Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा
कोरोनाव्हायरस (कोविड -19) संसाधने आणि अपडेट्स

The health and safety of the Uber community is always our priority. We are actively monitoring the coronavirus (COVID‑19) situation and are taking steps to help keep those that rely on our platform safe. Click here for more information.

X small

Uber Plus सादर करत आहोत

Uber Plus हा रिवॉर्ड्स प्रोग्राम असून त्याद्वारे उत्तम कामगिरी करणारे ड्रायव्हर्स शोधून काढले जातात, तसेच त्याची तुम्हाला वाहन चालवताना किंवा चालवत नसताना—तुमचे ध्येय गाठण्यात मदत होते.

ते कसे काम करते

पॉइंट्‍स मिळवा

पॉइंट्स जमा करण्यासाठी Uber सोबत गाडी चालवा. काही ट्रिप्ससाठी तुम्हाला इतर ट्रिप्सपेक्षा जास्त कमाई होऊ शकते. ड्रायव्हर ॲपमध्ये आणखी तपशील पहा.

रायडर्सना दर्जेदार सेवा द्या

पॉइंट्स मिळवण्याव्यतिरिक्त, तुम्हाला गोल्ड, प्लॅटिनम आणि डायमंड रिवॉर्ड्स कमावण्यासाठी काही रेटिंग्ज कायम राखावे लागतील. यासाठीच्या आवश्यकता प्रदेशानुसार बदलतात. अधिक माहितीसाठी कृपया ड्रायव्हर ॲप तपासा.

रिवॉर्ड्स मिळवा

तुम्ही जितका वरचा स्तर गाठाल, तितके जास्त रिवॉर्ड्स तुमच्यासाठी खुले होतात. तुमचा स्तर 3-महिन्यांच्या निश्चित कालावधीतील तुमचे पॉइंट्स आणि दर्जाबाबतचे रेटिंग्ज याच्या आधारे निश्चित केला जातो.

झटपट रिवॉर्ड्स मिळवा

दिवसाच्या निवडक तासांमध्ये पूर्ण केलेल्या ट्रिप्ससाठी जास्त पॉइंट्स मिळतात. तुम्ही केव्हा झटपट पॉइंट्स कमावू शकता हे पाहण्यासाठी ड्रायव्हर ॲप तपासा.

रायडर्सना दिलेल्या दर्जेदार सेवेमुळे जास्त रिवॉर्ड्स खुले होतात

तुम्ही Uber ॲप कसे वापरता याच्या आधारे रिवॉर्ड्स दिले जातात. गोल्ड, प्लॅटिनम आणि डायमंड स्तर खुला करण्यासाठी आणि रिवॉर्ड्स मिळणे पुढे सुरू ठेवण्यासाठी, तुम्हाला पॉइंट्स कमवावे आणि काही रेटिंग्ज कायम राखावे लागतात. अधिक माहिती मिळवण्यासाठी, ड्राइवर ॲपमधील मेनू चिन्हावर टॅप करा, त्यानंतर Uber Plus वर व त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर सर्वात वर असलेल्या उजव्या बाणावर टॅप करा.

3-महिन्याच्या निश्चित कालावधींच्या दरम्यान पॉइंट्स मिळवा आणि रिवॉर्ड्सचा लाभ घ्या.

तुम्ही 3 महिन्याच्या निश्चित कालावधी दरम्यान पॉइंट्स मिळवता. प्रत्येक कालावधीनंतर पॉइंट्स रीसेट होतात.

तुम्ही रिवॉर्ड्सचा पुढचा स्तर खुला करण्यासाठी पुरेसे पॉइंट मिळवल्यावर, लगेचच तुम्हाला नवीन रिवॉर्ड्सचा आनंद मिळण्यास सुरुवात होते. पुढील 3 महिन्याचा कालावधी समाप्त होईपर्यंत रिवॉर्ड्सचा आनंद घेणे पुढे सुरू ठेवण्यासाठी तुमचे रेटिंग सर्वाधिक ठेवा आणि रद्द करण्याचा रेट कमी ठेवा.

प्रोग्राम रिवॉर्ड्स स्थानानुसार आणि Uber Plus स्तरानुसार बदलतात आणि ते बदलाच्या अधीन असतात. या पृष्ठावर वर्णन केलेले रिवॉर्ड्स Uber Plus उपलब्ध असलेल्या सर्व शहरांमध्ये कदाचित उपलब्ध नसतील. अधिक मर्यादा आणि अपवाद लागू होतात. संपूर्ण तपशिलांसाठी नियम आणि अटी पहा.