महिलांची सुरक्षितता
महामारीच्या दरम्यान हिंसा आणि हल्ल्याची जोखीम असलेल्यांना 50,000 विनामूल्य राईड्स आणि मील्स पुरवली.
अहवालांमधून असे समोर आले आहे की या महामारीच्या काळात स्त्रियांवरील हिंसाचारात 20% पर्यंत वाढ झालीे.
अडचणीत असलेल्यांना 45,000 विनामूल्य मील्स आणि निवारा व सुरक्षित जागांसाठी 50,000 हून अधिक विनामूल्य राईड्स पुरविण्यासाठी आम्ही जगभरातील घरगुती हिंसाचाराविरोधात कार्यरत संस्था आणि स्थानिक शासनांना सहाय्य केले.
आमच्यातील भागीदारांच्या अंतर्दृष्टीशिवाय आणि कौशल्याशिवाय यांपैकी काहीही करणे शक्य होणार नाही, जे आम्हाला तर शिक्षित करतातच शिवाय पीडितांनादेखील अथकपणे मदत करतात. जगभरात अशा अनेक भागीदाऱ्या अस्तित्वात आहेत; आम्ही फ्रान्स, ब्रिटन आणि ब्राझीलमधील 3 भागीदाऱ्या येथे ठळकपणे दर्शवत आहोत.
कलेक्टीफ फेमिनिस्टे कोन्ट्रे ले व्हीओल (फ्रान्स)
लैंगिक अत्याचारातून वाचलेल्यांना कायदेशीर मदतीच्या उपलब्धतेसाठी आणि मानसिक आधार देण्यासाठी Uber ने विनामूल्य राईड्स देऊ केल्या. या स्त्रियांना महत्त्वाच्या कायदेशीर अपॉइंटमेंट्ससाठी, न्यायालयीन खटले आणि इतर भेटीगाठींसाठी प्रवास करणे खर्च, अंतर आणि लॉजिस्टिक्स यामुळे पारंपारिकरित ्या कठीण झाले असेल.
हेस्टिया (युके)
आम्ही लंडन आणि आग्नेय, युकेमधील घरगुती हिंसाचारग्रस्तांना आधार देणारी एक सर्वात मोठी संस्था असलेल्या हेस्टियाला मोफत राईड्स तसेच अर्थसहाय्य प्रदान केले. 2020 मध्ये, त्यांनी 2,800 स्त्रिया आणि मुलांना घरगुती हिंसाचाराच्या आघातातून बाहेर येण्यासाठी आधार दिला.
इन्स्टिट्युटो एव्हन (ब्राझील)
या महामारीच्या काळात महिलांना गुप्तपणे मदतीसाठी विचारणा करता येणे शक्य व्हावे यासाठी आम्ही अँजेला या व्हॉट्सॲपद्वारे ॲक्सेस करता येणाऱ्या चॅटबॉटच्या निर्मितीमध्ये सहाय्य केले. त्याचबरोबर, Uber प्रोमो कोडसह, मदत मिळवण्यासाठी त्या अधिक स्वतंत्रपणे हालचाल करू शकतात.
वरील उदाहरणे ही फ्रान्स, युके आणि ब्राझीलमधील महिलांवरील हिंसाचाराच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या केवळ मोजक्याच संघटनांचे आणि आमच्या एकत्रितपणे काम करण्याच्या अभिनव मार्गांचे प्रतिनिधित्व करतात.
आमचे जगभरातील नवीन उपक्रम, आमच्या सुरक्षा वचनबद्धता, आमचे युएस सुरक्षा अहवाल आणि आमचे ब्राझीलमधील काम याबद्दल अधिक जाणून घ्या.
आमच्या प्रभाव कार्याबद्दल अधिक वाचा
लसीकरणासाठी राईड्स
शिक्षकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणालाही, कोविड-19 लस घेण्यासाठी वाहतूक ही गोष्ट अडथळा ठरणार नाही, हे सुनिश्चित करण्यात आम्ही मदत करत आहोत.
वर्णद्वेषाबद्दल शून्य सहनशीलता
आपल्या जगामध्ये वर्णद्वेष आणि भेदभावाला स्थान नाही — त्यांच्याशी लढण्यासाठी आम्ही या गोष्टी करत आहोत.