Please enable Javascript
Skip to main content

प्लॅटफॉर्म सुलभता

ॲक्सेसिबिलिटी अनुपालन धोरण

एक प्लॅटफॉर्म म्हणून, आम्ही EN 301 549 आणि WCAG 2.1 Level AA मध्ये नमूद केलेल्या मानकांचे अनुसरण करत EUच्या ॲक्सेसिबिलिटी कायद्याचे (EAA) पालन करण्यास वचनबद्ध आहोत. आमच्या दृष्टिकोनामध्ये डिझाइन टप्प्यातील सुलभता विचारांसंबंधित एकीकरण, नियमित ॲक्सेसिबिलिटी चाचणी आणि ऑडिट आणि आमच्या संस्थात्मक संस्कृतीमध्ये सुलभता मूल्ये समाविष्ट करण्यासाठी कर्मचारी सुलभता शिक्षण यांचा समावेश आहे. उद्भवणाऱ्या ॲक्सेसिबिलिटी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्या सुधारण्यासाठी धोरणे आणि प्रक्रिया स्थापित केल्या गेल्या आहेत.

आम्ही नियमित अंतर्गत चाचणी आणि वापरकर्ता सबमिशनद्वारे अ‍ॅक्सेस करताना येणारे संभाव्य अडथळे ओळखतो. प्रोएक्टिव्ह डिझाइन आणि अडथळे ओळखण्यासाठी आणि ते दूर करण्यासाठी अंतर्गत प्रक्रियेव्यतिरिक्त, आम्ही WCAG 2.1 Level AA मार्गदर्शक तत्त्वांनुसार आमच्या प्लॅटफॉर्मचे नियमितपणे ऑडिट करण्यासाठी LevelAcess सह काम करतो. आम्ही आमच्या iOS आणि Android साठीच्या मोबाइल प्लॅटफॉर्मवर तसेच आमच्या वेबपेजवर हा सक्रिय आणि उपायात्मक दृष्टिकोन अंमलात आणतो.

Uber सतत अनुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आमच्या ॲप्स आणि वेबपेजची ॲक्सेस क्षमता सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे. WCAG 2.1 Level AA मार्गदर्शक तत्त्वांचे समर्थन करणारी धोरणे आणि प्रक्रियांव्यतिरिक्त, आम्ही हे देखील सुनिश्चित करतो की वापरकर्त्यांना संभाव्य ॲक्सेस अडथळ्यांवर अभिप्राय सबमिट करण्याची संधी मिळेल. ग्राहक हे करू शकतात:

अ‍ॅक्सेसिबिलिटी सपोर्ट विनंत्यांसाठी किंवा स्क्रीन रीडर सबमिट करण्यासाठी खालील लिंक्स ॲक्सेस करा.

आम्ही WCAG चे पालन कसे करतो

WCAG 2.1 AA मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून , आमचे डेव्हलपर्स विविध धोरणे आणि प्रकल्प लागू करतात. या संबंधित लागू प्रक्रियांचे अधिक तपशील खाली जाणून घ्या:

  1. Uber आकलनयुक्त (पर्सिवेबल), चालवण्यायोग्य(ऑपरेबल), समजण्यायोग्य(अंडरस्टॅनडेबल) आणि मजबूत(रोबस्ट) (POUR) असा मजकूर विकसित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये डेव्हलपर चेकलिस्टचा समावेश आहे जी उपयोगिता, वर्णन, चाचणी पद्धत आणि वेळेवर उपाय योजनांच्या अपेक्षांनुसार ब्लॉकर्सना शोधून काढते.

  2. WCAG 2.1 AA मार्गदर्शक तत्त्वे Uber च्या मूळ घटक डिझाइनचा एक अंतर्भूत भाग आहेत. कोअर स्क्रीनवर कस्टमाइझ केलेले डिझाइन घेतले जात नाही.

  3. डेव्हलपर्सनी ॲक्सेस करण्यायोग्य डिझाइन केलेली वैशिष्ट्ये किंवा अपडेट्स तयार केल्यानंतर, वेब आणि मोबाइलवर लाँच करण्यापूर्वी स्क्रीन्सची WCAG 2.1 AA मार्गदर्शक तत्त्वांनुसार चाचणी घेतली जाते. या चाचण्या एका विशेष अंतर्गत टीमद्वारे घेतल्या जातात. टीम योग्य ते अनुपालन करण्यासाठी कंपनीचे टूल वापरते. त्यानंतर, विशेष टीम उपाय आवश्यक असलेल्या समस्यांना प्राधान्य देते आणि त्यावर लक्ष केंद्रित करते.

  4. ही विशेष टीम संभाव्य ॲक्सेसिबिलिटी रिग्रेशन्स ओळखण्यासाठी कोअर स्क्रीन्सच्या नियमित चाचण्या करते, ज्यानंतर लॉग इन करून त्यांचे निराकरण केले जाते.

  5. वापरकर्त्यांचा अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आमच्या विशेष टीमकडे रिपोर्ट केलेल्या सर्व ॲक्सेसिबिलिटी अडथळ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी एक समर्पित प्रक्रिया आहे.

  6. Uber वार्षिक ऑडिट करण्यासाठी आणि आमची उत्पादने ॲक्सेसिबिलिटी स्टॅंडर्ड्स (VPATs)शी कसे जुळतात याचा तपशील देणारे दस्तऐवज तयार करण्यासाठी LevelAccess सोबत करार कायम राखून आहे.

उत्पादने आणि सेवा अ‍ॅक्सेस करणे

आमच्या ॲक्सेसिबिलिटी तत्त्वांचे पालन करणारी नाविन्यपूर्ण उत्पादने आणि प्रकल्प तयार करण्यासाठी Uber वचनबद्ध आहे.