Please enable Javascript
Skip to main content

कधीही व कुठूनही कमाई करण्यासाठी तुमच्या कौशल्यांचा वापर करा

Uber AI सोल्युशन्ससह तुमच्या अनुभवाशी जुळणाऱ्या सोयीस्कर ऑनलाइन संधी शोधा. तुम्हाला जे योग्य वाटते ते निवडा, आगाऊ रक्कम तपासा आणि कमाई करण्यास सुरुवात करा.

कधीही व कुठूनही कमाई करण्यासाठी तुमच्या कौशल्यांचा वापर करा

Uber AI सोल्युशन्ससह तुमच्या अनुभवाशी जुळणाऱ्या सोयीस्कर ऑनलाइन संधी शोधा. तुम्हाला जे योग्य वाटते ते निवडा, आगाऊ रक्कम तपासा आणि कमाई करण्यास सुरुवात करा.

कधीही व कुठूनही कमाई करण्यासाठी तुमच्या कौशल्यांचा वापर करा

Uber AI सोल्युशन्ससह तुमच्या अनुभवाशी जुळणाऱ्या सोयीस्कर ऑनलाइन संधी शोधा. तुम्हाला जे योग्य वाटते ते निवडा, आगाऊ रक्कम तपासा आणि कमाई करण्यास सुरुवात करा.

वेगवेगळ्या फील्डमध्ये आणि वेगवेगळी कौशल्ये यांना अनुसरून असलेल्या संधी

Uber AI सोल्युशन्स ठराविक कौशल्ये असलेल्या लोकांना क्लायंटच्या विशेष गरजांनुसार त्यांच्याशी कनेक्ट करते . कमाई करण्याचे केवळ काही पर्याय येथे दिले आहेत. तुमच्या कौशल्य आणि आवडी-निवडींशी काय जुळते ते निवडा.

AI प्रतिसाद पडताळून पहा

अचूकता, स्पष्टता आणि उपयुक्तता तपासून AI प्रश्नांची उत्तरे किती चांगल्या प्रकारे देते याचा आढावा घ्या. काही बाबतीत, तुम्ही अनेक प्रतिसादांची तुलना करत मॉडेल सुधारण्यात मदत करण्यास सर्वोत्तम पर्याय निवडू शकाल.

भाषांतर करा आणि मजकुराचे पुनरावलोकन करा

भाषांतरित मजकूर तयार करण्यास आणि अचूकतेसाठी पुनरावलोकन करण्यास तुमची भाषिक कौशल्ये वापरा. नैसर्गिक वाटेल आणि AI ला भाषा आणि संस्कृतींसाठी अधिक समावेशक बनवेल याची काळजी घ्या.

उत्पादने आणि वैशिष्ट्यांची चाचणी घ्या

समस्या समाधान करण्यासाठी, सुलभ वापराचे मूल्यांकन करण्यासाठी आणि वेगवेगळ्या डिव्हाइसेसवरील कार्यक्षमता तपासण्यासाठी वेबसाइट्स, ॲप्स आणि बरेच काही वापरून पहा. तुमच्या अभिप्रायामुळे उत्पादने कार्यक्षम असल्याची खात्री करण्यात मदत होते.

डेटा नमुने गोळा करा

फोटो, व्हॉईस रेकॉर्डिंग्ज, नकाशे आणि लहान मजकूर यासारखी वास्तविक माहिती गोळा करा. हे नमुने कंपन्यांना लोक दररोज वापरत असलेली त्यांची साधने आणि सेवा सुधारण्यात मदत करतात.

डेटा लेबल करा आणि ॲनोटेट करा

फोटो, व्हिडिओ आणि इतर अनेक गोष्टींमध्ये मजकूर टॅग करा आणि त्याचे वर्णन करा. ही लेबल्स डिजिटल सिस्टिमना समजून घेण्यात आणि अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यात मदत करतात.

