Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

विविधता आणि समावेशकता यांना प्रोत्साहन

आम्ही दररोज, धोरणांना पाठिंबा देणे आणि समान हक्कांचे समर्थन करण्याचे काम करत आहोत.

समान हक्कांसाठी आमची वचनबद्धता

समुदायापर्यंत पोहोचणे, प्रशिक्षण, आणि भरती तसेच धारणा या माध्यमांतून आम्ही एका अशा कार्यस्थानास प्रोत्साहन देण्यास मदत करत आहोत जिथे प्रत्येकजण ते जे कोणी आहेत त्याबद्दल प्रामाणिक राहू शकतील.

अभिमानाचा प्रसार करत आहोत

आम्ही जगभरातील अभिमान संबंधित कार्यक्रमांना साजरे तसेच प्रायोजित करण्यासाठी एलजीबीटीक्यू+ समुदायाच्या प्रेरणादायक सदस्यांसह एकत्र काम करत आहोत.

एकत्र काम करत आहोत

Uber ला एलजीबीटीक्यू+ समानतेसाठी सर्वोत्कृष्ट कार्यस्थानांपैकी एक असा दर्जा सातत्याने मिळाला आहे.

एलजीबीटीक्यू + कर्मचारी यांना संसाधने पुरवतो

Uber कर्मचारी संसाधन गटाच्या द प्राईड चे उद्दिष्ट हे असे कामाचे ठिकाण आणि समुदाय तयार करणे आहे जेथे एलजीबीटीक्यू+ व्यक्ती यांचे स्वागत होईल तसेच त्यांना सहाय्य देऊन स्वत:ची सर्वोत्कृष्ट रूप साकार करण्यासाठी सक्षम बनवले जाईल.

सर्वांसाठी Uber

Uber हे रायडर्स आणि ड्रायव्हर्सचे स्वागत करणारे व्यासपीठ बनावे तसेच 70 हून अधिक देशांचे प्रतिनिधित्व करणार्‍या कर्मचार्‍यांना काम करण्यासाठी एक उपयुक्त ठिकाण ठरावे यादृष्टीने प्रक्रिया, संसाधने आणि तंत्रज्ञान राबवण्यात येते.

स्थलांतरितांना सहाय्य करत आहोत

जेव्हा 2017 च्या सुरुवातीला अमेरिकेत प्रवास बंदी लागू करण्यात आली तेव्हा, याचा फटका बसलेले ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही केलेल्या मदतीमुळे डझनावारी कुटुंबे पुन्हा एकत्र आली आणि इतर शेकडो कुटुंबांना मोफत कायदेशीर मदत पुरवण्यात आली.

DREAMers च्या पाठीशी उभे आहोत

आम्ही समावेश आणि समानतेच्या आमच्या मूल्यांना धक्का देऊ पाहणार्‍या प्रयत्नांविरूद्ध सतत आवाज उठवतो आणि त्यावर कार्यवाही करतो. डीएसीए रिव्हर्सलला प्रत्त्युत्तर म्हणून, आम्ही DREAMers ना —स्थलांतरित आई-वडिलांपासून जन्मलेल्यांना— मोफत कायदेशीर मदत पुरवली आणि द्विपक्षीय कायदेशीर तोडगा निघावा याकरता काँग्रेसला आवाहन करण्यासाठी कोएलिशन फॉर द अमेरिकन ड्रिम मध्ये सामील झालो.

“योग्य कृतींची जोड असल्यास, वैविध्यपूर्ण टीम्स या आमची सर्वात मोठी संपत्ती बनू शकतात कारण त्याच नाविन्यतेला प्रेरणा देत असतात.

बो यंग ली, मुख्य विविधता आणि समावेश अधिकारी, Uber

कामाच्या जागी सबलीकरण

Uber साठी काम करणारे लोक अनेक भिन्न पार्श्वभूमीतून येतात. कर्मचार्‍यांच्या नेतृत्वाखालील आमचे कर्मचारी संसाधन गट (ईआरजी) हे समुदायाला मदत करतात, आत्मीयता निर्माण करतात, आमचे काम आणि मूल्ये यांची जोपासना करतात आणि स्थानिकतेवरील भर ढळू न देता जागतिक समावेशकतेसाठी अभिप्राय देणारे समूह (साउंडिंग बोर्ड्स) म्हणून काम करतात.

लैंगिक अंतर दूर करणे

तंत्रज्ञान क्षेत्रात आपल्या व्यवसायिक कारकिर्दीला पुढे नेण्याची इच्छा असलेल्या मुली आणि युवतींना मदत करण्यासाठी Uber जागतिक संघटनांसह एकत्रितपणे काम करत आहे.

Uber अ‍ॅपसह गाडी चालवणाऱ्या 10 लाख स्त्रियांचे लक्ष्य गाठत आहोत.

गाडी चालवणे हा कायमच एक पुरुषप्रधान व्यवसाय राहिला आहे. Uber ने 2020 पर्यंत 10 लाख महिलांना ड्रायव्हर म्हणून साइन अप करण्याचे वचन दिले आणि जुलै 2017 मध्ये हा आकडा पार झाला.