ग्राहक, पाहुणे आणि कर्मचार्यांसाठी राईड्सची व्यवस्था करा
जागतिक स्तरावर उपलब्ध Central च्या सहाय्याने Uber for Business युजर्स जगातील सर्वात मोठ्या मोबिलिटी नेटवर्कचा लाभ घेऊन कोणासाठीही राईड्सची विनंती करू शकतात, जरी त्यांच्याकडे Uber ॲप नसले तरीही.
ग्राहकांसाठी उत्तम, व्यवसायासाठी त्याहून अधिक चांगले
खर्च ऑप्टिमाइझ करा
फक्त घेतलेल्या राईड्सचे पैसे देऊन आणि तुमच्या डॅशबोर्डवर खर्च ट्रॅक करून पैसे वाचवा.
तुमचा ग्राहक अनुभव सुधारा
तुमच्या ग्राहकांसाठी राईड्स शेड्युल करा. प्रीमियम राईड्सची विनंती करा किंवा तासानुसार राईड्स बुक करा.
ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवा
आवर्ती राईड्स शेड्युल करा किंवा मध्यवर्ती डॅशबोर्डद्वारे त्याच ट्रिपची सहजपणे विनंती करा.
लोनर कार्सवरचे तुमचे अवलंबित्व कमी करा
लोनर कार आणि शटलचा वापर तसेच त्यांच्याशी संबंधित शुल्क कमी करा.
मध्यवर्ती डॅशबोर्डवरून राईड्सवर लक्ष ठेवा
सध्या चालू असलेल्या आणि आगामी राईड्सची स्थिती एकाच ठिकाणी पहा.
तुमच्या कर्मचार्यांची काळजी घ्या
तुमच्या कर्मचार्यांना हवे तिथे जाऊ द्या आणि त्यांच्या वापरावर लक्ष ठेवा.
फीचर स्पॉटलाइट
ग्रुपला वेगवेगळ्या लोकेशन्सवर ड्रॉप ऑफ करा
तुम्ही शिफ्टनंतर स्टाफला किंवा डीलरशिपमधील ग्राहकांचा समूहघरी आणत असाल , आता 5 पर्यंत ड्रॉप-ऑफ थांब्यांसह तुम्ही एक ट्रिप आयोजित करू शकता. प्रत्येक रायडरला एक एसएमएस पाठविण्यात येईल आणि तो राईड ट्रॅक करू शकेल.
ते अशा प्रकारे काम करते
समन्वयक राईडची व्यवस्था करतात
- विनामूल्य खाते तयार करून किंवा तुमची Uber for Business क्रेडेन्शियल्स वापरून Central मध्ये लॉग इन करा.
- राईड तयार करा, त्यानंतर तुमच्या रायडरचा फोन नंबर आणि पिकअप आणि ड्रॉपऑफ लोकेशन्स टाका.
- तुमच्या रायडरचा पसंतीचा वाहन प्रकार निवडा आणि ड्रायव्हरसाठी कोणत्याही सूचना जोडा.
रायडर्सना त्यांच्या राईडबद्दल सूचित केले जाते
4. रायडरला त्यांच्या राईडचे तपशील आणि त्यांची ट्रिप ट्रॅक करण्यासाठीच्या लिंकसह एक एसएमएस पुष्टीकरण मिळेल—Uber ॲप आवश्यक नाही.
5. रायडरकडे Uber ॲप असल्यास, ते ॲपमध्ये ट्रिप्स ट्रॅक करू शकतात, सुरक्षा वैशिष्ट्ये ॲक्सेस करू शकतात आणि आमच्या ग्राहक सहाय्य टीमशी संपर्क साधू शकतात.
समन्वयक ट्रिप्स ट्रॅक आणि व्यवस्थापित करू शकतात
6. समन्वयक राईडच्या प्रगतीवर लक्ष ठेवू शकतात, ड्रायव्हरला मेसेज पाठवू शकतात आणि त्यांच्या डॅशबोर्डवर सर्व आगामी बुकिंग्ज पाहू शकतात.
7. राईड पूर्ण झाल्यानंतर, समन्वयक कोणत्याही वेळी ट्रिपचे तपशील आणि खर्च पाहू—आणि खर्चाचे रिपोर्ट्स डाउनलोड करू—शकतात.
तुमच्या व्यवसायासाठी कस्टमाइझ करण्यायोग्य वैशिष्ट्ये
वन-वे किंवा राउंड-ट्रिपच्या राईड्स
वन वे राईडची किंवा राउंड-ट्रिपची व्यवस्था करा.
शेड्युल केलेल्या राइड्स
जास्तीत जास्त 30 दिवस आधी राईड्स सहजपणे शेड्युल करा.
सोयीस्कर राईड्स
तुमच्या रायडरला त्यांच्या राईडची अचूक वेळ निवडू द्या.
निवडण्यासाठी वाहनांचे प्रकार
उपलब्ध राईड पर्यायांमध्ये UberX, Uber Green, UberXL, Uber Black आणि इतर समाविष्ट आहेत.*
ड्रायव्हरसाठी मेमोज आणि नोट्स
कोणत्याही विशेष सूचनांसह ड्रायव्हरसाठी एक अंतर्गत मेमो किंवा टीप जोडा.
सुरळीत बिलिंग आणि रिपोर्टिंग
प्रवास डेटा रिपोर्ट्स मिळवा आणि मासिक स्टेटमेंट्ससह खर्च पहा.
एसएमएस संवाद
रायडर्सना पिकअप लोकेशन, ड्रायव्हरचे नाव आणि वाहनाचे तपशील यासह ट्रिपचे तपशील एसएमएसद्वारे मिळतील. कोणत्याही Uber ॲपची आवश्यकता नाही.
ट्रिप लिंक करणे
Uber ॲप असलेल्या रायडर्ससाठी, ट्रिप्स आपोआप त्यांच्या Uber खात्याशी जोडल्या जातात. Central द्वारे त्यांच्यावतीने विनंती केल्या गेलेल्या ट्रिप्ससाठी रायडर्सकडून शुल्क घेतले जाणार नाही.
ट्रिप ट्रॅकिंग
रायडर्स त्यांची ट्रिप Uber ॲपमध्ये किंवा कोणत्याही वेब ब्राउझरवर वेबव्ह्यू नकाशा वापरून लाईव्ह ट्रॅक करू शकतात.
रायडर-ड्रायव्हर संवाद
पिकअप लोकेशनबाबत समन्वय साधण्यासाठी रायडर्स ड्रायव्हरशी संपर्क साधू शकतात.
भाषेची प्राधान्ये
एसएमएस संवाद सुलभ करण्यासाठी समन्वयक रायडर्ससाठी भाषा प्राधान्य निर्दिष्ट करू शकतात.