Please enable Javascript
Skip to main content

Madridमध्ये फिरणे

तुम्ही Madrid मध्ये प्रवास करण्याचा विचार करत आहात का? तुम्ही व्हिजिटर असाल किंवा रहिवासी असाल, Madrid मधील तुमच्या अनुभवाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी या मार्गदर्शकाची मदत घ्या. Uber सह एअरपोर्टपासून हॉटेलपर्यंत प्रवास करा आणि लोकप्रिय मार्ग आणि अंतिम ठिकाणे शोधा.

search
लोकेशन एन्टर करा
search
अंतिम ठिकाण लिहा

Press the down arrow key to interact with the calendar and select a date. Press the escape button to close the calendar.

आत्ता
open

माद्रिदमध्ये फिरण्याचे 9 पर्याय

माद्रिद, स्पेनची रोमांचक राजधानी, हे आधुनिकता आणि इतिहास यांना एकत्रित करणारे शहर आहे. तुम्ही माद्रिदच्या ऐतिहासिक परिसरांमध्ये भटकंती करत असाल, जागतिक दर्जाची संग्रहालये पहात असाल किंवा तेथील पाककलेचा आनंद लुटत असाल, तुमचा हा अनुभव सुखकर करण्याची गुरुकिल्ली म्हणजे माद्रिदमध्ये सोयीस्कररीत्या पर्यटन करणे. सुदैवाने, या शहरात सर्व प्रकारच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करणारे विविध प्रकारचे वाहतुकीचे पर्याय उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही शहरातील रहदारीच्या रस्त्यांवर सहजतेने नेव्हिगेट करू शकता.

सबवे

माद्रिद मेट्रो ही जगातील सर्वात उत्कृष्ट आणि व्यापक सबवे सिस्टिम्सपैकी एक आहे, ज्यामुळे माद्रिदमध्ये फिरण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. 300 किलोमीटर्स पेक्षा जास्त लांबीच्या 12 लाईन्स असलेले ही मेट्रो, शहराची प्रमुख आकर्षणे, परिसर तसेच एयरपोर्टलाही जोडते. ट्रेन्स वारंवार धावतात आणि अनेक भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या स्पष्ट चिन्हे आणि नकाशांसह ही सिस्टम नेव्हिगेट करणे सोपे आहे. तुम्ही सिंगल-राईडची तिकिटे खरेदी करू शकता किंवा अमर्यादित प्रवासासाठी अनेक दिवसांच्या पासची निवड करू शकता. मेट्रो पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत चालते, त्यामुळे लवकर उठणाऱ्यांसाठी आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांसाठी हा एक सोयीस्कर पर्याय आहे.

बस

शहरात फिरण्याचा आणखी एक विश्वासार्ह मार्ग म्हणजे माद्रिदचे बस नेटवर्क. 200 हून अधिक रूट्सवर धावणाऱ्या बसेस, मेट्रो पोहोचू शकत नसलेल्या भागांपर्यंत पोहोचतात आणि प्रवास करण्यासाठी बसेस हा एक निसर्गरम्य पर्याय आहे. बसेस आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत, ज्यात एअर कंडिशनिंग आणि पुढील थांबा दाखवणारे डिजिटल डिस्प्ले यांचा समावेश आहे. तिकिटे बसमध्ये चढल्यावर काढता येतात किंवा मेट्रो स्थानकांवर खरेदी केली जाऊ शकतात आणि तेच प्रवास कार्ड बसेस आणि सबवेसाठीही वापरले जाऊ शकते. रात्रीच्या बसेस, ज्यांना बुहोस म्हणून ओळखले जाते, मेट्रो बंद झाल्यानंतर चालतात जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही वेळी माद्रिदमध्ये फिरता येऊ शकते.

ट्राम्स

मेट्रो किंवा बस नेटवर्क इतके विस्तृत नसले तरी, माद्रिदची ट्राम सिस्टिम शहराच्या काही भागांमध्ये पर्यटनासाठी एक आकर्षक पर्याय असू शकते. ट्राम्स विशेषतः शहराच्या बाहेरील भागात आणि काही उपनगरीय परिसरांमध्ये पोहोचण्यासाठी उपयुक्त आहेत. सुलभ आणि आरामदायक राईड देत, या ट्राम्समधून प्रवास करत असताना तुम्ही प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटू शकता. ट्रामची तिकिटे स्थानकांवर किंवा ट्राम्समध्ये चढल्यावर खरेदी केली जाऊ शकतात आणि ती शहराच्या इतर सार्वजनिक वाहतूक पर्यायांशी एकत्रित केली जाऊ शकतात.

