प्रवीण नेप्पल्ली नागा हे Uber मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत, जिथे ते अभियांत्रिकी आणि विज्ञान धोरण आणि तांत्रिक अंमलबजावणीचे नेतृत्व करतात. 2015 मध्ये Uber मध्ये सामील झाल्यापासून, त्यांचे लक्ष, ड्रायव्हर्स आणि कुरिअरसाठी कमाईचे सोयीस्कर व्यासपीठ तयार करताना ग्राहकांसाठी देखील एक उत्कृष्ट अनुभव विकसित करणे ह्यावर आहे.
Uber मध्ये सामील होण्यापूर्वी, प्रवीण यांनी LinkedIn मध्ये अभियांत्रिकी नेतृत्वाच्या भूमिका पार पाडल्या. तेथे, त्यांनी LinkedIn च्या वेगवान वाढीच्या पायाभरणीत योगदान देत, सुरुवातीची उत्पादने आणि डेटा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात सात वर्षे काम केले.
मूळतः दक्षिण भारतातील असणारे, प्रवीण 2002 मध्ये यूएसला गेले आणि पुढे त्यांनी नेब्रास्का विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले.
समुदाय आणि मार्गदर्शन याबद्दल उत्साही असलेले प्रवीण "Women at Uber" US&C कर्मचारी संसाधन गटाचे कार्यकारी प्रायोजक म्हणून काम करतात. त्यांच्या स्वतःच्या मुलासंबंधित त्यांना आलेल्या अनुभवातून ते ऑटिस्टिक मुलांच्या इतर पालकांना सपोर्ट करण्यासाठी देखील वचनबद्ध आहेत.
याच्या विषयी
याच्या विषयी