Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

अभिमानाने पुढे जा.

प्राइड महिन्यादरम्यान—आणि कुठल्याही महिन्यात—आमचा विश्वास आहे की प्रत्येकाला मुक्तपणे, सुरक्षितपणे आणि न घाबरता फिरण्याचा अधिकार आहे.

आमच्या समुदायाला मोकळेपणाने आणि प्रामाणिक जीवन जगण्यासाठी, त्यांना वाटेल त्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी आणि त्यांना सत्य बोलण्यासाठी सक्षम वाटण्यास मदत करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.

आम्ही सध्या काम करत असलेले काही उपक्रम येथे आहेत:

  • Uber च्या मदत केंद्रामध्ये रायडर्स आणि ड्रायव्हर्स ना घटना रिपोर्ट करणे सोपे करण्यासाठी स्वतंत्र भेदभाव अहवाल देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही हा Uber ॲपमध्ये आणि help.uber.com वर पाहू शकता.
  • आमची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे भेदभावाला स्पष्टपणे प्रतिबंधित करतात आणि सर्वांना हा अनुभव सुरक्षित, आदरपूर्ण आणि सकारात्मक वाटावा यासाठी Uber ॲप वापरणाऱ्या प्रत्येकाचा वाटा ह्यास हातभार लावतो. आमचा प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या प्रत्येकाला आमची अ‍ॅप्स वापरताना काय अपेक्षित आहे हे समजेल आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होईल याची आम्ही खात्री करत राहू.
  • ट्रान्सजेंडर ड्रायव्हर्स आणि कुरियर्सना कसे सहाय्य करावे यावर लक्ष केंद्रित करून सर्व ग्राहक सहाय्य एजंट्सना पक्षपात आणि भेदभावाचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. यामुळे संभाव्य भेदभावाच्या घटना हाताळण्याच्या आमच्या प्रक्रिया सुधारतात.
  • आम्ही जगभरातील सुमारे 20 स्वयंसेवी संस्थांना मोफत राईड्स आणि जेवण देण्याच्या आमच्या चालू असलेल्या वचनबद्धतेला कायम ठेवले आहे, ज्यात अल्बर्ट केनेडी ट्रस्ट, न्यूयॉर्क शहर हिंसाविरोधी प्रकल्प, आणि सॅन फ्रान्सिस्को एड्स फाउंडेशन यांचा समावेश आहे.
  • आमचा प्लॅटफॉर्म वापरणार्‍यांना अधिक चांगल्या प्रकारे सहाय्य करण्यासाठी आम्ही समुदाय सदस्यांचे ऐकतो, त्यांच्याकडून शिकतो आणि त्यांच्याशी संपर्कात असतो—आणि यापुढेही करत राहू.

सर्वसमावेशकपणे बोला

प्रत्येकासाठी - अधिक सकारात्मक संवादांना सक्षम करण्यात मदत करण्यासाठी आम्ही काही टिप्स एकत्रित केल्या आहेत.

सर्व रंग अभिमानास्पद असतात

एलजीबीटीक्यूआयए+ समुदायामधील वैविध्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भिन्न समुदाय, ध्वज, लैंगिक प्रवृत्ती आणि लैंगिक ओळख दर्शविणाऱ्या प्रतिकांकडे लक्ष वेधून घेण्यात आम्ही मदत करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. *

  • जेंडरक्वीयर

    जेंडरक्वीयर लोक सामान्यत: लिंगाच्या प्रचलित प्रवर्गातील धारणा नाकारतात आणि लैंगिक व्यक्तित्व तसेच, नेहमी नसले तरी बऱ्याचदा, लैंगिक ओळख यातील अस्थिरता स्वीकारतात. जेंडरक्वीयर म्हणून ओळखले जाणारे लोक स्वतःला स्त्री किंवा पुरुष असे दोन्ही समजू शकतात, किंवा स्त्री आणि पुरुष ही दोन्ही व्यक्तित्वे नाकारू शकतात किंवा स्वतःला या श्रेणींच्या संपूर्णपणे बाहेर असल्याचे मानू शकतात.

