योग्य कृती करणे. सर्वकाळ.
“हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की आपण काय साध्य करू हेच फक्त महत्त्वाचे नसते —तर आपण कसे यशस्वी होतो, आणि यशाच्या मार्गात आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आचरण कसे असते, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. सर्व Uber कर्मचार्यांनी सर्वकाळ विशिष्ट जबाबदार्या स्वीकाराव्यात आणि उच्च श्रेणीच्या सचोटीच े प्रदर्शन करावे, अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा असते.”
टोनी वेस्ट, मुख्य कायदा अधिकारी, Uber
नीतिमत्ता आणि सचोटी
Uber चे यश सुकर करणारा आणि सर्व कर्मचार्यांना आचरणात मार्गदर्शन करणारा एक विश्वसनीय भागीदार म्हणून सेवा देणे हे Uber च्या नीती आणि अनुपालन (ई अँड सी) टीमचे मिशन आहे. आम्ही हे या प्रकारे करतो:
- नैतिक कसोट्यांवर निर्णय घेण्याची संस ्कृती वाढवणे आणि तिला सक्षम करणे
- सर्व लागू कायदे, धोरणे आणि नियमांचे पालन करण्यासाठी Uber च्या कर्मचार्यांना मार्गदर्शन देणे
स्कॉट स्कूल्स, मुख्य नैतिकता आणि अनुपालन अधिकारी, Uber
Independently verified
Under Scott's leadership, Uber has earned the coveted Compliance Leader Verification.
एक निश्चयात्मक उद्देश असलेला कार्यक्रम
आमची ई अँड सी टीम Uber च्या धोरणांच्या दृष्टीने अनैतिक असलेले किंवा उल्लंघन करणारे आचरण रोखणे, शोधणे आणि त्याला प्रतिसाद देणे यासाठी धोरणे, प्रक्रिया आणि नियंत्रणांचा एक व्यापक आणि निरंतर कार्यक्रम निर्माण करण्यासाठी आणि तो कायम राखण्यासाठी Uber लीगलच्या सहकार्याने काम करत असते.
भ्रष्टाचार प्रतिबंधक आणि लाचलुचपतविरोधी
Engage lawfully with third parties and government officials.
हितसंबंधांचा संघर्ष
वैयक्तिक हितसंबंध व्यावसायिक कर्तव्यांमध्ये हस्तक्षेप करू शकतील अशा परिस्थिती टाळा.
Interaction with Public Officials
Comply with rules of engagement while interacting with public officials.
आरोग्यसेवा अनुपालन
फेडरल आणि राज्य कायद्यांचे आणि कराराच्या जबाबदाऱ्यांचे पालन करणे सुकर करा.
पुरवठा साखळी अनुपालन
पुरवठादार आणि तृतीय पक्षांना सचोटीसाठी शिक्षण देणे आणि तिचे मूल्यांकन करणे.
स्पर्धात्मक बुद्धिमत्ता
मार्केटमधील महत्त्वाची सखोल माहिती नैतिकतेने मिळवा.
ऑपरेशन्समधील अनुपालन
काम करण्याच्या स्टँडर्ड पद्धतींचे पालन करण्यास सक्षम करणे.
कर्मचार्यांचा सक्रिय सहभाग
सर्व कर्मचार्यांना “उभे रहा, बोला” यासाठी प्रोत्साहित करणे हा Uber च्या नीतिमत्ता आणि अनुपालन (ई अँड सी) कार्यक्रमाचा एक मुख्य घटक आहे:
एकमेकांना आणि एकमेकांसाठी. आम्ही एक समुदाय आहोत आणि आमचे हित यात आहे की आम्ही एका ध्येयासाठी मिळून काम करू: ते म्हणजे Uber चे यश. या समुदायाचे सदस्य या नात्याने आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे आणि टीमच्या सदस्याला गरज असेल तेव्हा त्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. एक संभाव्य त्रयस्थ दर्शक म्हणून Uber कर्मचार्यांच्या कोणत्या जबाबदार्या आहेत याची आम्ही त्यांना जाणीव करून देतो आणि हस्तक्षेप करणे, रिपोर्ट करणे किंवा चौकशीत सहाय्य करणे याचा सूड घेण्यास सक्त मनाई आहे याची हमी देतो.
Uber च्या अंतर्गत टीम्सना. आम्ही आमच्या सर्व टीम्सना एका नैतिक चौकटीत राहून त्यांच्या सहकाऱ्यांशी परस्पर-संवाद साधण्यास सक्षम करतो.
