Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

ड्राइवर आवश्यकता

Uber वापरुन गाडी कशी चालवावी
तुमच्या शहरात लोकांना इच्छित स्थळी पोहचवून पैसे कमवा. तुमच्या शहरात ड्राईव करण्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी साइन अप करा.

कमाई करण्याचे तीन मार्ग

ड्राइवर आणि मालक दोन्हीही

ड्रायव्हर आणि मालक या रूपाने तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालकीचे वाहन चालवू शकता. यासाठीच्या आवश्यकता शहरानुसार बदलतात, परंतु काही किमान आवश्यकता आहेत:

  • बिल्ल्यासह व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स
  • वाहन नोंदणी प्रमाणपत्र
  • वाहन विमा
  • वाहन परमिट
  • वाहन फिटनेस प्रमाणपत्र

भागीदाराच्या हाताखाली ड्राइवर

भागीदाराच्या हाताखाली काम करणारा/करणारी ड्रायव्हर वाहन चालक नसणाऱ्या भागीदाराच्या मालकीचे वाहन चालवतो/चालवते. भागीदाराच्या हाताखाली काम करणाऱ्या ड्रायव्हरसाठी खालील दस्तऐवज आवश्यक आहे:

  • बिल्ल्यासह व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स

वाहनचालक नसणारा भागीदार

वाहनचालक नसणारा भागीदार किंवा फ्लीट भागीदार म्हणजे अशी व्यक्ती जी Uber प्लॅटफॉर्मवर गाडी चालवत नाही, मात्र तिच्या मालकीचे वाहन असते/असतात आणि ती व्यक्ती कमीतकमी एका ड्रायव्हरची व्यवस्था करत असते. वाहनचालक नसणारा भागीदार बनण्यासाठी हे आवश्यक आहे:

  • वाहन चालक परवाना किंवा फोटो आयडी
  • वाहन नोंदणी प्रमाणपत्र
  • वाहन विमा
  • कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परवाना
गाडी चालवणे सुरू करा

सुरुवात करणे खूप सोपे आहे

1. ऑनलाइन साइन अप करा

आम्हाला तुमच्याविषयी आणि तुमच्याकडे कार असल्यास, त्याविषयी माहिती द्या. तुमच्याकडे कार नसेल तर, आम्ही ती मिळवून देण्यात मदत करू.

2. काही दस्तऐवज शेअर करा

आम्हाला वर नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांची एक प्रत आवश्यक आहे.

3. तुमचे खाते ॲक्टिव्हेट करा

तुमची कार स्थानिक ग्रीनलाइट हबवर घेऊन या. या आवश्यकता शहरानुसार बदलतात, त्यामुळे अधिक माहिती पाहण्यासाठी साइन अप करा.

तुमच्या खाजगी कारचे व्यावसायिक वाहनात रूपांतर करा

आणि पैसे कमवण्यासाठी त्याचा वापर करण्यास तयार व्हा

  • तुम्हाला तुमच्या खाजगी कारचे व्यावसायिक कारमध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता का आहे?

    नियमानुसार, भारतातील प्रत्येक कार जी व्यावसायिक कार म्हणून काम करते, तिच्याकडे व्यावसायिक परवाना असणे आवश्यक आहे.

  • रूपांतरण प्रक्रियेस किती वेळ लागू शकतो?

    कालावधी प्रत्येक शहरानुसार बदलतो, परंतु सहसा 7 ते 30 दिवस लागतात. तुमच्या शहराचे तपशील खालील लिंकवर मिळवा:

  • त्याची किंमत किती आहे?

    शहर आणि कार मॉडेलनुसार किंमत बदलते. रूपांतरणाची किंमत रु. 4.000 ते रु. 24.000 असू शकते. तुमच्या शहराचे तपशील खालील लिंकवर मिळवा:

1/3
अधिक माहिती

स्थानिक वाहन आवश्यकता

वरील किमान आवश्यकतांव्यतिरिक्त, हैदराबादमध्ये वाहनांसाठी स्वतःचे नियम आहेत. बहुतेक 4-डोअर पिवळ्या-प्लेटची वाहने 2008 किंवा त्यापेक्षा नवीन पात्र ठरली पाहिजेत, परंतु वाहन पर्यायानुसार आवश्यकता बदलू शकतात.

स्वतःच स्वःतचे बॉस व्हा