किशोर खात्याची उपलब्धता शहरानुसार बदलते. कृपया अधिक जाणून घेण्यासाठी पृष्ठाच्या तळाशी असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न वाचा.
Uber वर किशोर खाती
तुम्हाला मनःशांती, त्यांना स्वातंत्र्य
किशोरवयीन मुलांची खाती जाणून घ्या
किशोर खाती तुमच्या किशोरवयीन मुलाला त्यांच्या स्वतःच्या राईड्सची विनंती तुमच्या देखरेखीखाली करण्याचे स्वातंत्र्य देतात. तसेच, लाइव ्ह सुरक्षा वैशिष्ट्ये आणि रिअल-टाइम अपडेट्समुळे, तुम्ही पिकअपपासून ड्रॉप ऑफपर्यंत राईड फॉलो करू शकता.
आपण सर्व मिळून त्यांना आवश्यक असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करू शकतो.
सहजरीत्या विनंत्या करता येण्याचे स्वातंत्र्य
कधीही राईडची विनंती आता करता येत असल्यामुळे, तुमच्या किशोरवयीन मुलाकडे नेहमीच राईड्स शोधण्याचा, त्यांना जिथे जायचे आहे तिथे जाण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध असेल.
प्रत्येक राईडवर उच्च रेटिंग असलेले ड्रायव्हर्स
तुमच्या किशोरांना नेहमी टॉप-रेटेड आणि अनुभवी ड्रायव्हर्सशी जुळवले जाईल. Uber सह कोणीही गाडी चालवण्यापूर्वी, त्यांची संपूर्ण पार्श्वभूमी तपासणी अनिवार्य असते—आणि दरवर्षी त्यांची पुन्हा तपासणी केली जाते.
लाइव्ह ट्रिप ट्रॅकिंग
जेव्हा तुमचा किशोरवयीन मुलगा राईडची विनंती करतो, तेव्हा तुम्ही थेट अॅपमध्ये त्यांचे लोकेशन फॉलो करू शकता आणि लाईव्ह ट्रिप ट्रॅकिंग तसेच स्थिती अपडेट्स मिळवू शकता. किशोरवयीन ट्रिप्सचे अंतिम ठिकाण लॉक केलेले असते, याचा अर्थ असा की ड्रायव्हर्स ट्रिपचे अंतिम ठिकाण बदलू शकत नाहीत—फक्त तुमचे किशोरवयीनच तसे करू शकतात.
लाइव्ह ट्रिप ट्रॅकिंग
माझे ट्रिप शेअर करा आपोआप चालू झाल्यामुळे, तुमच्या किशोरवयीन मुलाने प्रत्येक वेळी राईडची विनंती केल्यावर तुम्हाला सूचना मिळतील. ते ट्रिपवर आल्यानंतर, तुम्ही थेट ॲपमध्ये लाइव्ह ट्रिप ट्रॅकिंगसह त्यांचे लोकेशन फॉलो करू शकाल. तुम्हाला स्थिती अपडेट्स देखील मिळतील, जेणेकरून तुम्ही तपासू शकता की तुमच्या किशोरवयीन मुलाला जिथे जायचे आहे तिथे ते सुखरूप पोहोचले आहेत. याव्यतिरिक्त, किशोरवयीन ट्रिप्सचे अंतिम ठिकाण लॉक केलेले असते, याचा अर्थ ड्रायव्हर्स ट्रिपचे अंतिम ठिकाण बदलू शकत नाहीत—फक ्त तुमचे किशोरवयीनच तसे करू शकतात.