टॅक्सीज

तुम्ही विशेषत: सामानासह प्रवास करत असल्यास किंवा थेट रूट पसंत करत असल्यास, माद्रिदमध्ये नॅव्हिगेट करण्यासाठी टॅक्सी हा सोयीस्कर आणि आरामदायक मार्ग आहे. माद्रिदमधील टॅक्सी त्यांच्या पांढर्‍या रंगावरून आणि लाल कर्णरेषा पट्ट्यावरून सहजपणे ओळखता येतात. तुम्ही रस्त्यात असताना कुठेही टॅक्सी बोलावू शकता, नियुक्त केलेल्या टॅक्सी रँक्सवर त्या उभ्या असतात किंवा फोनद्वारे तुम्ही आधी बुकिंगही करू शकता. भाडी मीटरनुसार असतात आणि ती साधारणपणे वाजवी असली तरीही, तुमच्या प्रवासाची अंदाजे किंमत आधीच तपासणे केव्हाही चांगले. टॅक्सीज 24/7 उपलब्ध असल्या कारणाने रात्री उशिराचा प्रवास असो किंवा सकाळी लवकर विमानतळावरील ट्रान्सफर असो, हा एक उत्तम विश्वासार्ह पर्याय आहे.

सायकली

वाहतुकीच्या अधिक सक्रिय पर्यायाचा आनंद घेणार्‍या लोकांसाठी, माद्रिदमध्ये फिरण्यास सायकलिंग हा अधिकाधिक लोकप्रिय पर्याय होत चालला आहे. शहरातील बाइक लेनचे नेटवर्क विस्तृत करण्यासाठी गुंतवणूक करण्यात आली आहे आणि सार्वजनिक बाइकशेअर सिस्टम ऑफर करण्यात आली आहे जी वापरून तुम्हाला छोट्या ट्रिप्ससाठी भाड्याने सायकली घेता येऊ शकतात. प्रसिद्ध एल रेटिरो पार्कसारखी माद्रिदची उद्याने एक्सप्लोर करण्याचा आणि शहराच्या आसपासच्या भागात लपलेली ठिकाणे पाहण्याचा, सायकलिंग हा एक उत्तम मार्ग आहे. आम्ही तुम्हाला हेल्मेट्स वापर असे सुचवितो तसेच, सायकलस्वारांना रहदारीचे नियम आणि पादचारी क्षेत्रांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

चालत फिरणे

माद्रिद शहराचे नीटनेटके नियोजन आणि पादचाऱ्यांसाठी अनुकूल रस्ते यामुळे पायी चालत फिरून शहर पहाणे सर्वात उत्तम. चालत फिरल्यामुळे तुम्ही तेथील वातावरणात तद्रूप होऊन तेथील आकर्षक प्लाझा पाहू शकता आणि स्थानिक कॅफे आणि दुकानांना भेट देऊ शकता. रॉयल पॅलेस, प्लाझा मेयर आणि ग्रॅन विया यासारखी माद्रिदची अनेक प्रमुख आकर्षणे एकमेकांपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. आरामदायक शूज घालायला विसरू नका, कारण तुम्ही बहुधा शहराच्या अशा ऐतिहासिक भागांमध्ये तासनतास भटकंती कराल.

कार रेंटल्स

सार्वजनिक वाहतुकीचे उत्कृष्ट पर्याय उपलब्ध असल्यामुळे माद्रिदमध्ये गाडी चालवणे आवश्यक नसले तरी, आजूबाजूचे प्रदेश पाहण्याचा किंवा रोड ट्रिपवर जाण्याचा तुमचा विचार असल्यास कार भाड्याने घेणे उपयुक्त ठरू शकते. विमानतळावर आणि संपूर्ण शहरात रेंटल कार सेवा उपलब्ध आहे. लक्षात असू द्या की माद्रिदमध्ये वाहतूक कोंडी खूप जास्त असू शकते, विशेषत: रहदारीच्या तासांमध्ये आणि शहराच्या मध्यभागी पार्किंग करणे आव्हानात्मक असू शकते. म्हणूनच, कार असल्यास तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे फिरता येते तसेच अगदी लांबच्या ठिकाणांपर्यंत तुम्हाला पोहोचता येते.

