Uber सोबत ड्राइवर किती पैसे मिळवू शकतात?
तुम्ही Uber अॅपसह गाडी चालवून मिळवत असलेले पैसे हे तुम्ही केव्हा, कुठे आणि किती वारंवार गाडी चालवता यावर अवलंबून असतात. तुमची भाडी कशी मोजली जातात ते पहा आणि प्रमोशन्सविषयी जाणून घ्या, ज्यामुळे तुमची कमाई वाढण्यात मदत होऊ शकते.¹
कमाई कशी मोजली जाते
तुम्ही Uber सह गाडी चालवून किती कमवू शकता याचा तुम्ही विचार करत असाल. खालील घटक प्रत्येक ट्रिपसाठी तुम्ही किती रक्कम कमवाल ते निर्धारित करतात.
वाढीव भाडे
तुमच्या भागात राइडरची मागणी कधी आणि कुठे जास्त असते ते पाहण्यासाठी तुमच्या ॲपमध्ये हीट नकाशा पहा, म्हणजे तुम्ही तुमच्या स्टॅंडर्ड भाड्याच्या वर आणखी कमाई करू शकता.
किमान ट्रिप कमाई
तुम्ही प्रत्येक शहरातून कोणत्याही ट्रिपवर काही किमान रक्कम कमावू शकता. यामुळे तुम्ही करत असलेल्या कष्टांसाठी, अगदी लहान ट्रिप्ससाठीही तुम्हाला निश्चितपणे कमाई होते.
सेवा शुल्क
या शुल्काची अॅप विकास आणि ग्राहक सहाय्य यासारख्या गोष्टींसाठी निधी देण्यास मदत होते.
रद्द करणे
बरेचदा, जर राइडरने विनंती रद्द केली असेल तर रद्द करणे फी तुम्हाला मिळेल.
प्रमोशन्स आणि त्यांचे काम कसे चालते
तुमच्या भागात ड्रायव्हर अॅपला कुठे सर्वाधिक राईड विनंत्या अपेक्षित आहेत याच्या आधारे ॲपमधील जाहिराती तुम्हाला पुढचे नियोजन करण्यात आणि जास्तीतजास्त कमाई करण्यासाठी लक्ष्य निश्चित करण्यात मदत करतात. सर्व प्रमोशन्स सर्व ड्रायव्हर्ससाठी उपलब्ध नसतात. खालील अटी पहा.²
ट्रिप्सची ठरावीक संख्या गाठा
ऑफर उपलब्ध असताना ठरावीक वेळेमध्ये तुम्ही ट्रिप्सची सेट संख्या पूर्ण केल्यास जास्तीचे पैसे कमवा.
गर्दीच्या वेळांदरम्यान गाडी चालवा
गर्दीच्या वेळात विशिष्ट भागांंमधील ट्रिप्ससाठी जास्ती पैसे मिळवा.
कमाई करण्याचे काही मार्ग
अॅप वापरून पुढे जाणे
तुम्ही गाडी चालवत असताना तुमच्या वेळेचा सदुपयोग करून घेण्यात मदत करणारी प्रभावी वैशिष्ट्ये या अॅपमध्ये आहेत. ट्रेंड्स ट्रॅक करण्यापासून ते जवळपासच्या कमाई करण्याच्या संधींबद्दल तुम्हाला माहिती देण्यापर्यंत, ॲप गाडी चालवत असतानाचे तुमचे संसाधन आहे.
तुम्ही दिलेल्या सेवेसाठी टिप्स मिळवा
प्रत्येक ट्रिपनंतर, राइडर्स थेट तुम्हाला थेट ॲपमधूनच सुलभपणे टिप देऊ शकतात. तुमच्या टिपची 100% रक्कम तुम्हीच ठेवू शकता.
तुम्हाला कधी आणि कसे पैसे मिळतात
जलद कॅश आऊट करा
पेमेंट मिळवणे खूप सोपे आहे. तुमच्याकडे फक्त एक बँक खाते असले पाहिजे. तुमची कमाई दर आठवड्याला ट्रान्सफर केली जाते.
तुमच्या ग्राहकाने रोख रक्कम दिल्यास
रोख रक्कम असल्यास, तुम्ही ट्रिप पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे मिळतात. ॲप तुम्हाला तुमच्या ग्राहकाकडून घ्यायची असलेली रक्कम दाखवेल आणि तुम्हाला Uber ला किती फी देणे आहे ते मोजेल.
गाडी चालवण्यावरील खर्चात बचत
तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवताना लवचीकता ठेवावी लागते आणि त्यावर खर्चही होतो. इंधन, विमा आणि वाहनाची देखभाल यासाठी करातून वजावट मिळू शकते Uber कडे तुम्हाला सहाय्य करण्यासाठी सवलती देणाऱ्या भागीदारी आहेत.
ड्राइवर ॲपची झटपट माहिती करून घ्या
आणखी जाणून घेण्यास इच्छुक आहात? Uber सोबत गाडी चालवताना सहाय्यासाठी तुमच्याकडे अन्य ड्रायव्हर्सच्या टिपा आणि माहितीपूर्ण व्हिडिओंनी भरपूर गो-टू हे संसाधन आहे.
ड्राइवर्सकडील प्रमुख प्रश्न
- मला माझ्या ट्रिपमधून मिळालेली कमाई कुठे दिसेल?
तुम्ही तुमच्या कमाईचा सारांश ॲपमध्ये पाहू शकता. तुमच्या नकाशावर भाडे चिन्हावर टॅप करा आणि त्यानंतर कमाई पाहण्यासाठी उजवीकडे आणि डावीकडे स्वाईप करा.
- मी Uber अॅपसह फक्त शनिवार व रविवार गाडी चालवू शकतो का?
Down Small होय. केव्हा आणि कशी गाडी चालवायची हे तुम्ही ठरवा. तुम्ही जर कमाई करण्याचा एखादा लवचीक मार्ग शोधत असाल Uber तुमच्यासाठी अगदी योग्य पर्याय ठरू शकतो.
- टोल्ससाठी ड्राइवर्सना पैसे दिले जातात का?
Down Small ट्रिपवर असताना टोलची रक्कम राइडर्सना चार्ज केली जाते आणि तुमच्या भाड्यामध्ये आपोआप जोडली जाते. तुम्ही तुमच्या टोलचा परतावा ॲपमध्ये कमाई विभागात किंवा ट्रिप तपशिलांमध्ये पाहू शकता.
¹या पृष्ठावर दिलेली सामग्री ही केवळ माहितीच्या उद्देशांनी आहे आणि कमाईची हमी देत नाही. कमाईची संरचना शहरानुसार बदलू शकते. तुमच्या शहरातील डिलिव्हरीच्या भाड्यांबाबत सर्वांत अचूक तपशिलांसाठी नेहमी तुमची विशिष्ट शहरासाठीची वेबसाइट तपासा.
²तुम्ही एखाद्या प्रमोशनसाठी पात्र असता तेव्हा Uber तुम्हाला तसे सूचित करेल. प्रमोशन्ससाठी प्रतिबंध लागू होतात. विशिष्ट प्रमोशन किंवा साधनामधील कोणतेही प्रतिबंध आणि अटी तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. असे प्रमोशन मिळवण्यासाठी गरजेच्या असलेल्या आवश्यकतांसह परंतु त्यापुरते मर्यादित न ठेवता, कोणतेही प्रमोशन बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार Uber राखून ठेवते.