Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

Uber सहयोगी कार्यक्रमात सामील व्हा

तुम्ही कार्यक्रमात सामील होता तेव्हा, तुम्ही पहिली ट्रिप घेणाऱ्या किंवा पहिली ऑर्डर देणाऱ्या नवीन युजर्ससाठी असलेले पॉइंट्स कमवू शकता.

आम्ही सहयोगी भागीदारांसह कसे काम करतो

आमचा सहयोगी कार्यक्रम लाभ-केंद्रित आहे आणि आम्ही युजर्स पहिली ट्रिप घेतात किंवा पहिली ऑर्डर देतात तेव्हा त्यांना पॉइंट्स देतो. ते अशा प्रकारे काम करते:

1. अर्ज करा

सहयोगी भागीदार होण्यासाठी अर्ज करण्याकरता वर लिंक केलेला फॉर्म भरा.

2. Uber आणि Uber Eats ला प्रमोट करा

तुमच्या वेब किंवा अ‍ॅपवरील प्रेक्षकांना या उत्पादनांची शिफारस करा.

3. पॉइंट्स कमवा

तुम्हाला त्यांच्या पात्र अशा पहिल्या ट्रिप्स आणि पहिल्या ऑर्डर्ससाठी असलेली कमाई मिळेल.

Uber आणि Uber Eats बद्दल

जगाचे चलनवलन अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी नव्याने कल्पना करणे हे Uber चे ध्येय आहे. आमचा प्रवास 2010 मध्ये सुरू झाला आणि त्याचे एक साधे उद्दिष्ट होते: राईड मिळवणे बटणावर टॅप करण्याइतके सोपे करणे. एकत्रितपणे 52 अब्जहून अधिक मोबिलिटी आणि डिलिव्हरी ट्रिप्सना चालना दिलेल्या Uber ने वेगवेगळ्या शहरांमधील लोकांना, खाद्यपदार्थांना आणि आयटम्सना पोहोचवण्यात मदत करत स्वतःचा विकास करणे चालूच ठेवले आहे आणि त्याचबरोबर जागतिक स्तरावर अ‍ॅक्सेस आणि कनेक्शन्सची व्याप्ती वाढवली आहे.

6 खंडांमधील 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये Uber ची विशाल बाजारपेठ आणि मजबूत ब्रँड ओळख यामुळे दृश्यमानता आणि ऑपरेशन्स वाढवण्याची इच्छा असलेल्या कंपन्यांसाठी Uber एक फायदेशीर भागीदार ठरते.

राइडशेअरिंग व्यतिरिक्त, Uber खाद्यपदार्थांच्या डिलिव्हरीसारख्या इतर क्षेत्रांमध्येही आघाडीवर आहे, ज्यामुळे भागीदारांना ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी Uber च्या सेवांचा लाभ घेण्याच्या अतिरिक्त संधी मिळतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • कृपया Uber भागीदार होण्यासाठी तुम्हाला विचारात घेतले जावे यासाठी हा फॉर्म भरा.

  • Uber ची व्यापक जागतिक उपस्थिती आणि युजर्सचा प्रचंड मोठा बेस यांचा अर्थ असा आहे की सहयोगींना लक्षणीय संख्येमध्ये संभाव्य प्रेक्षक मिळतात. इतका मोठा प्रेक्षकवर्ग लाभल्यामुळे तुमची दृश्यमानता आणि कमाईची क्षमता वाढू शकते.

  • तुम्ही Uber सह पहिली ट्रिप घेणाऱ्या किंवा Uber Eats सह पहिली ऑर्डर देणाऱ्या नवीन युजर्ससाठी असलेले पॉइंट्स कमवाल.

  • आम्ही जो पॉइंट्सचा दर ऑफर करतो तो तुमचे लक्ष्य असलेले प्रेक्षक, तुम्ही काम करत असलेला देश आणि इतर अनेक घटकांवर आधारित असतो. तुम्ही आमच्या कार्यक्रमात सामील झाल्यानंतर आम्हाला तुमच्याशी पॉइंट्सच्या दरावर चर्चा करायला आवडेल.

  • आमच्या ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये Uber आणि Uber Eats चा समावेश आहे. नवीन युजर्सना आकर्षित करणे हे आमचे ध्येय आहे. आमच्याकडे एक असा कार्यक्रम देखील आहे ज्यामध्ये आम्ही सहयोगी भागीदारांना पहिली ट्रिप घेणाऱ्या नवीन ड्रायव्हर्स आणि कुरियर्ससाठी पॉइंट्स देतो.

  • आमच्या कार्यक्रमात सर्व अर्जदारांना सामील केले जाईल याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. आम्ही ब्रँड सुरक्षा, अ‍ॅक्टिव्ह युजर्सची संख्या, ट्रॅकिंग क्षमता, मीडियाचा खर्च आणि इतर अनेक घटकांच्या आधारे संभाव्य भागीदारांची तपासणी करू. आम्हाला तुमच्याबरोबर काम करता येईल अशी आम्ही आशा करतो.

  • नाही, यासाठी शुल्क आकारले जात नाही आणि यात सामील होणे विनामूल्य आहे.