राईडशेअर सेवा

Uber माद्रिदमध्ये पारंपारिक टॅक्सींना एक सोयीस्कर पर्याय म्हणून उपलब्ध आहे. Uber ॲपसह, रोख व्यवहार न करता तुम्ही सहजपणे राईडची विनंती करू शकता, तुमच्या ड्रायव्हरच्या आगमनाची वेळ ट्रॅक करू शकता आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देऊ शकता. Uber सर्व प्रकार आणि आकाराच्या समूहांसाठी तसेच सर्वांच्या बजेट नुसार अनेक वाहन पर्याय प्रदान करते. हा नेहमीच सर्वात जास्त किफायतशीर पर्याय नसला, विशेषत: गर्दीच्या वेळी तरीही, घरोघरी सेवेची सुविधा आणि शहरभर आरामात प्रवास करण्यासाठी हा पर्याय उपलब्ध आहे.

ट्रेन्स

शहराच्या बाहेरील परिसर फिरण्याचा विचार असलेल्या लोकांसाठी, माद्रिदच्या ट्रेन सेवा स्पेनच्या इतर भागांशी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करतात. शहराची मुख्य रेल्वे स्टेशन्स जशी की अटोचा आणि चामार्टिन येथून बार्सिलोना, सेव्हिल आणि व्हॅलेंशिया सारख्या अंतिम ठिकाणांसाठी हाय-स्पीड ट्रेन उपलब्ध आहेत. सेरकानियास कम्युटर ट्रेन्स जवळपासच्या शहरांसाठी आणि पर्यटक स्थळांसाठी एक-दिवसीय ट्रिप्स करण्यास उत्तम पर्याय आहेत. तुम्ही ऑनलाइन किंवा स्टेशनवर तिकिटे खरेदी करू शकता आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी, विशेषत: गर्दीच्या प्रवासाच्या हंगामात, तुम्ही तिकिटे आधीच बुक करावीत असे आम्ही तुम्हाला सुचवितो.

Madridमध्ये Uber सह कार सेवा आरक्षित करा

Madrid मध्ये तुमच्या कार सेवेच्या गरजांसाठी Uber सह आधीच व्यवस्था करा. राईडची विनंती 90 दिवसांपर्यंत आधी कधीही करा, मग तुम्हाला Adolfo Suárez Madrid-Barajas Airport पर्यंत वाहतुकीची गरज असो, तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटला जायचे प्लॅन्स असोत किंवा तुम्हाला इतर कुठेतरी जायचे असो.

मध्ये टॅक्सी पर्याय ,Madridमध्ये राईड शेअरिंग

Madrid मध्ये कारशिवाय फिरणे Uber सह सोपे आहे. परिसरातील भेट देण्याची ठिकाणे शोधा, त्यानंतर आठवड्याच्या कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी राईडची विनंती करा. तुम्ही रिअल-टाइममध्ये राईडची विनंती करू शकता किंवा आधीच राईडची विनंती करू शकता जेणेकरून तुम्ही तयार असाल तेव्हा तुमची राईड देखील तयार असेल. तुम्ही मोठ्या ग्रुपसह असाल किंवा एकट्याने प्रवास करत असाल , तुमच्या गरजांनुसार राईड पर्याय शोधण्यासाठी तुम्ही ॲप वापरू शकता.

Uber ॲप उघडा आणि फिरण्यासाठी तुमचे अंतिम ठिकाण प्रविष्ट करा .Madrid

Madrid-भागातील एअरपोर्ट कार सेवा

Madrid मध्ये तुम्हाला जवळपासच्या परिसरातून किंवा इतर ठिकाणावरून एअरपोर्टपर्यंत प्रवास करावा लागल्यास ॲप उघडा आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी राईडची विनंती करा. आगमन आणि निर्गमनापर्यंत कार सेवा मिळवण्यासाठी Uber चा वापर कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी खाली जवळच्या एअरपोर्टच्या नावावर टॅप करा. लिंक केलेल्या एअरपोर्ट पृष्ठावर, तुम्हाला पिकअपसाठी तुमच्या ड्रायव्हरला कुठे भेटायचे, ट्रिपसाठी किती खर्च येईल हे आणि बरेच काही कळेल.