नेहमी चालू असणारी सुरक्षा वैशिष्ट्ये
पिन पडताळणी आणि RideCheck™ यांसारखी तुम्हाला माहीत असलेली आणि आवडणारी सर्व राइडशेअर सुरक्षा वैशिष्ट्ये नेहमी आपोआप चालू होतील आणि ती बंद केली जाऊ शकत नाहीत. तुमच्या किशोरवयीन मुलाने ते सेट करणे निवडल्यास, ऑडिओ रेकॉर्डिंग वैशिष्ट्य देखील प्रत्येक ट्रिपसाठी आपोआप चालू केले जाईल. याव्यतिर िक्त, त्यांना आमच्या ऑन-ट्रिप सुरक्षा वैशिष्ट्यांचा नेहमीच अॅक्सेस असेल, जसे की 911 वर कॉल करणे, सहाय्याशी संपर्क साधणे किंवा अॅपद्वारे समस्या रिपोर्ट करणे.
नेहमी सक्षम असलेले सुरक्षा वैशिष्ट्य
ही सुरक्षा वैशिष्ट्ये नेहमी सक्षम असतात
माझ्या राईडची पडताळणी करा किशोरवयीन मुलाने कारमध्ये बसण्यापूर्वी, त्यांना त्यांच्या ड्रायव्हरला एक युनिक पिन द्यावा लागेल. जोपर्यंत ड्रायव्हर्स ड्रायव्हर ॲपमध्ये योग्य कोड टाकत नाहीत तोपर्यंत ते ट्रिप सुरू करू शकत नाहीत. यामुळे किशोरवयीन मुलाला, तो योग्य कारमध्ये बसत आहे हे सुनिश्चित करणे सोपे जाते.
RideCheck™
जर राईड फारच वेगळ्या मार्गाने घेण्यात आली, अनपेक्षितपणे थांबवली गेली किंवा लवकर संपविण्यात आली, तर RideCheck™ तुमच्या किशोरवयीन रायडरला सतर्क करेल आणि तुम्हाला मदत हवी आहे का हे जाणून घेण्यासाठी अॅपमध्ये तुम्हाला संदेश पाठवेल.
हे सुरक्षा वैशिष्ट्य, निवडले असल्यास, नेहमी सक्षम असते
ऑडिओ रेकॉर्डिंग रायडर्स आणि/किंवा ड्रायव्हर्स अॅपद्वारे त्यांच्या डिव्हाइसवर ऑडिओ रेकॉर्ड करू शकतात. ट्रिप सुरू होण्यापूर्वी रेकॉर्डिंग सुरू होईल. ह्या वैशिष्ट्यामुळे ट्रिप्स दरम्यान सुरक्षित तसेच सहज संवाद निर्माण करण्यात मदत होते. किशोरवयीन रायडर्स प्रत्येक ट्रिपवर ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी या वैशिष्ट्याची निवड करू शकतात.
जेव्हा रायडर किंवा ड्रायव्हर प्रवासादरम्यान हे वैशिष्ट्य वापरतात, तेव्हा ऑडिओ रेकॉर्डिंग फोनवर स्टोअर आणि एनक्रिप्ट केले जाईल जेणेकरून कोणालाही - रेकॉर्डिंग सुरू करणाऱ्या व्यक्तीलादेखील—त्याचा अॅक्सेस नसेल. वापरकर्त्याने आमच्या सहाय्य कार्यसंघासह घटनेचा अहवाल उघडून ऑडिओ फाइल समाविष्ट केल्यास, Uber ते अॅक्सेस करू शकते. जोपर्यंत असे केले जात नाही तोपर्यंत, Uber कोणत्याही प्रकारचा कंटेंट ॲक्सेस करू शकत नाही.
ऑडिओ रेकॉर्डिंग कसे काम करते ते जाणून घ्या
आपत्कालीन परिस्थितीत, तुम्ही किंवा तुमचा किशोरवयीन मुलगा 911 वर संपर्क साधण्यासाठी ॲपमधील आपत्कालीन बटण वापरू शकता. ट्रिप चालू असताना तुम्हा दोघांना Uber च्या सुरक्षा घटना रिपोर्टिंग लाइनचा अॅक्सेस देखील असेल.