  • नॉन-बायनरी

    पुरुष किंवा स्त्री अशी केवळ ओळख नसणाऱ्या व्यक्तीचे वर्णन करणारे एक विशेषण. नॉन-बायनरी म्हणून संबोधले जाणारे लोक स्वतःची ओळख स्त्री किंवा पुरुष अशी दोन्ही देऊ शकतात, ते या दोन्हींच्या मधली व्यक्तित्वे असू शकतात, किंवा या श्रेणींच्या संपूर्णपणे बाहेर असू शकतात. बरेच जण स्वतःची ओळख ट्रान्सजेंडर म्हणून देखील करू पाहतात, मात्र काही नॉन-बायनरी लोक याला अपवाद असतात.

  • ट्रान्सजेंडर

    अशा लोकांसाठी एक व्यापक संज्ञा ज्यांची लैंगिक ओळख आणि/किंवा अभिव्यक्ती या त्यांना जन्मजात नियुक्त केलेल्या त्यांच्या लिंगाच्या आधारावर असणाऱ्या सांस्कृतिक अपेक्षांपेक्षा वेगळी आहे. ट्रान्सजेंडर असणे ह्याचा अर्थ कोणत्याही विशिष्ट लैंगिक प्रवृत्तीचे असणे असा होत नाही. म्हणूनच, ट्रान्सजेंडर लोकांना स्ट्रेट, गे, लेस्बियन, उभयलिंगी इ. म्हणून ओळखले जाऊ शकते.

  • पॅनसेक्शुअल

    अशा व्यक्तीचे वर्णन करते जी भावनिक दृष्ट्या, प्रणयभावनेने किंवा लैंगिक दृष्ट्या, एकाच वेळेला, एकाच पद्धतीने किंवा समान प्रमाणात नसली तरी, कुठल्याही लिंगाच्या लोकांकडे आकर्षित होण्याची क्षमता बाळगते.

  • क्वीयर

    अस्थिर लैंगिक ओळखी आणि प्रवृत्त्या व्यक्त करण्यासाठी बऱ्याचदा वापरली जाणारी संज्ञा. ही संज्ञा बऱ्याचदा "LGBTQ."

    याऐवजी वापरली जाते.
  • पॉलीसेक्शुअल

    पॉलीसेक्शुअल व्यक्ती लैंगिक आणि/किंवा प्रणयभावनेने, सर्व लिंगांकडे नाही तरी, एकाधिक लिंगांकडे आकर्षित होते.

  • गे

    अशी व्यक्ती जी भावनिक दृष्ट्या, प्रणयभावनेने किंवा लैंगिक दृष्ट्या समान लिंगाच्या व्यक्तींकडे आकर्षित होते.

  • अजेंडर

    सामान्यत: लिंग नसलेले आणि/किंवा स्वत:चे लिंग तटस्थ आहे असे मानणाऱ्या विविध लिंगांच्या लोकांसाठी वापरली जाणारी एक व्यापक संज्ञा.

  • लेस्बियन

    अशी स्त्री जी भावनिक दृष्ट्या, प्रणयभावनेने किंवा लैंगिक दृष्ट्या इतर स्त्रियांकडे आकर्षित होते.

  • असेक्शुअल

    इतर लोकांप्रति लैंगिक आकर्षण किंवा वासना नसणे.

  • उभयलिंगी

    अशी व्यक्ती जी भावनिक दृष्ट्या, प्रणयभावनेने किंवा लैंगिक दृष्ट्या, एकाच वेळेला, एकाच पद्धतीने किंवा समान प्रमाणात नसली तरी, एकापेक्षा जास्त सेक्स, लिंग किंवा लैंगिक ओळखीकडे आकर्षित होते.

  • इंटरसेक्स

    नैसर्गिक शारीरिक भिन्नतांच्या विस्तृत प्रकारांचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी एक व्यापक संज्ञा. काही लोकांमध्ये, ही लक्षणे जन्मजात दिसू लागतात आणि इतरांमध्ये, तारुण्य येईपर्यंत ती दिसून येत नाहीत. या प्रकारच्या काही गुणसूत्र भिन्नता शारीरिकदृष्ट्या स्पष्टपणे दिसतीलच असे नाही.

