारचा कंटेंट ॲक्सेस करू शकत नाही.

ऑडिओ रेकॉर्डिंग कसे काम करते ते जाणून घ्या

Uber • किशोरांकडे लक्ष द्या

उदाहरणार्थ, तुम्हाला किशोरवयीन राईड्स सहजपणे ओळखण्यात मदत करण्यासाठी, तुमच्या ऑफर कार्डवर “UberX • किशोर” असे लिहिलेले असू शकते. तुम्हाला तसे लिहिलेले दिसल्यास, याचा अर्थ ट्रिपची विनंती अधिकृत किशोर खातेधारकाची आहे—म्हणून पिकअप करताना तुम्ही त्यानुसार सज्ज असाल.

आत्मविश्वासाने गाडी चालवा

लक्षात असू द्या, तुमचा रायडर 18 वर्षांपेक्षा लहान दिसत असल्यास आणि तुमच्या ऑफर कार्डमध्ये “किशोर” असे लिहिलेले नसल्यास, तुम्ही ट्रिप रद्द करू शकता आणि निवडू शकता सोबत नसलेला अल्पवयीन हे कारण म्हणून निवडू शकता. 

तुम्हाला यापुढे या ट्रिप विनंत्या मिळवायच्या नाहीत असे तुम्ही ठरवल्यास, तुम्ही ड्रायव्हर ॲपमधील प्राधान्ये वर जाऊन कधीही निवड रद्द करू शकता.

आत्मविश्वासाने गाडी चालवा

तुमचा रायडर 18 वर्षांपेक्षा लहान असल्याचे पिकअपवर तुमच्या लक्षात आल्यास आणि राईड विनंतीला “UberX • Teen” लेबल नसल्यास, तुम्ही त्यांना पुष्टी करण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आयडी कार्ड दाखवण्यास सांगू शकता.

तुमचा रायडर पुष्टीकरण देऊ शकत नसल्यास, तुम्ही ट्रिप नाकारू शकता आणि Uber कडे रिपोर्ट करू शकता कारण अधिकृत किशोर खात्याशिवाय अल्पवयीनांना Uber प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी नाही.

तुमच्या रायडरला तुम्हाला अंधारात ठेवायचे नसेल तर तुम्ही ट्रिप का स्वीकारू शकत नाही हे तुम्ही त्यांना सांगू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  • पालकाच्या कौटुंबिक प्रोफाइलवर किशोरवयीन खाते सेट करण्यासाठी किशोरांना त्यांच्या पालकाने आमंत्रित करणे आवश्यक आहे.

  • किशोरवयीन मुलांची खाती खालील शहरांमध्ये लाइव्ह आहेत:*

    • अलाबामा: द शोल्स, ईस्ट अलाबामा, ऑबर्न, बर्मिंघॅम, माँटगोमरी, टस्कॅलूसा, हंट्सविले
    • अलास्का: अँकोरेज, फेअरबँक्स, जुनेओ
    • ऍरिझोना: इस्टर्न ऍरिझोना, फ्लॅगस्टाफ, फिनिक्स, टक्सन, वेस्टर्न ऍरिझोना
    • आर्केन्सा: जोन्सबोरो, लिटल रॉक, फेएटविले, दक्षिणी आर्केन्सा
    • कोलोरॅडो: कोलोरॅडो स्प्रिंग्ज, डेन्व्हर, फोर्ट कॉलिन्स, रॉकीज
    • जॉर्जिया: अथेन्स, अटलांटा, ऑगस्टा, कोलंबस, मॅकॉन, उत्तर जॉर्जिया
    • हवाई: बिग आयलंड, होनोलुलु, काउई, माउ
    • आयडाहो: बोईस, ईस्टर्न आयडाहो
    • इंडियाना: ब्लूमिंग्टन, इव्हान्सविले, फोर्ट वेन
    • आयोवा: एम्स, सीडर रॅपिड्स, डेस मोइन्स, आयोवा सिटी, सिओक्स सिटी, वॉटरलू-सीडर फॉल्स
    • कॅन्सस: लॉरेन्स, मॅनहॅटन, टोपेका, विचिटा
    • लुझियाना: बॅटन रूज, लफायेट-लेक चार्ल्स, मन्रो, न्यू ऑर्लियन्स, श्रेव्हपोर्ट-अलेक्झांड्रिया
    • मेन: ग्रेटर मेन
    • मिनेसोटा: मिनियापोलिस, सेंट क्लाउड, मँकाटो, रोचेस्टर, डुलुथ
    • मिसिसिपी: गोल्डन ट्रँगल, गल्फपोर्ट-बिलोक्सी, हॅटीजबर्ग, जॅक्सन, मेरिडियन, मिसिसिपी डेल्टा, ऑक्सफर्ड
    • मिसूरी: कोलंबिया, कॅन्सस सिटी, उत्तर मिसूरी
    • नेब्रास्का: लिंकन, ओमाहा
    • न्यू मेक्सिको: अल्बुकर्क, गॅलप, लास क्रूसेस, सांता फे, ताओस
    • न्यूयॉर्क: न्यूयॉर्क शहर + उपनगरे
    • उत्तर कॅरोलिना: अ‍ॅशेविल, बून, शार्लोट, इस्टर्न नॉर्थ कॅरोलिना, फाएटविल, आउटर बँक्स, पीडमोंट ट्रायड, रॅले-डरहम, विल्मिंग्टन
    • नॉर्थ डकोटा: बिस्मार्क, फार्गो, ग्रँड फोर्क्स
    • ओहायो: सिनसिनाटी, कोलंबस, डेटन
    • ओक्लाहोमा: लॉटन, ओक्लाहोमा, स्टिलवॉटर, तुलसा
    • दक्षिण कॅरोलिना: चार्ल्सटन, कोलंबिया, फ्लॉरेन्स, ग्रीनव्हिल, मर्टल बीच
    • टेनेसी: चॅटनूगा, कुकविले, जॅक्सन, नॉक्सविल, मेम्फिस, नॅशविल, दक्षिण टेनेसी, ट्राय-सिटीज
    • टेक्सास: अमरिलो, ऑस्टिन, अ‍ॅबिलेन, ब्युमाँट, कॉलेज स्टेशन, कॉर्पस क्रिस्टी, डॅलस, एल पासो, ह्यूस्टन, किलिन, लारेडो, लबबॉक, मिडलँड-ओडेसा, नाकोग्डोचसे, रिओ ग्रांडे व्हॅली, सॅन अँजेलो, सॅन अँटोनियो, टेक्सारकाना, टायलर, वाको, वेस्टर्न टेक्सास, विचिटा फॉल्स
    • युटा: सॉल्ट लेक सिटी, दक्षिणी युटा
    • व्हरमाँट: व्हरमाँट
    • व्हर्जिनिया: शार्लोट्सविले-हॅरिसन, रोआनोके
    • वेस्ट व्हर्जिनिया: वेस्टर्न वेस्ट व्हर्जिनिया
    • विस्कॉन्सिन: इओ क्लेअर, ला क्रॉस
    • वायोमिंग: वायोमिंग

