Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

Uber चा 2022 ईएसजी रिपोर्ट आमच्या व्यवसायासाठी आणि गुंतवणूकदार, कर्मचारी आणि शहरे, आणि ड्रायव्हर्स, कुरियर्स, व्यापारी तसेच काम, खाद्यपदार्थ, वस्तू, कुटुंब आणि मित्रांशी कनेक्ट होण्यासाठी आमचा प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या ग्राहकांसह आमच्या सर्व भागधारकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पर्यावरणविषयक, सामाजिक आणि शासकीय (ईएसजी) समस्यांवरील आमचा दृष्टीकोन हायलाइट करतो. सचोटी, उत्तरदायित्व आणि आदर यावर आधारित हे स्थायी नातेसंबंध आम्हाला जगाचे चलनवलन अधिक चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी नव्याने कल्पना करण्यास बळ देतात.

अन्यथा नमूद केले असल्याखेरीज, हा डेटा 31 डिसेंबर 2021 पर्यंतचा आहे. या रिपोर्टमधील कथनात जुलै 2022 पर्यंतच्या समस्यांचा समावेश असू शकतो.

ईएसजी ठळक मुद्दे

 • पर्यावरणविषयक

  • जागतिक स्तरावर 2040 पर्यंत शून्य-उत्सर्जन वाहनांमध्ये, मायक्रोमोबिलिटीवर किंवा पब्लिक ट्रांझिटद्वारे 100% राईड्स हे ध्येय गाठण्यासाठी काम करत आहोत
  • 2022 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत, कॅनडा, युरोप आणि यूएसमध्ये Uber प्लॅटफॉर्मवर शून्य-उत्सर्जन राईड्ससह 1.33 कोटी ट्रिप्स देणारे दर महिन्याला सरासरी 26,000 ॲक्टिव्ह ड्रायव्हर्स आहेत
  • आम्ही ग्लोबल स्कोप 1, 2 आणि 3 उत्सर्जनाबद्दलचा अहवाल प्रथमच सादर करत आहोत
  • सस्टेनेबिलिटी अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्ड (एसएएसबी) आणि टास्क फोर्स ऑन क्लायमेट-रिलेटेड फायनान्शियल डिस्क्लोजर्स (टीसीएफडी) च्या शिफारशींनुसार अनुक्रम ठेवला
  • आम्ही आता आमच्या यूएसमधील ऑफिसेसमध्ये 100% नूतनीकरणक्षम ऊर्जा वापरत आहोत
 • सामाजिक

  • ड्रायव्हर आणि कुरियर यांचे कल्याण: जागतिक स्तरावर विविध सत्रांद्वारे ड्रायव्हर्स आणि कुरियर्सचे सर्वेक्षण केले, त्यांचा अनुभव अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी (अधिकाऱ्यांसह) कर्मचाऱ्यांना गाडी चालवण्यास आणि डिलिव्हर करण्यास सांगितले, आणि स्वतंत्र काम सुधारण्याच्या संधींबद्दल पारदर्शकता असलेले पेपर्स काही देशांमध्ये पब्लिश केले.
  • पीपल अँड कल्चर: मनुष्यबळ व्यवस्थापन, डीईआय समस्या आणि इतर मुद्दे समाविष्ट असलेला आमचा 5 वा रिपोर्ट प्रकाशित केला
  • स्थानिक प्रभाव: ईएसजी आणि भागधारकांच्या गंभीर समस्यांवर डझनभर पोस्ट्स, पेपर्स आणि इम्पॅक्ट रिपोर्ट्स प्रकाशित केले
  • शहरी वापर: शहरी विकास, वाहतूक आणि राइडशेअरिंगमधील ट्रेंड्सबाबत आम्ही जगभरातील 8 शहरांमध्ये केलेल्या अभ्यासाचे विश्लेषण प्रकाशित केले
 • प्रशासन

  • डेटा सुरक्षा: कोर बिझनेस लाइन्सची महत्त्वपूर्ण प्रमाणपत्रे आणि रिपोर्ट्स प्राप्त केले (आयएसओ 27001, एसओसी 2, एसओसी 2 टाइप 2)
  • राजकीय सक्रियता: 2022 मध्ये, आम्ही Uber चा यूएस पॉलिटिकल एंगेजमेंट रिपोर्ट रिलीज केला, ज्यामध्ये अमेरिकेतील आमच्या कॉर्पोरेट राजकीय सक्रियता धोरणाचा सारांश, बोर्ड-स्तरीय निरीक्षण आणि थेट लॉबिंगचे क्रियाकलाप समाविष्ट आहेत.
1/3