ट्रिपनंतर, तुमचा किशोरवयीन मुलगा त्यांच्या ट्रिप इतिहासामधील ट्रिप निवडून, मदत करा वर टॅप करून, त्यानंतर सुरक्षा समस्या रिपोर्ट करा निवडून किंवा Uber च्या सुरक्षा घटना रिपोर्टिंग लाइनशी संपर्क साधून, अॅपद्वारे सुरक्षिततेच्या घटनेचा अहवाल देऊ शकतो.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- किशोरवयीन मुले ट्रिप्स कुठे घेऊ शकतात?
किशोर खाती लाइव्ह असलेल्या कोणत्याही शहरात सुरू होणाऱ्या आणि समाप्त होणाऱ्या ट्रिप्स, किशोरवयीन मुले घेऊ शकतील.**
- किशोरवयीन मुलांची खाती कुठे उपलब्ध आहेत?
किशोरवयीन मुलांची खाती खालील शहरांमध्ये लाइव्ह आहेत:*
- बंगळुरू
- दिल्ली एनसीआर
- हैदराबाद
- मुंबई
- पुणे
- चेन्नई
- कोलकाता
- अहमदाबाद
- जयपूर
- कोची
- चंदीगड
- लखनऊ
- भुवनेश्वर
- तिरुवनंतपुरम
- विशाखापट्टणम
- म्हैसूर
- गुवाहाटी
- विजयवाडा
- इंदूर
- सुरत
- नागपूर
- वडोदरा
- लुधियाना
- नाशिक
- अगरतला
- तिरुपती
- अमृतसर
- रायपूर
- रांची
- राजमुंद्री
- औरंगाबाद
- जमशेदपूर
- राजकोट
- कोझिकोडे
- नेल्लोर
किशोर खाती लवकरच आणखी ठिकाणी सुरू केली जातील. तुमच्या शहरात अद्याप उपलब्ध नाही? प्रतीक्षा यादीवर साइन अप करा जेणेकरून उपलब्ध झाल्यावर तुम्हाला तसे सूचित केले जाईल.
- किशोरवयीन मुले पेमेंट कसे करतात?
किशोरवयीन मुले त्यांच्या प्रोफाइलवर कोणतीही ऑनबोर्ड पेमेंट पद्धत वापरू शकतात.
- पालक किशोरांसाठी राईड्स बुक करू शकतात का?
होय. पालकांकडे, त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या वतीने, राईड्सची विनंती करण्याचा पर्याय आहे. खात्री बाळगा, प्रत्येक राईडसाठी किशोर खात्यांसाठी आपोआप चालू केलेली सुधारित सुरक्षा वैशिष्ट्ये, त्यांच्या पालकांनी तशी व्यवस्था केलेली देखील, चालू राहतील.
- पालक किशोरवयीन राईड्स आणि डिलिव्हरी ऑर्डर्सवर लक्ष ठेवू शकतात का?
होय. दर वेळेस, त्यांच्या किशोरवयीन मुलाने राईडची विनंती केल्यावर किंवा ऑर्डर दिल्यावर पालकांना एक सूचना पाठविण्यात येईल आणि ते लाइव्ह ट्रिप ट्रॅकिंग वापरून अॅपमधील त्यांच्या किशोरवयीन मुलाची राईड ट्रॅक करण्यासाठी या सुचनेवर क्लिक करू शकतात. पालक त्यांच्या राईड्स ॲक्टिव्हिटी हबमध्ये लाइव्ह ट्रिप ट्रॅकिंग देखील अॅक्सेस करू शकतात
- किशोरवयीन मुले इतर रायडर्स आणू शकतात का?
होय. जेव्हा किशोरवयीन खात्यातून ट्रिपची विनंती येते:
- किशोरवयीन मुलाला त्यांच्यासोबत इतर रायडर्स आणण्याची परवानगी आहे, परंतु त्यांचे वय 13 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
- गेस्ट रायडर्स (वय 13 ते 17) यांनी, त्यांच्याकडे पालक किंवा कायदेशीर संरक्षकाची परवानगी आहे, हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे
- सर्व किशोरांना मागील सीटवर बसून बेल्ट लावणे अनिवार्य आहे
- किशोरवयीन मुले सुरक्षा वैशिष्ट्ये बंद करू शकतात का?
