विविधता, समानता आणि समावेशकता
वैविध्यपूर्ण प्लॅटफॉर्मला सेवा पुरवण्यासाठे वैविध्यपूर्ण टीम्स तयार करणे
Uber प्लॅटफॉर्मवर, दर दिवशी आमच्या 1 कोटी 90 लाख ट्रिप्समध्ये थक्क व्हावे इतके वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकमेकांशी संवाद साधतात. आमची उत्पादने वापरणाऱ्या विविध समुदायांना प्रभावीपणे सेवा देता येतील अशाप्रकारे आम्ही आमची उत्पादने बनवली पाहिजेत आणि आमचा व्यवसाय चालवला पाहिजे. याचा अर्थ असा की आम्ही ज्या समुदायांमध्ये काम करतो आणि ज्यांच्यातून मनुष्यबळ भर्ती करतो, त्यांच्यातील विविधतेचेे प्रतिबिंब आमच्या मनुष्यबळात दिसून येणे अत्यावश्यक आहे, तसेच आम्ही एक असे वातावरण तयार करणे गरजेचे आहे ज्यात विविधतेला चालना मिळेल आणि जिथे लोकांना आपलेपणा वाटेल तसेच ते आमच्या सामायिक यशामध्ये त्यांचे योगदान देऊ शकतील.
बराच काळ क्रमाक्रमाने शाश्वत बदल करून, Uber ने तळापासून आपला पाया पुन्हा बांधला आहे आणि संस्कृतीची संपूर्ण पुनर्बांधणी केली आहे. पाच वर्षांनंतर, आम्ही आता पाहू शकतो की कशाप्रकारे विविधता आम्हाला अधिक मजबूत बनवत आहे आणि जगाचे चलनवलन अधिक चांगल्या प्रकारे करण्याकरता एक अधिक समानतापूर्ण आणि सर्वसमावेशक वातावरण तयार करण्यास सक्षम करत आहे.
कर्मचारी संसाधन गट
Uber चे कर्मचारी संसाधन गट सदस्यांसाठी नेतृत्व विकास संधींव्यतिरिक्त अस्मिता आणि आंतर-विभागीयता विषयी जागरूकता प्रदान करतात.