इम्पॅक्ट

जगभरात, नवीन स्वरूपात सामान्य होत असलेल्या वातावरणात आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे पुन्हा रुळावर आणण्यात Uber आपली भूमिका निभावत आहे. आम्ही शहरे आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करत आहोत, आरोग्य आणि मोबिलिटी कंपन्यांसोबत भागीदारी करत आहोत आणि लोक व शहरे धावती रहावीत यासाठी विविध नवीन उत्पादने आणि ऑफरद्वारे नवीन वापरकर्त्यांना Uber शी जोडत आहोत. या आव्हानात्मक, वेगाने बदलत्या काळात शहरांना सेवा पुरवत राहणे हा आमच्यासाठी 'नेहमी योग्य तेच करण्याचा' मार्ग आहे. आणि नेहमीच राहील.

Uber 2010 मध्ये सुरू झाल्यापासून, आमच्या तंत्रज्ञानाने जगभरातील लाखो लोकांना त्यांना हवे तेव्हा, हवे तिथे आणि हवे तसे कमाई करण्याची संधी दिली आहे. आज, Uber हा कामासाठी जगातील सर्वात मोठा ओपन प्लॅटफॉर्म आहे, आणि तो 72 देश आणि 10,000 हून अधिक शहरांमध्ये पैसे कमावण्याच्या संधी देतो. 2016 ते 2021 दरम्यान, 3.1 कोटींहून अधिक लोकांनी कमाई करण्यासाठी Uber च्या प्लॅटफॉर्मचा वापर केला. एकूणात, त्यांनी टिपा वगळ US$150 बिलियनपेक्षा जास्त कमाई केली.

Uber वापरणारे ड्रायव्हर्स आणि कुरियर्स ते सेवा देत असलेल्या शहरे आणि देशांइतकेच वैविध्यपूर्ण आहेत. त्यामध्ये व्यावसायिक ड्रायव्हर्स, सेवानिवृत्त सैनिक, विद्यार्थी, कामावर परतत असलेले पालक, प्राथमिक उत्पन्नाला हातभार लावणारे लोक आणि याव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश आहे.

पीपल अँड कल्चर

विविध प्रकारच्या लोकांना आकर्षित करणे आणि त्यांना टिकवून ठेवणे आमच्यासाठी आवश्यक आहे—विशेषतः अशा लोकांना जे आमच्या ध्येयाने प्रेरित असतील आणि त्याबद्दल उत्साही असतील. आम्हाला अशा दृढनिश्चयी लोकांची गरज आहे ज्यांना आमच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या जगभरातील प्रत्येकाचे काम अधिक चांगल्या प्रकारे कसे होऊ शकेल यासाठी काही करण्याची इच्छा आहे. आम्ही प्रत्येकासाठी योग्य असू शकत नाही याची आम्हाला जाणीव आहे, म्हणूनच आम्ही कोण आहोत आणि Uber मध्ये काम करणे कसे असते याबाद्दल स्पष्टता राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

कर्मचाऱ्यांंसाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे आणि ते येथे का टिकून राहतात आणि त्यांचे करिअर येथे का घडवतात हे समजून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून डेटा गोळा करत आहोत. आमची प्राधान्ये आणि दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी आम्ही या सखोल माहितीचा वापर करत आहोत. त्याचा परिणाम असा की आम्ही कर्मचाऱ्यांच्या 6 वेगवेगळ्या गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे: अभिमान, आपलेपणा आणि समानता, विकास, मोबदला, कल्याण आणि विश्वास. हे मनुष्यबळ धोरण याची खात्री करते आहे की आम्ही आमच्या वैविध्यपूर्ण कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन यातील प्रत्येक महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये एक सहभागपूर्ण, न्याय्य आणि सर्वसमावेशक अनुभव निर्माण करणे सुरू ठेवू.

पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान बदल

पृथ्वीवरील सर्वात स्वच्छ प्लॅटफॉर्म. हेच आमचे ध्येय आहे. कारण आमच्या व्यवसायासाठी आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून असलेल्या सर्वांसाठी हीच सर्वात योग्य कृती आहे. आम्ही मानतो की हे ध्येय गाठणे आमचे गुंतवणूकदार, आमचे कर्मचारी, आमचे वापरकर्ते, आम्ही सेवा देत असलेली शहरे आणि एकंदरच आपली पृथ्वी अशा सर्वांच्याच फायद्याचे आहे.

