Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

विविधता, समानता आणि समावेशकता

वैविध्यपूर्ण प्लॅटफॉर्मला सेवा पुरवण्यासाठे वैविध्यपूर्ण टीम्स तयार करणे

Uber प्लॅटफॉर्मवर, दर दिवशी आमच्या 1 कोटी 90 लाख ट्रिप्समध्ये थक्क व्हावे इतकी वेगवेगळ्या प्रकारची लोक एकमेकांशी संवाद साधतात. आम्हाला आमची उत्पादने अशा प्रकारे बनवणे आणि आमचा व्यवसाय अशा प्रकारे चालवणे भाग आहे ज्यामुळे त्यात आम्ही ज्यांची सेवा करतो त्या विविध समुदायांचे रूप दिसून यावे. याचा अर्थ असा की आमच्या प्लॅटफॉर्मवर असलेली विविधता आमच्या मनुष्यबळात प्रतिबिंबित होणे अत्यावश्यक आहे, तसेच आम्ही एक असे वातावरण तयार करणे गरजेचे आहे ज्यात विविधतेला चालना मिळेल आणि जिथे लोकांना आपलेपणा वाटेल तसेच ते आमच्या सामायिक यशामध्ये त्यांचे योगदान देऊ शकतील.

काळानुरूप क्रमाक्रमाने टिकाऊ असे बदल करून, Uber ने तळापासून आपला पाया पुन्हा बांधला आहे आणि संस्कृतीची संपूर्ण पुनर्बांधणी केली आहे. पाच वर्षांनंतर, आम्ही आता पाहू शकतो की कशाप्रकारे विविधता आम्हाला अधिक मजबूत बनवत आहे आणि जगाचे चलनवलन अधिक चांगल्या प्रकारे करण्याकरता एक अधिक समानतापूर्ण आणि सर्वसमावेशक वातावरण तयार करण्यास सक्षम करत आहे.

विविधतेबद्दल नेतृत्वाची वचनबद्धता

Uber मध्ये काम करणाऱ्या लोकांमधील विविधता वाढवणे आणि अधिक सक्रियपणे वर्णद्वेष-विरोधी असलेली कंपनी बनणे आणि आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांच्या सहयोगाने काम करणे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी, आमची कार्यकारी नेतृत्व टीम त्यांच्या टीममधील प्रतिनिधित्वाची लक्ष्ये निश्चित करून आणि प्रगतीवर नियमितपणे लक्ष ठेऊन आपली भूमिका निभावत आहे. 2020 मध्ये, आम्ही वर्णद्वेषाच्या विरोधातील आमचे प्रयत्न आमच्या उत्पादनांमधून आणि आमच्या भागीदारींमधून साकार व्हावे आणि ते आमच्या प्लॅटफॉर्मवरील सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी आम्ही त्याबाबतच्या आमच्या वचनबद्धता सार्वजनिकपणे मांडल्या. आम्ही या वचनबद्धतांचे सक्रियपणे व्यवस्थापन करतो आणि ट्रॅक ठेवतो तसेच त्या सर्व मुद्द्यांवर प्रगती करत आहोत.

"प्रगती होण्यास वेळ लागतो हे आम्ही जाणतो, पण उपाययोजनांचा अभाव हे आमचा वेग कमी असण्याचे कारण नसते. जेव्हा कंपन्या वचनबद्धतेस जागण्याचे आणि वर्णद्वेष आणि श्वेत सर्वश्रेष्ठतेच्या वर्तनाविरूद्ध भूमिका घेण्याचे धैर्य दाखवत नाहीत तेव्हा त्या प्रगती करण्यात कमी पडतात. जलदगतीने बदल झाले नाहीत तर व्यक्ती आणि कंपनी, दोन्हींमधील ऊर्जा नाहीशी होते. मात्र क्रमाक्रमाने होत गेलेले परिवर्तन सर्वात शाश्वत असते. विषमता आणि वंशविद्वेष हे काही एका रात्रीत उद्भवलेले नाहीत आणि त्यांना साध्यासोप्या उपायांनी नष्ट देखील करता येणार नाही. हे कधीही न संपणारे काम आहे. आपण समर्पितपणे काम करत राहिल्यास निश्चितच बदल घडेल असा माझा विश्वास आहे. Uber ने दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या कृतींबद्दल वचनबद्धता राखण्याचे धैर्य नेहमीच दाखवले आहे आणि माझ्या मते हीच यशाची पहिली पायरी आहे.”

