Please enable Javascript
Skip to main content

पद्धत: आम्ही कार्बन-उत्सर्जन बचतीचा अंदाज कसा लावतो

Uber मध्ये, आम्ही शून्य-प्रदूषण प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आमच्या प्रगतीबद्दल पारदर्शक राहण्याचे आमचे ध्येय आहे. यामध्ये आमची गणना अधोरेखित करणार्‍या पद्धतीबद्दल पारदर्शक असणे समाविष्ट आहे. त्यासाठी, हे डॉक्युमेंट आम्ही प्रति-ट्रिप उत्सर्जनाचा अंदाज कसा लावतो आणि विशिष्ट राईड पर्यायांमधून वाचवलेले कार्बन-उत्सर्जन याचा सारांश देते.

उत्सर्जनाची व्याप्ती

पूर्ण केलेल्या ट्रिप्सवर रायडर पिकअपपासून ड्रॉप ऑफपर्यंत टेलपाइप CO₂ उत्सर्जनाचा आम्ही अंदाज लावतो. ड्रायव्हर्सच्या ट्रिपवर नसतानाच्या मायलेजवर रायडर्सचे किमान नियंत्रण असल्यामुळे, आम्ही ट्रिपवरील अंतरांवर लक्ष केंद्रित करतो. आम्ही टेलपाइप नसलेले उत्सर्जन वगळतो, जसे की पेट्रोल पम्प्सपर्यंत पेट्रोलची वाहतूक करणारे वाहन, कारण त्या उत्सर्जनावर Uber चा प्रभाव अधिक मर्यादित आहे. वाहतूक क्षेत्रात, जीवाश्म-इंधन-दहन-संबंधित ग्रीनहाऊस गॅसेसपैकी 99% गॅसेस CO₂ बनवतात, त्यामुळे, सहजतेसाठी, आम्ही आमच्या गणनेमध्ये नॉन-CO₂ GHG वगळतो.

प्रति ट्रिप प्रदूषण

आम्ही (1) राईड पर्यायानूसार सरासरी वाहनासाठी प्रति मैल सरासरी कार्बन-उत्सर्जन (उदा. Uber Green), आणि (2) प्रवास केलेले अंतर यावर आधारित प्रति ट्रिप कार्बन-उत्सर्जनाचा अंदाज लावतो.

हा दृष्टिकोन ठेवल्यामुळे आम्ही विपरीत परिस्थितीचा योग्य तो अंदाज लावू शकतो.

Uber चा हवामान मूल्यांकन आणि कामगिरी रिपोर्ट (CAsPR) या पद्धतीचा वापर करून प्रति मैल सरासरी उत्सर्जनाचा शक्य तितका अंदाज लावला जातो. उदाहरणार्थ, जेव्हा आमच्याकडे एक वाहन ओळख क्रमांक (VIN) उपलब्ध असतो, तेव्हा आम्ही प्रदूषणाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याचा वापर करतो. जेव्हा CAsPR पद्धत, नेहमीची वाहने आणि कमी प्रदूषण करणारी वाहने (प्रामुख्याने यूएस/कॅनडा/युरोपच्या बाहेर) यांच्यातील फरक ओळखण्यासाठी पुरेशी नसते, तेव्हा आम्ही वाहनांच्या इंधन आणि इंजिन प्रकाराचा अंदाज लावण्यासाठी वाहन ट्रिप रेकॉर्ड वापरतो. उदाहरणार्थ, किमान 10 Comfort इलेक्ट्रिक ट्रिप्स पूर्ण केलेले वाहन हे इलेक्ट्रिक वाहन असल्याचे गृहित धरले जाते, तर किमान 10 Uber Green ट्रिप्स पूर्ण केलेले वाहन हे हायब्रीड असल्याचे गृहित धरले जाते. इंजिनचा प्रकार बॅटरी इलेक्ट्रिक किंवा फ्युएल सेल असल्यास, त्यातून प्रदूषण होणार नाही असे गृहीत धरले जाते. नियमित अंतर्गत ज्वलन वाहनांच्या तुलनेत हायब्रीड वाहनांमुळे प्रदूषणामध्ये 33% कपात होईल असे आम्ही समजतो. लक्षात असू द्या की जेव्हा आम्ही प्रदूषणाचा अंदाज लावतो तेव्हा आम्ही फ्लीट मिक्स सारख्या इतर घटकांचा विचार करतो, ज्यामुळे Uber Green आणि UberX या दोन्हींमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांचा समावेश आहे हे आम्हाला अधिक अचूकपणे आत्मसात करता येते.