आम्ही हा प्रवास 2020 मध्ये काही मूलभूत वचनबद्धतांसह सुरू केला होता. आम्ही 2040 पर्यंत स्कोप 1, 2, आणि 3 अशा सर्व उत्सर्जनांमध्ये नेट झीरो (निव्वळ शून्य) होण्याचे ध्येय ठेवत आहोत. ते साध्य करण्याचा एक भाग म्हणून आम्ही 2030 पर्यंत यूएस, कॅनडा आणि युरोपमध्ये, तसेच 2040 पर्यंत जागतिक स्तरावर आम्ही काम करत असलेल्या प्रत्येक बाजारपेठेत आमच्या प्रवासी मोबिलिटी प्लॅटफॉर्मवरील 100% राईड्स शून्य-उत्सर्जन वाहनांमध्ये (ZEVs), मायक्रोमोबिलिटीवर किंवा सार्वजनिक परिवहनावर पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.

पारदर्शकतेबद्दलतेची आमची वचनबद्धता आणि हवामान-उत्सर्जनाबाबत लेखांकन, नियोजन आणि प्रकटीकरणावरील सर्वोच्च स्टॅंडर्ड्स गाठण्याचे आमचे उद्दिष्ट यांचा एक भाग म्हणून, आम्ही टास्क फोर्स ऑन क्लायमेट-रिलेटेड डिसक्लोजर (टीसीएफडी) च्या शिफारसींना अनुसरून एक विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातील सविस्तर मुद्दे या विभागात पुढे आढळून येतील, आणि त्यांचा संदर्भ सर्वत्र दिला गेला आहे. याशिवाय, आम्ही विज्ञान-आधारित लक्ष्ये हा उपक्रम आणि 2040 पर्यंत नेट झीरो गाठण्यासाठी वचनबद्ध करणारी क्लायमेट प्लेज (हवामान प्रतिज्ञा) यामध्ये सामील झालो आहोत. 2021 मध्ये, आम्ही एक पर्यावरण धोरण प्रकाशित केले.

प्रशासन

आमचे संचालक मंडळ सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी वचनबद्ध आहे आणि आम्ही आमच्या सांस्कृतिक, शासकीय आणि कॉर्पोरेट जबाबदारीच्या संदर्भात आमच्या भागधारकांशी पारदर्शक आणि त्यांच्याप्रति उत्तरदायी असले पाहिजे यावर मंडळाचा ठाम विश्वास आहे. जागतिक दर्जाची सार्वजनिक कंपनी प्रशासकीय संरचना तयार करण्याच्या आमच्या प्रवासात, आम्ही विविध पार्श्वभूमी, कौशल्ये आणि अनुभव असलेल्या लोकांसह एक सशक्त संचालक मंडळ नेमले आहे.

आमच्या भौतिकता मूल्यमापनात ओळखल्या गेलेल्या ईएसजी समस्या आमच्या व्यवसायाच्या दीर्घकालीन यशासाठी आणि आमच्या व्यावसायिक धोरणासाठी महत्त्वपूर्ण आहेत. वस्तुतः, आणि योग्य त्याप्रमाणे, या समस्यांवर Uber चे संचालक मंडळ आणि बोर्डाच्या स्वतंत्र लेखापरीक्षण, नुकसान भरपाई आणि नामनिर्देशन आणि प्रशासकीय समित्या लक्ष ठेवून असतात.

या रिपोर्टमध्ये आमच्या भविष्यातील, व्यावसायिक अपेक्षांबाबत पुढील वाटचालीचा वेध घेणारी विधाने असू शकतात, आणि त्यांत जोखमी आणि अनिश्चिततांचा समावेश आहे. वास्तविक परिणाम अंदाजित परिणामांपेक्षा फार वेगळे असू शकतात, आणि नोंदवलेले परिणाम हे भविष्यातील कामगिरीचे संकेत म्हणून मानले जाऊ नयेत. अधिक माहितीसाठी कृपया आमचा 2022 ईएसजी रिपोर्ट पहा.

या रिपोर्टमधील हरितगृह वायू उत्सर्जनाच्या डेटाची पडताळणी लॉईड्स रजिस्टर क्वालिटी ॲश्युरन्सने केली आहे. एलआरक्यूए चे पडताळणी निवेदन येथे पाहू शकता.