ड्राइवर आवश्यकता
Uber हा तुमचा स्वतःचा बॉस बनण्याचा आणि भरपूर पैसे कमवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. व्यावसायिक परवान्यापासून ते कारपर्यंत, Uber तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदत करू शकते.
आवश्यक दस्तऐवज
ड्राइवर आणि मालक दोन्हीही
ड्राइवर आणि मालक या रूपाने तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालकीची गाडी चालवू शकता. यासाठीच्या आवश्यकता शहरानुसार बदलतात, परंतु काही किमान आवश्यकता आहेत:
- वाहन चालक परवाना
- वाहन नोंदणी
- वाहनाचा विमा
- वाहन परमिट
भागीदाराच्या हाताखाली ड्राइवर
भाागीदाराच्या हाताखाली काम करणारा/करणारी ड्राइवर वाहन चालक नसणाऱ्या भागीदाराच्या मालकीचे वाहन चालवतो/चालवते. भाागीदाराच्या हाताखाली काम करणाऱ्या ड्राइवरसाठी खालील दस्तऐवज आवश्यक आहे:
- वाहन चालक परवाना
वाहन चालक नसणारा भागीदार
वाहनचालक नसणारा भागीदार किंवा फ्लीट भागीदार म्हणजे अशी व्यक्ती जी Uber प्लॅटफॉर्मवर गाडी चालवत नाही, मात्र तिच्या मालकीचे वाहन असते/असतात आणि ती व्यक्ती कमीतकमी एका ड्रायव्हरची व्यवस्था करत असते. वाहनचालक नसणारा भागीदार बनण्यासाठी हे आवश्यक आहे:
- वाहन विमा
- वाहन नोंदणी
- वाहन परमिट
ड्रायव्हर प्रोफाइल फोटो
- फोटोत ड्रायव्हरचा पूर्ण चेहरा आणि खांद्यांचा वरचा भाग दिसणे, तसेच ड्रायव्हरने सनग्लासेस न लावता, मध्यभागी बसून, समोर बघून फोटो काढून घेणे आवश्यक आहे
- ड्रायव्हरशिवाय इतर कोणीही फ्रेममध्ये असू नये आणि फोटो प्रकाशात आणि फोकसमध्ये काढलेला असावा. तो ड्रायव्हरचा लायसन्सचा फोटो किंवा इतर छापील फोटो असू शकत नाही"
सुरुवात करणे खूप सोपे आहे
1. ऑनलाइन साइन अप करा
आम्हाला तुमच्याविषयी आणि तुमच्याकडे कार असल्यास, त्याविषयी माहिती द्या. तुमच्याकडे कार नसेल तर, आम्ही ती मिळवून देण्यात मदत करू.
2. काही दस्तऐवज शेअर करा
आम्हाला वर नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांची एक प्रत आवश्यक आहे.
3. तुमचे खाते ॲक्टिव्हेट करा
तुमची कार स्थानिक ग्रीनलाइट हबवर घेऊन या. या आवश्यकता शहरानुसार बदलतात, त्यामुळे अधिक माहिती पाहण्यासाठी साइन अप करा.
स्थानिक वाहन आवश्यकता
वर दिलेल्या किमान आवश्यकतांव्यतिरिक्त, प्रत्येक शहराचे स्वतःचे वाहनासाठीचे नियम असतात.
स्वतःच स्वःतचे बॉस व्हा
या वेबपेजवर दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरात लागू होणार नाही. ती कधीही बदलू शकते आणि कोणतीही नोटीस न देता अपडेट केली जाऊ शकते.
तुमच्या पसंतीची भाषा निवडा
याच्या विषयी