पायरी 1: तुमच्या कंपनी खात्याशी कनेक्ट करा
Central चा ॲक्सेस मिळवण्यासाठी तुमच्या कंपनीच्या Uber for Business खात्यात सामील होण्यासाठी खालील पायऱ्यांचे पालन करा.
1. तुमचे आमंत्रण स्वीकारा
तुम्हाला कंपनीच्या खात्यात जोडल्यावर, तुम्हाला Uber for Business कडून तुमच्या ऑफिसच्या ईमेल पत्त्यावर सामील होण्यासाठी आमंत्रण देणारा संदेश प्राप्त होईल. तुमचे खाते सेट करण्यासाठी ईमेलमधील सूचनांचे पालन करा, जेणेकरून तुम्ही इतरांसाठी राईड्सची व्यवस्था करू शकता.
2. साइन इन करा किंवा साइन अप करा
तुमच्याकडे आधीच Uber खाते असल्यास, तुमची सध्याची लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून साइन इन करा. तुमच्याकडे एक Uber खाते असेल परंतु वैयक्तिक आणि बिझनेस प्रोफाइल्स वेगळे असतील. एकापेक्षा अधिक खाती तयार केल्याने बिझनेस प्रोफाइल आणि तुमचे वैयक्तिक खाते यांच्यामध्ये स्विच करण्यात समस्या उद्भवू शकतात. काळजी करू नका, एका प्रोफाइलची माहिती दुसऱ्या प्रोफाइलशी कधीही शेअर केली जात नाही.
तुमच्याकडे Uber खाते नसल्यास, तुम्ही ते खाली किंवा तुम्हाला तुमचे ईमेल आमंत्रण प्राप्त झाल्यावर तयार करू शकता.
3. ॲक्सेसची पुष्टी करा
तुम्ही Central डॅशबोर्ड ॲक्सेस करू शकता याची पुष्टी करण्यासाठी central.uber.com वर साइन इन करा. तुम्हाला तुमची वैयक्तिक Uber लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून साइन इन करावे लागेल. तुमची वैयक्तिक खाते माहिती नेहमी Uber for Business खात्यापासून वेगळी ठेवली जाईल.
आढावा
आमच्याबद्दल
उत्पादने
सोल्यूशन्स
वापराच्या प्रकरणानुसार
उद्योगानुसार
ग्राहक सहाय्य
सहाय्य
संसाधने
जाणून घ्या