मुख्य सामग्रीवर जा

कायद्याचे पालन करा

हा विभाग कायदे आणि नियमांवर आधारित आहे ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. उदाहरणार्थ, कोणताही गुन्हा करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी Uber ऍप्सचा वापर करण्‍यास मनाई आहे.

शिशु आणि लहान मुलांसह प्रवास करताना ड्रायव्हर आणि रायडर्सनी स्थानिक कायद्यांचे पालन केले पाहिजे. मुलांसह राईड घेत असताना, योग्य आणि अनुकूल कार सीट प्रदान करणे ही खाते धारकाची 'जबाबदारी आहे. 12 व त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांनी मागील सीटवर बसून प्रवास करावा.

तुम्ही Uber ऍप्स वापरताना नेहमीच संबंधित स्थानिक कायद्यांची माहित करून घेण्यास आणि त्यांचे पालन करण्‍यास जबाबदार आहात या नियमांमध्‍ये तुम्ही विमानतळावर असताना विमानतळाचे नियम आणि रस्तयावर असताना वाहनांची गती आणि रहदारीच्या नियमांचा समावेश होतो.

स्थानिक कायद्यांनुसार ड्राइव्हर्सनी अशा कोणत्याही रायडर्सना राईड्स द्याव्यात ज्या रायडर्ससोबत सेवा देणारे प्राणी आहेत. ड्रायव्हरला एलर्जी असली, त्याला धार्मिक बाबतीत काही आक्षेप असले किंवा प्राण्यांची भीती वाटत असली तरीदेखील, रायडसोबत असणार्‍या सेवा देणार्‍या प्राण्यांमुळे रायडरला ट्रिप नाकारल्यामुळे Uber ऍप्स मधील ऍक्सेस गमावला जाऊ शकतो.

Uber ऍप्स वापरत असताना अंमली पदार्थांचा वापर आणि मद्याचे खुले कंटेनर्स यांस कधीही अनुमती दिली जात नाही.

रायडर्स आणि त्यांचे अतिथी, तसेच ड्राइव्हर्स् यांना लागू कायद्यानुसार परवानगी मिळालेल्या मर्यादेव्यतिरिक्त Uber ऍप वापरताना बंदुक किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे.

फसवणूक करण्‍यामुळे विश्वास गमावला जाऊ शकतो आणि ते धोकादायक देखील असू शकते. साइन इन करताना किंवा सुरक्षिततेच्या तपासणीत असताना, हेतुपुरस्सर खोटी माहिती सांगणे किंवा एखाद्याची 'ओळख गृहित धरणे, यास परवानगी नाही.

एखाद्या घटनेची तक्रार करताना, तुमची Uber खाती तयार करताना आणि त्यात ऍक्सेस करताना, चार्जेस किंवा शुल्काबाबतीत विवाद असताना आणि क्रेडिट्सची विनंती करताना अचूक माहिती द्या. तुम्ही ज्यासाठी पात्र आहात केवळ अशा फी किंवा परताव्याची विनंती करा आणि केवळ हेतूनुसार ऑफर आणि प्रोमो वापरा. जाणूनबुजून अवैध व्यवहार पूर्ण करू नका.

प्रत्येक अनुभवाची सुरक्षितता वाढविण्यासाठी, ऑफ-अॅप निवड करणे प्रतिबंधित आहे. Uber ऍप्स वापरताना कायद्यानुसार स्ट्रीट हेलिंगला प्रतिबंध आहे, म्हणून Uber सिस्टमच्या बाहेर कधीही देय मागू नका किंवा स्वीकारू नका. Uber ने सुलभ केलेले पेमेंट पर्याय जोपर्यंत रायडर वापरत नाही तोपर्यंत, Uber सिस्टममध्‍ये समावेश नसलेले देय ड्रायव्हर्सनी मागू नये किंवा स्वीकारू नये.

परवानगीशिवाय Uber चा ट्रेडमार्क किंवा बौद्धिक मालमत्ता वापरण्यासारख्या गोष्टी करून व्यवसायाला किंवा ब्रँडला कधीही नुकसान पोहचवू नका.

कोणत्याही Uber खात्याचा वापर बेकायदेशीर, भेदभाववादी, द्वेषपूर्ण किंवा लैंगिक सुस्पष्ट क्रियाकलापांचा भाग म्हणून Uber ऍप्सवर राईड, बाइक किंवा स्कूटर ट्रिप्स, परिवहन यांची व्यवस्था करण्यासाठी आणि त्याकरिता पैसे देण्यासाठी किंवा त्यांच्या वापराची जाहिरात करण्यासाठी केला जाऊ शकत नाही.

आणखी समुदाय मार्गदर्शक तत्त्वे पहा

प्रत्येकाशी आदराने वागा

एकमेकांना सुरक्षित ठेवण्यास मदत करा