सॅमसंग Uber Eats च्या माध्यमातून स्थानिक व्यवसायांना मदत करत आहे
जेव्हा COVID-19 आला, सॅमसंग कॅनडा टीमला माहीत होते की त्यांच्या लोकप्रिय गॅलक्सी डिव्हाइससाठी सामान्य बचत प्रमोशन पेक्षा जास्त करू करू इच्छितात. त्याऐवजी त्यांना असे काहीतरी युनिक करायचे होते जे स्थानिक व्यवसायांना सपोर्ट करू शकेल.
Uber for Businessशी कनेक्ट केल्यानंतर कल्पनाशक्तीवर जोर दिल्यानंतर,त्यांंना युनिक प्रमशनची कल्पना सुचली. सॅमसंगने ग्राहकांला $100 मूल्याची Uber Eats क्रेडिट्स कॅनडामध्ये कोणत्याही गॅलेक्सी S20 सिरिज 5G, गॅलेक्सी S10 सिरिज, गॅलेक्सी नोट10 सिरिज, किंवा गॅलेक्सी टॅब S6 च्या खरेदीवर ऑफर केली.
पहिल्या 30 दिवसांच्या आतच ग्राहकांचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक असणार हे स्पष्ट झालं. सॅमसंगने टॅब्लेटसाठी मोठी मागणी नोंदवली, ज्याचा परिणाम म्हणून प्रमोशनच्या कालावधीत मोबाइल उपकरणांच्या विक्रीत 20% वाढ झाली. ही वाढ मूळ अंदाजापेक्षा 30% नी जास्त होती.
"Uber for Business सोबतची आमची भागीदारी अनेक दृष्टींनी फायदेशीर ठरली," असे सॅमसंगच्या मोबाईल सेल्स अँड प्रॉडक्ट मॅनेजमेंट विभागाच्या उपाध्यक्ष, जेनिफर सॅफ्रुक म्हणतात. “सॅमसंग गॅलेक्सीच्या ग्राहकांना त्यांच्या डिव्हाइसच्या खरेदीने एक अर्थपूर्ण बोनस दिला, आणि एकत्र येऊन आम्ही आमच्या स्थानिक व्यवसायांना सपोर्ट करू शकलो.”
लोकांनी पात्र डिव्हाइस खरेदी केल्यानंतर, त्यांना Uber Eats द्वारे 4 पर्यंत ऑर्डर्ससाठी $25 चा प्रमोशन कोड मिळाला. या प्रमोशनच्या मल्टीचॅनल रोलआउटमध्ये सोशल मीडिया पोस्ट्स, ग्राहकांना ईमेल आणि Samsung.com वरील प्रमोशन्सचा समावेश होता, ज्यामध्ये गॅलेक्सी स्टोअर, सॅमसंग मेंबर्स, सॅमसंग पे आणि सॅमसंग हेल्थ यांचा समावेश होता.
“आमच्या ग्राहकांसाठी विक्री वाढवण्यास मदत करण्याच्या दृष्टीने, Uber for Business च्या सेवा कशा सर्जनशील आणि प्रभावी ठरू शकतात, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे,” असे Uber for Business ’मधील व्यवसाय धोरण आणि ऑपरेशन्सचे प्रमुख, पॉल फॅरिस यांनी म्हटले आहे. “आमची टीम आमच्या ग्राहकांसोबत भागीदारी करण्यात निष्णात आहे, ज्यामुळे ग्राहकांची कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण होतात आणि त्याच वेळी अंतिम युजरलाही फायदा होतो.”
तुम्ही कोणत्याही उद्योगात असलात तरी व्यवसाय हलता ठेवा
Uber for Business मदतीस येऊ शकते.