तुमचे कौशल्य, तुमचे शेड्युल, प्लॅटफॉर्म आमचा

विश्वासार्ह अशा प्लॅटफॉर्मवर, तुमच्या कौशल्यांचा वापर करून कमाईच्या संधी निर्माण करा ज्या केवळ तुम्ही नियंत्रित करू शकाल .

  • तुमच्या कौशल्याचा वापर करा

    तुमच्या पार्श्वभूमीशी जुळणाऱ्या नवीन संधींचा लाभ घ्या. सर्व प्रकारच्या फील्डमध्ये, तुमच्याकडे आधीपासून असलेल्या कौशल्यांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यास आमचा प्लॅटफॉर्म तुम्हाला मदत करू शकतो.

  • ऑनलाइन कधी कमाई करायची ते निवडा

    तुम्ही पैसे कसे आणि केव्हा कमवायचे ते ठरवा—आणि लगेच कमाई करण्याचा अ‍ॅक्सेस मिळवा. संधी आणि वेतनासह आगाऊ तपशील ऑनलाइन उपलब्ध असल्यामुळे, सर्व काही तुमच्या नियंत्रणात राहते.

  • विश्वासार्ह प्लॅटफॉर्मशी कनेक्ट व्हा

    सोयीस्करपणे काम करण्यासाठी सगळ्यात मोठ्यांपैकी एक असलेल्या प्लॅटफॉर्मवर नवीन मार्गाने कमाई करा. Uber AI सोल्युशन्स तुम्हाला, तुमच्या कौशल्यांची मागणी असलेल्या कंपन्यांशी कनेक्ट करते, जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासाने अशा संधींचा लाभ घेऊ शकता.

1/3
1/2
1/1

पुढे कसे जायचे ते तुम्ही ठरवा

Uber AI सोल्युशन्स तुम्हाला अशा कंपन्यांशी कनेक्ट करते जिथे तुमच्या कौशल्याचा कस लागेल. तुम्ही भाषांतर करत असाल, उत्पादनांची चाचणी करत असाल किंवा आणखी काही, आम्ही पुढील तंत्रज्ञान तयार करण्यात मदत करण्यासाठी तुमचे मत क्लायंटसह शेअर करतो.

हे कसे काम करते

सहजपणे साइन अप करा

केवळ काही मिनिटांत तुमची प्रोफाइल तयार करा आणि तुम्हाला पूर्ण करायच्या असलेल्या संधींचे प्रकार निवडा. तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी सरकारने जारी केलेला आयडी अपलोड करा.

कौशल्य तपासणी पूर्ण करा

Uber AI सोल्युशन्सच्या तृतीय-पक्ष क्लायंट्ससाठी, काही संधींसाठी विशिष्ट पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. अशा बाबतीत, तुमची पात्रता निश्चित करण्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील—जसे की एखाद्या मजकुराच्या छोट्या भागाचे तुम्हाला भाषांतर करण्यास सांगितले जाईल.

निकष पूर्ण केल्यास, अधिक जास्त कमाई करता येईल अशा विशेष गिग्समध्ये तुम्हाला प्रवेश मिळवता येईल.

काय करायचे ते निवडा

तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या फील्डमधील उपलब्ध संधी ब्राउझ करा. सगळे तपशील— जसे की अंदाजे पेमेंट आणि आवश्यकता—लगेच दिसतील जेणेकरून काय योग्य आहे ते तुम्ही ठरवू शकता.

कार्ये सबमिट करा

जसजशी तुम्ही संधी स्वीकारता, तसतसे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी माहिती आणि उदाहरणे पुरवली जातील. तुम्ही काय पूर्ण केले याचा मागोवा घ्या आणि कालांतराने तुमची प्रगती एक्सप्लोर करा.

विश्वासार्ह कमाई

तुमचे शेड्युल केलेले विनामूल्य पेआउट्स मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते लिंक करा.

आधीच्या आठवड्यात (रविवार-शनिवार) पूर्ण केलेल्या कार्यांसाठी पेमेंट्स दर आठवड्याला शेड्युल केल्या जातात आणि दर सोमवारी त्या पूर्ण केल्या जातात.

