कोविड -19 मुळे, अनेक क्षेत्रांमध्ये Uber Pool तात्पुरते निलंबित करण्यात आला आहे. तपशीलांसाठी आपला अॅप तपासा.
या पृष्ठावरील राईड पर्याय हे Uber च्या उत्पादनांचे नमुने आहेत आणि तुम्ही Uber अॅप जेथे वापरता तेथे कदाचित काही उपलब्ध नसतील. तुम्ही तुमच्या शहराचे वेब पेज पाहिल्यास किंवा अॅपमध्ये पाहिल्यास, तुम्ही कोणत्या राइड्सची विनंती करू शकता ते तुम्हाला दिसेल.
Uber Pool सोबत राईड का घ्यावी
वाटेत असताना पिकअप करा
Uber अॅप कारमधील रिकाम्या सीट्स भरण्यासाठी तुमच्या मार्गावरील रायडर्सचा शोध घेते. तुमच्या सह-रायडर्सना हसून अभिवादन करा—तुम्ही मिळून पैसे वाचवत आहात.
यासाठी थोडा अधिक वेळ लागतो
अतिरिक्त रायडर्समुळे, तुम्हाला पोहचायला थोडासा जास्त वेळ लागू शकेल पण तुम्हाला तुमची अंदाजे आगमन वेळ अॅपमध्ये नेहमी दिसत राहील. तुम्ही घाईमध्ये असल्यास, UberX वापरून पहा.
प्रत्येक विनंतीस जास्तीत जास्त 2 सीट्स
तुम्ही मित्रासह Uber Pool वापरुन एका राइडची विनंती करू शकता, परंतु जर तुम्ही 2 पेक्षा जास्त लोक किंवा अतिरिक्त सामान घेऊन राईड करत असाल तर, UberX किंवा अधिक जागा उपलब्ध असणारे अन्य पर्याय निवडा.
UberPool कसे कार्य करते
1. विनंती करा
Uber अॅप उघडा आणि "कुठे जायचे?" बॉक्समध्ये तुमचेे अंतिम ठिकाण टाका. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी असलेल्या UberPool राईड पर्यायावर टॅप करा. त्यानंतर UberPool ची पुष्टी करा वर टॅप करा. तुम्ही 2 लोकांकरिता UberPool ची विनंती करू शकता.
तुमचे ड्रायव्हर पोहोचेपर्यंतचा वेळ तसेच तुमच्या अंतिम ठिकाणावर पोहोचण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ तुम्हाला दिसेल.
2. राईड घ्या
तुम्ही तुमच्या पिकअप स्थानावर जात असताना Uber अॅपमधील नकाशा पहा. तुमच्या गाडीमध्ये कोणीही प्रतीक्षा करत थांबलेले नाही याची खात्री करून घेण्यासाठी तुमचा ड्रायव्हर पोहोचण्यापूर्वी पदपथावर पोहोचा.
आम्ही तुमच्या मार्गावर असलेल्या इतर रायडर्ससह तुमची कार जुळवू. अशाप्रकारे आम्ही तुम्हाला कमी किमतीची ऑफर देऊ शकतो, म्हणून तुमच्या ट्रिपमध्ये अतिरिक्त पिकअप्स आणि/ किंवा ड्रॉपऑफ्सची अपेक्षा करा.
3. उतरा
तुम्ही तुमच्या पोहोचण्याच्या ठिकाणावर पोहोचता तेव्हा कारमधून फक्त बाहेर पडा. तुमच्या फाइलवर असलेल्या पेमेंट पद्धतीवरून आम्ही आपोआप किंमत चार्ज करू. तुमची ट्रिप 5 तार्यांची असल्यास, तुमच्या ट्रिपनंतर अॅपमध्ये तुमच्या ड्रायव्हरला टिप देण्याचा विचार करा.
Uber किंमतीचा अंदाज लावणारा
नमुना रायडर किंमती केवळ अंदाज आहेत आणि सवलत, भूगोल, रहदारी विलंब किंवा इतर घटकांमुळे होणारे बदल दर्शवित नाहीत. फ्लॅट फेयर आणि किमान शुल्क कदाचित लागू असू शकते. राइड्स आणि शेड्युल केलेल्या राइड्ससाठी वास्तविक किंमती कदाचित बदलू शकतात.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- माझ्या सामानासाठी येथे जागा आहे का?
हे कारमधील रिकामी जागा आणि रायडर्सच्या संख्येवर अवलंबून असते. तुम्ही सामान घेऊन प्रवास करत असल्यास, आम्ही UberX वापरण्याची शिफारस करतो.
- माझ्याकडे 2 पेक्षा जास्त लोक असतील तर?
Uber Pool प्रति विनंती केवळ 1-2 रायडर्सना परवानगी देते परंतु तुम्ही मोठ्या गटांसाठी UberX किंवा इतर पर्याय वापरू शकता.
- इतर रायडर्सना पिकअप करण्यासाठी किती वेळ लागेल?
सरासरी, Uber Pool सह राईड घेतल्याने तुमच्या ट्रिपचा एकूण वेळ फक्त काही मिनिटांनी वाढतो. तुम्ही राईड करत असता तेव्हा तुम्हाला अॅपमध्ये तुमची अंदाजे आगमन वेळ नेहमी दिसून येईल.
- मला प्रथम पिकअप केले. मला नंतर का ड्रॉपऑफ करण्यात आले?
पिकअप आणि ड्रॉपऑफची क्रमवारी ही पहिले कोणाला पिकअप केले यानुसार नाही तर, तुमचे अंतिम ठिकाण मार्गात कुठे येते याप्रमाणे निर्धारित केले जाते.
- माझ्या ट्रिपवर आम्ही किती लोकांना पिकअप करू याची काही मर्यादा आहे का?
रायडर्स तुमच्या ट्रिप दरम्यान बसू शकतात आणि उतरू शकतात. सर्व रिकाम्या सीट्स भरल्या असल्यास, अॅप अतिरिक्त रायडर्स शोधणे थांबवेल. याशिवाय, तुम्ही तुमच्या आगमनाच्या वेळेत पोहचता याची खात्री करण्यासाठी अॅप अतिरिक्त रायडर्स शोधणे थांबवेल.
- माझा सह-रायडर आम्हाला वेगळ्या मार्गाने घेऊन जात असेल तर?
जरी काही पिकअप्स आणि ड्रॉपऑफ्स रस्त्यापासून किंचित वेगळ्या दिशेला असले तरीही, तुम्ही दाखवलेल्या वेळेत पोहोचता याची खात्री करण्यासाठी अॅप नेहमीच प्रयत्न करतो
या वेबपेजवर दिलेली सामग्री केवळ माहितीच्या उद्देशांनी देण्यात आली आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरामध्ये लागू होणार नाही. ती कधीही बदलू शकते आणि कोणतीही सूचना न देता अपडेट केली जाऊ शकते.