Uber वरील किशोर खात्यांसाठीची सुरक्षा वैशिष्ट्ये, जशी की लाइव्ह ट्रिप ट्रॅकिंग, पिन पडताळणी, RideCheck आणि Uber ची सुरक्षा लाइन, ही प्रवासादरम्यान लागणारी वैशिष्ट्ये आहेत आणि ती बंद केली जाऊ शकत नाहीत. तसेच, किशोरवयीन मुलांसाठी ट्रिप्स दरम्यान RideCheck अधिक चांगल्या प्रकारे कार्यरत केले जाते. संभाव्य अपघात किंवा अनपेक्षित लांब थांबा यासारखे काहीतरी चुकीचे घडल्याचे अॅपमध्ये आढळल्यास, किशोरवयीन मुलाला आणि ड्रायव्हरला ते व्यवस्थित आहेत याची खात्री करण्यासाठी एक संदेश पाठवला जाईल.
ऑडिओ रेकॉर्डिंग हे एकमेव वैशिष्ट्य आहे जे किशोरवयीन मुलांनी सेट करणे गरजेचे आहे. तुमच्या किशोरवयीन मुलाने ऑडिओ रेकॉर्डिंग वैशिष्ट्य निवडल्यास, त्यांच्या सगळ्या ट्रिप्स आपोआप रेकॉर्ड केल्या जातील (त्यांनी नंतर ॲपसाठी मायक्रोफोन परवानगी काढून टाकण्याची निवड रद्द करेपर्यंत).
ड्रायव्हर्स तरीदेखील ट्रिप ऑडिओ रेकॉर्ड करणे निवडू शकतात. त्यांनी तसे केल्यास, तीच गोपनीयता मानके लागू होतील. ड्रायव्हरने ऑडिओ रेकॉर्डिंग सेट केले असल्यास, अॅप तुमच्या किशोरवयीन मुलाला पिकअप करण्यासाठी त्यांचा ड्रायव्हर वाटेत असताना सूचित करेल. त्यांना हवे असल्यास, तुमचा किशोरवयीन मुलगा राईड रद्द करू शकतो आणि वेगळ्या राईडची विनंती करू शकतो.
- मी माझ्या किशोरवयीन मुलाच्या ड्रायव्हरशी कसा संपर्क साधू शकतो?
किशोरवयीन मुलाने किशोर खात्याद्वारे विनंती केलेल्या राईडवर असताना, Uber ॲपच्या अॅक्टिव्हिटी विभागात जाऊन किंवा ट्रिपबद्दल पुश सूचना निवडून, त्यानंतर ड्रायव्हरच्या नावापुढील फोन चिन्ह निवडून पालक त्यांच्या किशोरवयीन मुलाच्या ड्रायव्हरशी थेट संपर्क साधू शकतात.
ड्रायव्हरला कॉल करण्यासाठी लाईव्ह ट्रिप ट्रॅकिंग पृष्ठावरील फोन चिन्हावर जा. हे वैशिष्ट्य सध्या किशोरवयीन खात्यांसाठीच्या Uber Eats ऑर्डर्ससाठी उपलब्ध नाही.
- माझा किशोरवयीन मुलगा 18 वर्षांचा झाल्यावर त्याच्या खात्याचे काय होईल?
किशोरवयीन मूल 18 वर्षांचे झाल्यावर, त्याचे किशोर खाते स्टँडर्ड खात्यात रूपांतरित केले जाईल, म्हणजेच त्याला अॅपम धील आणखीन काही उत्पादनांचा ॲक्सेस दिला जाईल.
तथापि, त्यांचे खाते रूपांतरित झाल्यानंतरही, ते तुमच्या कुटुंब प्रोफाइलवर कायम राहतील. आणि जोपर्यंत ते कुटुंब खात्याचा भाग आहेत, तोपर्यंत तुम्ही अॅपमध्ये त्यांची राईड फॉलो करू शकाल.