सुरुवात करण्‍यास तयार आहात का?

तुमच्या कौशल्याशी जुळलेल्या संधी एक्सप्लोर करण्यासाठी साइन अप करा आणि सोयीस्कर कमाई करण्यास सुरुवात करा. कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया सहाय्याशी येथे संपर्क साधा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • Uber AI सोल्युशन्स हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तंत्रज्ञानाचे भविष्य घडवण्यात मदत करू शकता. भाषांतर, डेटा लेबलिंग, उत्पादन चाचणी आणि बरेच काही यासारख्या, विशेष कौशल्ये लागणाऱ्या संधी तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा पूर्ण करू शकता.

  • साइन अप करण्यासाठी, कायदेशीर आवश्यक तेवढे तुमचे वय असणे, तुम्ही प्रोफाइल तयार करणे आणि सरकारने जारी केलेला आयडी तुम्ही अपलोड करणे आवश्यक आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म सुनिश्चित करण्यात मदत करण्यासाठी स्थानिक कायद्यांना अनुसरून केलेली पार्श्वभूमी पडताळणी देखील आवश्यक आहे.

  • खाते तयार करण्यासाठी कोणत्याही किमान शिक्षण किंवा अनुभवाची आवश्यकता नाही. तुम्ही Uber सोबत शेअर करत असलेल्या कौशल्यांच्या आधारे आणि आमच्या तृतीय-पक्ष क्लायंटच्या आवश्यकतांच्या आधारे तुमच्या प्रोफाइलशी संधी जुळवल्या जातात. काही कार्ये सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत, तर काही कार्यांसाठी ठरावीक कौशल्यांची आवश्यकता असते. विशिष्ट कौशल्ये आवश्यक असलेल्या काही संधींसाठी, पात्रता निश्चित करण्यास तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात—जसे की एखाद्या मजकुराच्या छोट्या भागाचे तुम्हाला भाषांतर करण्यास सांगितले जाईल. अशाप्रकारे , तुमची कौशल्ये आमच्या तृतीय-पक्षाच्या क्लायंटच्या विनंतीशी जुळतात की नाही याची खात्री होण्यात मदत होते.

    टीप: संधींची हमी नाही. तुम्हाला उपलब्ध असलेल्या संधी ॲक्सेस करण्यासाठीUber AI सोल्युशन्स पोर्टलवर जा.

  • तुम्ही साइन अप केल्यानंतर, तुमच्या कमाईचे पेमेंट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करण्यास सांगितले जाईल.

    आधीच्या आठवड्यात (रविवार-शनिवार) पूर्ण केलेल्या कार्यांसाठी पेमेंट्स दर आठवड्याला शेड्युल केल्या जातात आणि दर सोमवारी त्या पूर्ण केल्या जातात.

  • होय, जर Uber AI Solutions तुमच्या क्षेत्रात लाइव्ह असेल, तर तुम्ही त्या क्षेत्रातून कुठूनही संधी स्वीकारू शकता. तुम्ही जेथे आहात तेथे ही सेवा अद्याप उपलब्ध नसल्यास, आमचा व्यवसाय वाढत असताना अपडेट्ससाठी प्रतीक्षा यादीमध्ये तुम्ही सामील होऊ शकता.

  • उत्तम अनुभवाचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला सामान्य मिडरेंज डेस्कटॉप किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरची आवश्यकता असेल: किमान 8 जीबी रॅम (16 जीबी असल्यास अधिक चांगले), आधुनिक मल्टीकोर प्रोसेसर (जसे की इंटेल i3/i5 किंवा एएमडी रायझन 5), आणि किमान 128 जीबी स्टोरेज. तुमच्याकडे किमान 15-20 एमबीपीएस बँडविड्थ असलेले स्थिर इंटरनेट कनेक्शन देखील असावे असे आम्ही सुचवितो.

  • नाही. Uber AI सोल्युशन्सवर साइन अप करणे पूर्णपणे विनामूल्य आहे. कोणतीही छुपी फी किंवा सदस्यता आवश्यक नाही.