प्रवास केलेल्या निरीक्षित अंतराचा अंदाज जीपीएस पॉइंट्सच्या आधारे लावला जातो. जीपीएस डेटा संबंधित त्रुटी कमी करण्यासाठी आम्ही नकाशा जुळणी पद्धत वापरतो.

बचतीचा अंदाज लावणे

कार्बन उत्सर्जन "बचत" म्हणजे रायडरने कमी-प्रदूषण राईड पर्यायाची थेट विनंती करून टाळलेले प्रदूषण. कार्बन उत्सर्जन बचतीची गणना Uber अ‍ॅपवरील कमी-प्रदूषण राईड पर्यायांमधून आणि त्यांच्या मानक-उत्सर्जन समकक्षांमधून उत्सर्जित होणाऱ्या CO₂ मधील फरक म्हणून केली जाते. तर, उदाहरणार्थ, Uber Green, UberX Share (ज्याला पूल म्हणूनही ओळखले जाते), आणि मायक्रोमोबिलिटी ट्रिप्समधून होणाऱ्या प्रदूषणाची तुलना UberX ट्रिप्समधून होणाऱ्या प्रदूषणाशी केली जाते आणि Uber Comfort इलेक्ट्रिक ट्रिप्समधून होणाऱ्या प्रदूषणाची तुलना Uber Comfort मधून होणाऱ्या प्रदूषणाशी केली जाते. जेव्हा UberX किंवा Comfort बाजारात उपलब्ध नसते, तेव्हा आम्ही भाड्याची श्रेणी आणि लोकप्रियतेच्या आधारे सर्वात तुलनात्मक उत्पादन निवडतो. UberX Share (ज्याला पूल म्हणूनही ओळखले जाते) साठी, आम्ही फक्त इतर रायडर्सशी जुळलेल्या ट्रिप्स मोजतो आणि वैयक्तिक थेट राईड्सशी जुळलेल्या राईड्सची तुलना करून आम्ही उत्सर्जन बचतीचा अंदाज लावतो. जुळलेल्या राईडच्या शेअर केलेल्या भागादरम्यान प्रवास केलेले अंतर रायडर ग्रुपच्या संख्येमध्ये विभाजित केले जाते. सर्व राईड पर्यायांसाठी, आम्ही 1 किमीपेक्षा लहान ट्रिप्समध्ये उत्सर्जन बचत मोजत नाही.

अधिक तपशील

राईड पर्यायाची सरासरी उत्सर्जन तीव्रता (gCO2 प्रति मैल किंवा किलोमीटर) कालांतराने आणि शहरानुसार बदलते, आम्ही प्रत्येक शहरातील प्रत्येक राईड पर्यायासाठी ही गणना करतो आणि दर महिन्याला अपडेट करतो. जेव्हा एखाद्या विशिष्ट शहरात सरासरी उत्सर्जन कार्यक्षमतेची गणना करण्यासाठी पुरेशा ट्रिप्स नसतात, तेव्हा आम्ही त्या राईड पर्यायासाठी देशाच्या स्तरावरील सरासरी उत्सर्जन कार्यक्षमता वापरतो.

उत्सर्जन बचतीची गणना रायडरने 2021 च्या सुरुवातीपासून घेतलेल्या ट्रिप्सवर आधारित आहे, याला फक्त Lime चा अपवाद आहे ज्याची गणना जुलै 2022 पासून सुरू होते. रायडर जानेवारी 2021 नंतर युजर बनला असल्यास, आम्ही तो युजर झाल्यापासून त्यानी घेतलेल्या ट्रिप्सच्या आधारे बचतींचा अंदाज लावतो.

क्वचित प्रसंगी, उत्सर्जन बचत नकारात्मक असू शकते (उदा. UberX Share (ज्याला पूल असेही म्हणतात) वळसा अपेक्षेपेक्षा लांब असतो); नकारात्मक उत्सर्जन बचत एकूण हिशोबात समाविष्ट केलेली नाही.

समतुल्यता मोजणे

समतुल्यता खालीलप्रमाणे मोजली जातात: