तुमचा विश्वास आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
Uber ची गोपनीयता तत्त्वे
जेव्हा तुम्ही Uber वापरता, तेव्हा तुमच्या वैयक्तिक डेटा संदर्भात तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवता. तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि याची सुरुवात तुम्हाला आमच्या गोपनीयता पद्धती समजून घेण्यात मदत करण्यापासून होते. आमची गोपनीयता तत्त्वे आम्ही Uber मध्ये गोपनीयता कशी राखतो याची पायाभरणी करतात.
आम्ही डेटा योग्यरित्या हाताळतो.
सतत नाविन्यपूर्ण शोधासाठी जबाबदार डेटा व्यवस्थापन ही पूर्वअट आहे. वापरकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे डेटा हाताळून, तो अचूक आणि पूर्ण ठेवून आणि यापुढे आवश्यक नसताना तो योग्यरित्या नष्ट करून आम्ही Uber आणि आमच्या वापरकर्त ्यांसाठी वैयक्तिक डेटाचे मूल्य कायम राखतो. यामुळे आमची उत्पादने सुधारतात, आमच्या वापरकर्त्यांचा विश्वास कमावता आणि तो टिकवून ठेवतो आणि मार्केटमध्ये आम्ही उठून दिसतो.
आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोपनीयता ठेवतो.
सुरुवातीपासून कार्यरत झाल्यानंतर आणि त्यानंतरही जागतिक दर्जाची उत्पादने आणि सेवा तयार करण्यासाठी गोपनीयता हा एक महत्त्वाचा घटक आहे. नवीन आणि बदललेली उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवा यांची गोपनीयता पुनरावलोकने केल्याने ते वापरकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतात याची खात्री होते आणि ग्राहकांना अद्वितीय अनुभव देण्यासाठी पायाभरणी होते. य ाला “आवश्यकतेनुसार गोपनीयता” असे म्हणतात.
आम्ही आम्हाला आवश्यक तेवढेच संकलित करतो.
आमची उद्दिष्टे आणि मूल्यांशी सुसंगत वैयक्तिक डेटा संकलित करताना, वापरताना किंवा हाताळताना आमच्या मनात एक विशिष्ट उद्देश असतो. आम्ही मंजूर आणि कायदेशीर हेतूंसाठी आम्हाला आवश्यक असलेला वैयक्तिक डेटा फक्त गोळा करतो आणि वापरतो.
आम्ही आमच्या डेटा वापरण्याच्या पद्धतींबद्दल पारदर्शक आहोत.
आम्ही गोळा करत असलेला वैयक्तिक डेटा आणि तो कसा वापरतो आणि कसा शेअर करतो याबद्दल आम्ही सुस्पष्ट आहोत. आम्ही जे बोलतो तेच करतो.
आम्ही वापरकर्त्यांना त्यांच्या डेटासाठी पर्याय देतो.
आम्ही वापरकर्त्यांना त्यांच्या गोपनीयता आणि वापरण्यास सुलभ असलेल्या नियंत्रणासाठी स्पष्ट पर्याय देतो, जेणेकरून ते त्यांच्या डेटाचे व्यवस्थापन करू शकतील.
आम्ही वैयक्तिक डेटाचे संरक्षण करतो.
वैयक्तिक डेटाचे नुकस ान आणि अनधिकृत वापर किंवा प्रकटीकरण टाळण्यासाठी आम्ही वाजवी आणि योग्य सुरक्षा उपाययोजना प्रदान करतो.