  • निश्चित लैंगिक ओळख न मानणारी व्यक्ती

    ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार, ही अशी व्यक्ती आहे जी एका निश्चित लिंगाची व्यक्ती म्हणून ओळख देता येत नाही; अस्थिर किंवा अनिश्चित लिंग ओळख असणारी आहे किंवा ती असणार्‍या किंवा व्यक्त करणार्‍या व्यक्तीशी संबंधित असते .

1/13

सर्वांचे सहयोगी

प्रत्येक कर्मचार्‍यासाठी सकारात्मक आणि असाधारण असे कार्यालयीन वातावरण देण्याची आमची वचनबद्धता ही आदर, विश्वास, सहकार्य आणि सहयोग यावर आधारित आहे.

सहयोगी म्हणजे अशी व्यक्ती जी समानता हे ध्येय ठेवून इतर गटांच्या सहाय्यार्थ कार्य करते.

यशस्वी सहयोगी कसे व्हावे याविषयी काही टिप्स:

चांगले श्रोते व्हा

अभिप्राय न देता इतरांचे म्हणणे ऐकून घेणे हा सकारात्मक संवाद वाढविण्यात मदत करणारा एक महत्त्वाचा गुण आहे.

शब्दावली जाणून घ्या

एका चांगल्या सहयोगीने सहानुभूती निर्माण करण्यासाठी स्वतःचा विशेषाधिकार आणि प्रवृत्ती यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. स्वत:ला योग्य भाषेचे प्रशिक्षण देणे तसेच आवश्यक असेल तेव्हा प्रश्न विचारणे हे महत्त्वाचे आहे.

पद्धती जाणून घ्या

लिंग, अभिमुखता आणि ओळख यांवर आधारित गृहीत विचारांना आव्हान देण्यासाठी प्रश्न विचारणे देखील महत्त्वाचे आहे. असमर्थित वर्तणुकीस साक्षीदार झाल्यास तुम्ही आवाज उठविला पाहिजे.

समान संधी

Uber समुदाय विविधतेत असणाऱ्या सामर्थ्याला महत्त्व देतो आणि आम्ही जगभरात कमाईच्या समान संधी ऑफर करतो याचा आम्हाला अभिमान आहे. समान संधी आणि समावेशासाठी काम करण्याची आमची वचनबद्धता हा देखील आमच्या कर्मचारी संस्कृती आणि धोरणांचा एक अविभाज्य भाग आहे.

प्रगती कधीच थांबत नाही हे आम्ही जाणून आहोत आणि गेल्या 6 वर्षांपासून मानवी हक्क मोहिमेतर्फे कॉर्पोरेट समानता निर्देशांकात 100 प्राप्त केल्याचा सन्मान आम्हाला लाभला आहे.

सदैव दिले जाणारे सहाय्य

पारदर्शकता आणि संवाद वाढविण्यासाठी, आम्ही 2019 मध्ये प्रथमच जागतिक स्तरावर कर्मचार्‍यांसाठी लिंग संक्रमणासंबंधित मार्गदर्शक तत्त्वे लाँच केली आहेत.

आम्ही ट्रान्सजेंडर भागीदारांना कमाईच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न वाढवून आमच्या ट्रान्सजेंडर ड्रायव्हर-भागीदार, डिलिव्हरी भागीदार आणि कर्मचारी यांचा अधिकाधिक समावेश व्हावा या दृष्टीने देखील कार्य केले आहे.

*वरील अटी ह्युमन राइट्स कँपेन आणि ट्रान्स स्टुडंट एजुकेशनल रिसोर्सेस यांनी लिहिल्या होत्या. अधिक जाणून घेण्यासाठी hrc.org आणि transstudent.org यावर जा. ही सामग्री वापरण्याची परवानगी ह्युमन राइट्स कँपेनद्वारे किंवा ट्रान्स स्टुडंट एजुकेशनल रिसोर्सेसद्वारे, Uber चे समर्थन करण्याच्या उद्देशाने नाही किंवा तशी समजली जाऊ नये.