बो यंग ली, चीफ डी अँड आय ऑफिसर

“चलनवलनाला सामर्थ्य देणारी कंपनी म्हणून, प्रत्येकजण शारीरिक, आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या मुक्तपणे आणि सुरक्षितपणे वाटचाल करू शकेल हे सुनिश्चित करण्याचे आमचे ध्येय आहे. ते करण्यासाठी आपण कंपनीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी, संपूर्ण समाजात पसरलेल्या वंशविद्वेषाविरुद्ध लढा देऊन समानतेचे समर्थक बनले पाहिजे.

“एक गोष्ट आम्हाला स्पष्टपणे माहीत आहे: फक्त आमच्या उत्पादनांमुळेच समानता आणि न्यायपूर्णतेत सुधारणा होईल अशी आशा करून चालणार नाही. तर आम्ही आमचा जागतिक विस्तार, आमचे तंत्रज्ञान आणि आमचा डेटा जलद बदल घडवण्यात मदत करण्यासाठी वापरणे आवश्यक आहे - जेणेकरुन आम्ही अधिक सक्रियपणे वंशविद्वेष विरोधी कंपनी, एक सुरक्षित, अधिक समावेशक कंपनी आणि प्लॅटफॉर्म बनू आणि आम्ही सेवा देत असलेल्या सर्व समुदायांचा विश्वासू सहकारी बनू.”

दारा खोसरोशाही, मुख्य कार्यकारी अधिकारी

Employee resource groups

Uber चे कर्मचारी संसाधन गट सदस्यांसाठी नेतृत्व विकास संधींव्यतिरिक्त अस्मिता आणि आंतर-विभागीयता विषयी जागरूकता प्रदान करतात.

Able at Uber

Uber’s community for caregivers and employees living with disabilities

Asian at Uber

Uber चा आशियाई समुदाय

Black at Uber

कृष्णवर्णीय कर्मचारी आणि सहयोगींसाठी Uber चा समुदाय

Equal at Uber

सामाजिक-आर्थिक समावेशासाठी Uber चा समुदाय

Immigrants at Uber

स्थलांतरितांसाठी Uber चा समुदाय

Interfaith at Uber

विविध आध्यात्मिक श्रद्धा आणि संस्कृतींच्या लोकांसाठी Uber चा समुदाय

Los Ubers

हिस्पॅनिक आणि लॅटिनिक्सचे कर्मचारी आणि सहयोगींसाठी Uber चा समुदाय

Parents at Uber

पालक आणि काळजी घेणाऱ्यांसाठी Uber चा समुदाय

Pride at Uber

एलजीबीटीक्यू+ समावेश आणि विविधतेसाठी Uber चा समुदाय

Sages at Uber

सर्व पिढ्यांच्या कर्मचार्‍यांसाठी Uber चा समुदाय

Veterans at Uber

निवृत्त सैनिकांसाठी Uber चा समुदाय

Women at Uber

महिलांसाठी Uber चा समुदाय

वार्षिक पीपल अँड कल्चर रिपोर्ट

मनुष्यबळाचे व्यवस्थापन तसेच विविधता, समानता आणि समावेशन व संस्कृती यांबद्दलचा आमचा दृष्टिकोन मांडण्यासाठी आम्ही दरवर्षी आमचा पीपल अँड कल्चर रिपोर्ट प्रकाशित करत असतो. आम्ही प्रतिनिधित्वाबाबत अपडेट केलेला डेटा प्रकाशित करतो आणि आम्ही आमच्या उद्दिष्टांच्या दिशेने कशी प्रगती करत आहोत याची रूपरेषा देतो. आमचा कर्मचारी डेटा आणि मनुष्यबळ पद्धती यांमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या आमच्या दृष्टिकोनामध्ये हा रिपोर्ट एक महत्त्वाचा घटक आहे. अधिक माहितीसाठी आमचे पीपल अँड कल्चर रिपोर्ट पृष्ठ पहा.