Madridपरिसरात फिरण्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडा, स्पेनपरिसरात फिरण्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडा

  • Madrid मध्ये टॅक्सी

    Madrid मध्ये फिरताना टॅक्सीजना पर्याय म्हणून Uber चा विचार करा. Uber सह, हात दाखवून थांबवायच्या कॅब्जऐवजी तुम्ही दिवसाच्या अगदी कोणत्याही वेळी मागणीनुसार राईड्सची विनंती करू शकता. एअरपोर्टवरून हॉटेलपर्यंत जाण्यासाठी, रेस्टॉरंटला जाण्यासाठी किंवा इतर‍ ठिकाणी जाण्यासाठी राईडची विनंती करा. निवड तुमची आहे. ॲप उघडा आणि सुरुवात करण्यासाठी अंतिम ठिकाण लिहा.

  • Madrid मध्ये सार्वजनिक वाहतूक

    सार्वजनिक वाहतुकीसह फिरणे हा प्रवास करण्याचा एक परवडणारा मार्ग आहे. भागानुसार, तुम्ही तुमच्या प्रवासाचे नियोजन करण्यात मदत करण्यासाठी Uber ट्रांझिट वापरुन जवळपासचे बस किंवा सबवे मार्ग पाहू शकता. तुमच्या आसपासच्या भागात Uber ट्रांझिट उपलब्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी ॲप उघडा किंवा Uber सह राइडशेअरिंग वापरून Madrid मधील लोकप्रिय ठिकाणांना भेट द्या.

  • Madrid मध्ये भाड्याच्या बाइक्स

    शहराच्या मध्यभागात फिरण्यासाठी बाइक चालवणे हा एक इको-फ्रेंडली मार्ग आहे. निवडक शहरांमध्ये, तुम्ही Uber सह इलेक्ट्रिक बाइक्स शोधू शकता आणि राईड करू शकता. Madrid मध्ये बाइक्स उपलब्ध आहेत का ते पाहण्यासाठी ॲप उघडा. Madrid मध्ये बाइक्स उपलब्ध असल्यास, राईड करताना न विसरता हेल्मेट घाला आणि वाहतूक नियमांचे पालन करा.

1/3
1/2
1/1

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • होय. Uber ॲप तुम्हाला Madrid मध्ये कुठेही जाण्यासाठी 24/7 कधीही राईडची विनंती करण्याची सेवा प्रदान करते .

  • Madridमध्ये प्रवास करताना, तुम्ही Uber च्या मदतीने तुमच्या बजेटसाठी सर्वात योग्य असा राईड पर्याय निवडू शकता. अंदाजे भाडे पाहण्यासाठी, अ‍ॅप उघडा आणि “कुठे जायचे?” बॉक्समध्ये तुमचे अंतिम ठिकाण लिहा. प्रत्येक राईडसाठी अंदाजे भाडे दिसून येईल; सध्या काय उपलब्ध आहे ते पाहण्यासाठी स्क्रोल करा.

  • होय. Madrid मधील कार सेवेची विनंती करण्यासाठी तुमचे Uber ॲप उघडा आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे तुम्हाला तुमचा ड्रायव्हर नेऊन पोहोचवेल . (Madrid मध्ये उपलब्ध असलेले वाहतुकीचे इतर पर्यायदेखील तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये दिसू शकतील.)

  • तुमच्या शहरात कार रेंटल्स उपलब्ध आहेत का हे पाहण्यासाठी Uber ॲप तपासा. उपलब्ध असल्यास, रेंट निवडा आणि Uber ॲप वापरून रेंटल प्रदात्यासह तुमचे रिझर्व्हेशन पूर्ण करा. त्यानंतर Madrid मध्ये किंवा तुम्हाला जिथे जावेसे वाटेल तिथे प्रवास करा.

  • Madridमध्ये प्रवास करताना तुमच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. तुम्हाला मदतीची गरज पडल्यास, अधिकाऱ्यांना कॉल करण्यासाठी तुम्ही आपत्कालीन सहाय्य बटणासारखी अ‍ॅपमधील वैशिष्ट्ये केवळ टॅप करून वापरू शकता.