Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

संदीप जैन

मुख्य उत्पादन अधिकारी आणि एसव्हीपी अभियांत्रिकी

संदीप जैन हे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर आणि एसव्हीपी इंजिनिअरिंग असून ते कंपनीच्या ग्लोबल मोबिलिटी आणि डिलिव्हरी उत्पादनांसाठी जबाबदार आहेत, ज्यात इंजिनिअरिंग, उत्पादन व्यवस्थापन, डिझाइन, अप्लाइड/डेटा विज्ञान आणि उत्पादन ऑपरेशन्सचा समावेश आहे.

Uber मध्ये सामील होण्यापूर्वी, संदीप गुगलच्या सर्च ॲड्स ग्रुपमध्ये प्रॉडक्ट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष होते, जिथे त्यांनी गुणवत्ता, किंमत आणि युजर अनुभवासह जाहिरातदारांशी युजर्सचा व्यावसायिक हेतू जोडण्याचे काम केले. संदीप यांनी नकाशे आणि शोध या दोन्ही माध्यमातून युजर्सना स्थानिक जाहिरातदारांशी जोडून स्थानिक व्यापार सक्षम करण्याचे काम केले. करिअरमध्ये सुरूवातीला संदीप हे झिंगा येथे उपाध्यक्ष होते आणि FIS या $100 अब्ज एंटरप्राइझ मूल्याच्या सार्वजनिक कंपनीने विकत घेतलेल्या एका टेक स्टार्टअपचे संस्थापक होते.

संदीेप यांनी UC बर्कले येथून सर्वोच्च ऑनर्ससह कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ सायन्सची पदवी घेतली आहे आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन केले आहे, जिथे ते बेकर स्कॉलर होते.