Uber रिवॉर्ड्स सादर करत आहोत
Uber रिवॉर्ड्स तुम्हाला रिवॉर्ड्स आणि लाभ मिळवण्याकरिता पॉइंट्स मिळवून देतात, त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर जितके जास्त राईड कराल तितके जास्त पॉइंंट्स कमवाल. तुमच्या प्रदेशात Uber रिवॉर्ड्स ऑफर केले जातात किंवा नाही हे शोधण्यासाठी, तुमच्या ऍपमध्ये एखादे आमंत्रण आहे का ते पहा. ते दिसत नसल्यास, तुम्हाला ते लवकरच मिळेल. आम्ही सर्वत्र Uber रिवॉर्ड्सचा विस्तार करत असताना तुम्ही दाखवलेल्या संयमाबद्दल धन्यवाद.
राइड्स आणि Uber Eats वर पॉइंट्स कमवा
तुम्ही राइड्स आणि Uber Eats वर खर्च केलेल्या प्रत्येक पात्र डॉलर साठी एक पॉइंट कमवा आणि प्रत्येक 500 पॉइंट्सवर रिवॉर्ड्स मिळवा. तसेच, UberX वर 2x पॉइंट्स आणि Uber Black ट्रिपसाठी 3x पॉइंट्स मिळवा.¹
प्रत्येक स्तरावर लाभ अनलॉक करा
तुम्ही आत्ताच सुरुवात केली असली किंवा तुम्ही सर्वत्र Uber ट्रिप्स घेत असलात तरीही तुम्ही प्रत्येक सदस्यता स्तरावर पॉइंट्स आणि लाभ मिळवू शकता.²
Uber रिवॉर्ड्स द्वारे कसे कमवायचे ते जाणून घ्या
तुम्ही Uber Eats आणि Pool ट्रिप्सवर खर्च केलेल्या प्रत्येक पात्र डॉलरसाठी 1 पॉइंट कमवा.
तुम्ही UberX, UberXL किंवा Select वर खर्च केलेल्या प्रत्येक पात्र डॉलरसाठी 2 पॉइंट्स कमवा.
तुम्ही Uber Black आणि Uber Black एसयूव्ही ट्रिप्सवर खर्च केलेल्या प्रत्येक पात्र डॉलरसाठी 3 पॉइंट्स कमवा.
नेहमीचे प्रश्न
- मी कोणकोणते लाभ मिळवू शकतो/शकते?
तुम्हाला मिळू शकणारे सर्व लाभ तुमच्या सदस्यता स्तरावर आधारित आहेत. प्रत्येक स्तरावर कोणते लाभ मिळतात हे समजून घेण्यासाठी तुम्ही वर दिलेले तुलना चार्ट पाहू शकता. तपशिलांसाठी लाभ अटी पहा.
- Uber Cash काय आहे?
Down Small Uber ट्रिप्स आणि Uber Eats साठी पैसे चुकते करण्याचा नवीन, स्मार्ट मार्ग म्हणजे Uber Cash होय, कारण यामुळे तुम्ही भरपूर बचत करू शकता. तुमच्या Uber रिवॉर्ड्स सदस्यत्वामुळे, तुम्ही 500 पॉइंट्स कमावता तेव्हा तुम्ही $5 Uber Cash साठी रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करू शकता. आणि तुम्ही तुमच्या शिलकीमध्ये जोडलेल्या पैशांवर 5% सूट मिळवू शकता. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कमी पैसे द्या आणि अधिक फायदा मिळवा. तपशिलांसाठी लाभ अटी पहा.
- Uber रिवॉर्ड्ससाठीच्या प्रतीक्षा यादीत साइन अप करण्यास किंवा त्यामधून बाहेर पडण्यास मी पात्र असल्याचे मला कसे कळेल?
Down Small तुमच्या भागात Uber रिवॉर्ड्स उपलब्ध होतील, तेव्हा तु्म्हाला ' तुमच्या Uber ऍपमध्ये साइन अप करण्यासाठी स्क्रीन पॉप अप झालेला दिसेल आणि/किंवा तुम्हाला' आमच्या प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी विचारणा करणारे एक ईमेल आमंत्रण मिळेल.
- मी बाईक राइड्सवर पॉइंट्स कमावू शकतो/शकते का?
Down Small आत्ता सध्या, बाईक राइड्सवर किंवा स्कूटर राइड्सवर पॉइंट्स कमावता येऊ शकत नाहीत. परंतु आम्ही लवकरच त्याचा Uber रिवॉर्ड्स प्रोग्राममध्ये समावेश करण्याचा विचार करीत आहोत.
¹UberTaxi, बाइक्स आणि स्कूटर्स वगळून. इतर निर्बंध लागू. तपशिलांसाठी लाभ अटी पहा.
²सदस्यता स्तर ब्लू (पात्र होण्यासाठी 0 पॉइंट), गोल्ड (पात्र होण्यासाठी 500 पॉइंट्स), प्लॅटिनम (पात्र होण्यासाठी 2,500 पॉइंट्स) आणि डायमंड (पात्र होण्यासाठी 7,500 पॉइंट्स) हे आहेत. तपशिलांसाठी प्रोग्राम अटी पहा.
याच्या विषयी