आमच्याबद्दल
जगाचे चलनवलन अधिक चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी आम्ही नव्या कल्पना राबवतो
आम्ही चलनवलनाला शक्ती देतो. ते आमचा रक्तप्रवाह. ते आमच्या धमन्यांमधून वाहते. यामुळेच आम्हाला दररोज नवीन दिवसाला सामोरे जाण्याची ऊर्जा मिळते. चलनवलन अधिक चांगले कसे करता येईल यावर विचार करण्यासाठी ते आम्हाला प्रवृत्त करते. तुमच्यासाठी. तुम्हाला जिथे जायचे आहे अशा सर्व ठिकाणांसाठी. तुम्ही मिळवू इच्छिता अशा सर्व गोष्टींसाठी. तुम्हाला ज्यांच्याद्वारे कमाई करायची आहे अशा सर्व मार्गांसाठी. संपूर्ण जगभरात सर्वत्र. प्रत्यक्ष त्या वेळेत. आताच्या अविश्वसनीय वेगाने.
आमच्या सीईओचे पत्र
आमच्या जागतिक प्लॅटफॉर्मवर प्रत्येकाला पुढे जाण्यात मदत करणारे तंत्रज्ञान देण्याच्या आमच्या टीमच्या वचनबद्धतेबद्दल वाचा.
शाश्वतता
सार्वजनिक वाहतूक असो किंवा मायक्रोमोबिलिटी, शून्य उत्सर्जन करणार्या वाहनांमध्ये 100% राईड्स हे साध्य करून, Uber 2040 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक, शून्य-उत्सर्जन प्लॅटफॉर्म बनण्यासाठी वचनबद्ध आहे. जगातील सर्वात मोठा मोबिलिटी प्लॅटफॉर्म या नात्याने हवामान बदलाचे आव्हान अधिक आक्रमकपणे हाताळणे ही आमची जबाबदारी आहे. रायडर्सना पर्यावरणपूरक राईड्सचे अधिक पर्याय ऑफर करून, ड्रायव्हर्सना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास मदत करून, पारदर्शकतेला प्राधान्य देऊन आणि स्वच्छ आणि न्याय्य उर्जा संक्रमण जलद होण्यात मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि खाजगी क्षेत्राशी भागीदारी करून आम्ही हे साध्य करू.