समान संधी देणारा नियोक्ता बनणे

नियोक्ता माहिती रिपोर्ट म्हणून देखील ओळखला जाणारा ईईओ-1 रिपोर्ट यूएस फेडरल सरकारद्वारे अनिवार्य केलेला आहे आणि त्यानुसार कंपन्यांना वंश/मूळ देश, लिंग आणि कामाच्या श्रेणीनुसार कर्मचार्‍यांचा डेटा शासनाला द्यावा लागतो.

आमच्या संपूर्ण मनुष्यबळामध्ये योग्य विविधता आणि समान संधी असल्याची खात्री करण्यासाठी या रिपोर्टचा उपयोग केला जातो. एका प्रकारे, तो एका विशिष्ट वेळी Uber च्या अमेरिकेतील मनुष्यबळाचा नकाशाच असतो. कामाच्या ठिकाणी विविधतेला प्रोत्साहन देणे आमच्या व्यवसायाला आमच्या व्यापक डीईआय धोरणाच्या दृष्टीने त्याच्या उद्दिष्टांबद्दल गंभीरपणे विचार करण्यास मदत करते. आमच्या कर्मचारी लोकसंख्याशास्त्रीय डेटाची पारदर्शकता आणि त्यातील तपशील वाढवण्याच्या आमच्या सततच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून आम्ही हा रिपोर्ट सार्वजनिकपणे उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.

1/3

समान संधी देणारा/सकारात्मक कृती करणारा नियोक्ता असल्याचा Uber ला अभिमान आहे. लिंग, लैंगिक ओळख, लैंगिक अभिमुखता, वंश, वर्ण, धर्म, राष्ट्रीय मूळ, अपंगत्व, संरक्षित सेवानिवृत्त सैनिक दर्जा, वय किंवा कायद्याने संरक्षित इतर कोणत्याही वैशिष्ट्याबद्दल पूर्वग्रह न बाळगता सर्व पात्र अर्जदारांचा नोकरीसाठी विचार केला जाईल. याव्यतिरिक्त, आम्ही कायदेशीर आवश्यकतांशी सुसंगत राहून, गुन्हेगारी इतिहासाची पर्वा न करता पात्र अर्जदारांचा विचार करतो. "समान रोजगार संधी हा कायदा आहे", "EEO हा कायदा आहे" परिशिष्ट, आणि "वेतन पारदर्शकता व भेदभाव न करण्याची तरतूद" देखील पहा. "वेतन पारदर्शकता व भेदभाव न करण्याची तरतूद." तुम्हाला एखादे अपंगत्व असल्यास किंवा वेगळी व्यवस्था करावी लागणारी एखादी विशेष गरज असल्यास, कृपया हा फॉर्म

भरून आम्हाला कळवा

डीईआय आणि Uber मध्ये काम करणे

Uber मध्ये काम करणे कसे असते याबद्दल अधिक माहितीसाठी आमचे करिअर पृष्ठ पहा

For all offers from our partners, drivers must have been cleared to drive with Uber and be active on the platform. Prices and discounts are subject to change or withdrawal at any time and without notice, and may be subject to other restrictions set by the partner. Please visit the partner’s website for a full description of the terms and conditions applicable to your rental, vehicle purchase, product, or service, including whether taxes, gas, and other applicable fees are included or excluded. Uber is not responsible for the products or services offered by other companies, or for the terms and conditions (including financial terms) under which those products and services are offered.