Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

दारा खोसरोशाही

मुख्य कार्यकारी अधिकारी

दारा खोस्रोवशाही हे Uber चे सीईओ असून त्यांनी 2017 पासून जगातील 70 हून अधिक देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय सांभाळला आहे.

दारा पूर्वी एक्स्पीडियाचे सीईओ होते, जिचे त्यांनी जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांपैकी एकीमध्ये रूपांतर केले. इंजिनिअरिंग आणि फायनान्स या दोन्हींची पार्श्वभूमी असलेल्या एक अनुभवी कार्यकारी दारा यांनी त्यांच्या देखरेखीखाली अनेक अधिग्रहणे केली ज्यामुळे एक्सपीडियाच्या सेवांना चालना मिळाली आणि त्यांनी मोबाइलमध्ये आक्रमकपणे गुंतवणूक केली, जो आता एक्सपीडियाच्या निम्म्याहून अधिक ट्रॅफिकचा हिस्सा आहे. एक्सपीडियाच्या कर्मचार्‍यांचेही ते आवडते होते आणि ते ग्लासडोअरवरील सर्वोच्च रेटिंग असलेल्या सीईओंपैकी एक आहेत. एक्सपीडियाचे सीईओ म्हणून पदोन्नती मिळण्यापूर्वी दारा यांनी आयएसीचा एक विभाग असलेल्या आयएसी ट्रॅव्हलचे चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून काम केले. आयएसीने 2002 मध्ये एक्सपीडिया विकत घेतली आणि 2005 मध्ये तिला स्वतंत्र कंपनी बनवले. आयएसीच्या ट्रॅव्हल ब्रँड्सच्या पोर्टफोलिओच्या विस्तारातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

आयएसीमध्ये सामील होण्यापूर्वी दारा यांनी ॲलन अँड कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आणि अनेक वर्षे विश्लेषक म्हणून काम केले. ते सध्या एक्सपीडिया आणि Catalyst.org च्या संचालक मंडळावर आहेत आणि यापूर्वी ते न्यूयॉर्क टाइम्स कंपनीच्या संचालक मंडळावर होते. ते जगभरात संकटात सापडलेल्या शरणार्थींचे एक खंदे समर्थक आहेत कारण त्यांनी वयाच्या 9 व्या वर्षी इराणच्या क्रांतीदरम्यान इराण सोडला होता.

दारा न्यूयॉर्कच्या टॅरीटाउन येथे लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंगची बॅचलर डिग्री मिळवली.