- किशोरवयीन खाते सेट करण्यासाठी मला मदत कोठून मिळेल?
कृपया तुमचे ॲप अप टू डेट असल्याची खात्री करा. तु म्हाला किशोर खाते सेट करण्यात अजूनही समस्या येत असल्यास आणि/किंवा तुम्हाला तुमच्या फॅमिली प्रोफाइल सेटिंग्जमध्ये “किशोर जोडा” हा पर्याय दिसत नसल्यास कृपया येथे आमच्या सहाय्य टीमशी संपर्क साधा.
Uber सह किशोरवयीन खाते तयार करून, तुम्ही साक्षांकित करता की, तुमच्या किशोरवयीन मुलाचे पालक म्हणून, तुम्हाला तुमच्या मुलाच्या वतीने कार्य करण्याचा कायदेशीर अधिकार आहे, तुमचे मूल 13 ते 17 या वयोगटातील आहे आणि तुम्ही इतर कोणत्याही पालकांशी किंवा तुमच्या किशोरवयीन मुलाचा कायदेशीर पालकांच्या या संबंधित संपर्कात आहात. किशोरांसाठी Uber चा वापर या विशिष्ट वापर अटीनियमांनुसार नियंत्रित केला जातो.
तुम्हाला तुमच्या किशोरवयीन मुलाच्या वतीने आपत्कालीन कॉल करण्याची आवश्यकता असल्यास, तुम्ही ज्या डिस्पॅचरशी कनेक्टेड आहात त्याला तुमचे लोकेशन दिसेल, तुमच्या किशोरवयीन मुलाचे नाही.
**किशोर खाती सामान्यतः प्रत्येक शहरासाठी व्यापक महानगर क्षेत्रात ट्रिप्ससाठी पात्र असतील. कृपया तुमचा किशोरवयीन मुलगा त्याची नियोजित ट्रिप घेऊ शकेल का याची पुष्टी करण्यासाठी अॅप तपासा.
आमच्या प्लॅटफॉर्मवर किशोरवयीन मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात मदत करण्यासाठी Uber कसे वचनबद्ध आहे याबद्दल येथे अधिक पहा.
माझ्या राईडची पडताळणी करा
किशोरवयीन मुलाने कारमध्ये बसण्यापूर्वी, त्यांना त्यांच्या ड्रायव्हरला एक युनिक पिन द्यावा लागेल. जोपर्यंत ड्रायव्हर्स ड्रायव्हर ॲपमध्ये योग्य कोड टाकत नाहीत तोपर्यंत ते ट्रिप सुरू करू शकत नाहीत. यामुळे किशोरवयीन मुलाला, तो योग्य कारमध्ये बसत आहे हे सुनिश्चित करणे सोपे जाते.
RideCheck™
जर राईड फारच वेगळ्या मार्गाने घेण्यात आली, अनपेक्षितपणे थांबवली गेली किंवा लवकर संपविण्यात आली, तर RideCheck™ तुमच्या किशोरवयीन रायडरला सतर्क करेल आणि तुम्हाला मदत हवी आहे का हे जाणून घेण्यासाठी अॅपमध्ये तुम्हाला संदेश पाठवेल.
ऑडिओ रेकॉर्डिंग
रायडर्स आणि/किंवा ड्रायव्हर्स अॅपद्वारे त्यांच्या डिव्हाइसवर ऑडिओ रेकॉर्ड करू शकतात. ट्रिप सुरू होण्यापूर्वी रेकॉर्डिंग सुरू होईल. ह्या वैशिष्ट्यामुळे ट्रिप्स दरम्यान सुरक्षित तसेच सहज संवाद निर्माण करण्यात मदत होते. किशोरवयीन रायडर्स प्रत्येक ट्रिपवर ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी या वैशिष्ट्याची निवड करू शकतात.