  • होय. जेव्हा किशोरवयीन खात्यातून ट्रिपची विनंती येते:

    • किशोरवयीन मुलाला त्यांच्यासोबत इतर रायडर्स आणण्याची परवानगी आहे, परंतु त्यांचे वय 13 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
    • किशोरवयीन गेस्ट रायडर्स (वय 13 ते 17) यांनी त्यांच्याकडे पालक किंवा कायदेशीर पालकांची परवानगी आहे हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे
    • सर्व किशोरांना मागील सीटवर बसून बेल्ट लावणे अनिवार्य आहे

    खालील परिस्थितीत तुम्ही ट्रिप रद्द करू शकता:

    • रायडरचे वय 13 वर्षांपेक्षा कमी असल्यास
    • 13 ते 17 वयोगटातील गेस्ट रायडरचे असे म्हणणे असल्यास की त्यांना पालक किंवा कायदेशीर पालकाची परवानगी नाही
    • सर्व किशोरवयीन रायडर्स मागील सीटवर मावत नसल्यास
  • नेहमीप्रमाणे, तुमच्या रेटिंगवर परिणाम न होऊ देता तुम्हाला मिळालेल्या कोणत्याही ट्रिप विनंत्या तुम्ही नाकारू शकता. तुम्ही ट्रिपची विनंती स्वीकारल्यास आणि पिकअपवर पोहोचल्यानंतर किशोरवयीन खाते नसलेल्या एका अल्पवयीन मुलाने विनंती केलेली असल्याचे तुम्हाला आढळल्यास, तुम्ही ट्रिप रद्द करू शकता आणि सोबत नसलेला अल्पवयीन हे कारण म्हणून निवडू शकता.

    तुम्ही ट्रिप रद्द केल्यास रायडरला त्याचे कारण सांगू शकता. असे केल्याने, नक्की ट्रिप का रद्द केली गेली ह्याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम उरणार नाही.

  • नाही, तुम्ही आत्ता किशोरवयीन रायडर्सच्या पालकांशी संपर्क साधू शकणार नाही. तथापि, ट्रिप दरम्यान पालक/गार्डियन तुम्हाला कॉल करू शकतात. तुमचा फोन नंबर अ‍ॅपमध्ये निनावी राहील, जेणेकरून त्यांच्याकडे तुमची वैयक्तिक संपर्क माहिती नसेल.

  • असे होणार नाही सर्व कॉल्स—पालकांनी केलेले कॉल्सदेखील—Uber च्या खाजगी कॉलिंग सिस्टमद्वारे कनेक्ट केले जातील.

*किशोर खाती सामान्यतः प्रत्येक शहरासाठी व्यापक महानगर क्षेत्रात ट्रिप्ससाठी पात्र असतील.