सचोटी हेल्पलाइनकडे. Uber ची सचोटी हेल्पलाइन बहुतेक भाषांमध्ये दिवसाचे 24 तास, वर्षातून 365 दिवस उपलब्ध आहे. फोनवर किंवा ऑनलाइन रिपोर्ट करता येते आणि निनावी राहून करता येते.
ज्यांनी स्वतःचे नैतिक शहाणपण आणि कायदेविषयक ज्ञान उंचावले आहे आणि कायम राखले आहे, अशा कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थापकांची आम्ही दखल घेतो. जेव्हा ते आवश्यक अनुपालन अभ्यासक्रम पूर्ण करतात, तेव्हा आम्ही या नैतिक योद्ध्यांना बॅज, विशेष कार्यक्रम आणि कार्यक्षमतेत सहाय्यतेच्या स्वरूपाने पुरस्कृत करतो.
सचोटी हेल्पलाइन
Uber ची सचोटी हेल्पलाइन ही कायद्याच्या किंवा कंपनीच्या अंतर्गत धोरणांच्या उल्लंघनाची गोपनीयपणे तक्रार करण्याची सेवा आहे. सचोटी हेल्पलाइन एका स्वतंत्र तृतीय पक्षाद्वारे होस्ट केली जाते आणि तक्रारी निनावीपणे केल्या जाऊ शकतात. येणाऱ्या तक्रारींची प्राथमिक तपासणी करून त्या चौकशीसाठी योग्य टीमकडे पाठवल्या जातात. सद्भावनेने केलेल्या तक्रारींचा कोणत्याही प्रकारे सूड उगवण्यास Uber परवानगी देत नाही.
सचोटी हेल्पलाइन कधी वापरावी
- भ्रष्टाचार किंवा लाचखोरी
- स्पर्धात्मकता-विरोधी किंवा मक्तेदारी कायद्याच्या विरोधातील कृत्ये
- लेखा किंवा लेखा परीक्षणातील अनियमितता
- खर्चाच्या अहवालातील घोटाळा
- भेदभाव, गुंडगिरी किंवा सूड उगवणे
- कामाच्या ठिकाणी छळ किंवा हिंसा
- चोरी किंवा फसवणूक
- इतर नैतिक किंवा धोरणांचे उल्लंघन
सचोटी हेल्पलाइन कधी वापरू नये
- ग्राहक सहाय्याचे माध्यम म्हणून
- ड्रायव्हर/डिलिव्हरी व्यक्तीच्या सहाय्याचे माध्यम म्हणून
- लोकपाल म्हणून
- जर तुम्ही Uber कडून डेटाची विनंती करणारे सरकारी अधिकारी असाल तर
- तुम्हाला Uber प्लॅटफॉर्ममधील असुरक्षित बाबींबद्दल रिपोर्ट करायचे असेल तर
आरोग्यसेवा अनुपालन
लागू असलेले आरोग्यसेवा आणि गोपनीयता कायदे व नियम तसेच फसवणूक, अपव्यय आणि गैरवर्तन (एफडब्ल्यूए) यांच्यासह फेडरल आरोग्यसेवा कार्यक्रमाच्या आवश्यकतांचे अनुपालन न करण्याची संशयित प्रकरणे रोखणे, शोधणे, त्यांचा तपास करणे, त्यांची तीव्रता कमी करणे आणि योग्य प्र कारे रिपोर्ट करणे यासाठी टीम्सना सक्षम करणे हे आरोग्यसेवा अनुपालनासाठी अनिवार्य आहे. Uber आरोग्य अनुपालन कार्यक्रम योजना लागू असलेल्या सर्व फेडरल आणि राज्य कायद्यांचे आणि करारात्मक दायित्वांचे पालन करण्याचा पुरस्कार करते. त्यात Uber च्या आरोग्यसेवा अनुपालन कार्यक्रमाच्या मुख्य घटकांची रूपरेषादेखील दिलेली आहेे.
व्यापार अनुपालन
आम्ही व्यवसाय करत असलेल्या प्रत्येक देशातील निर्यात, सीमा-शुल्क/आयात आणि बहिष्कारविरोधी अशा सर्व नियमांच्या बाबतीत जागतिक व्यापार नियंत्रणांचे पालन करण्यासाठी Uber वचनबद्ध आहे. आम्ही हे आमच्या बौद्धिक संपदा, वेगवेगळ्या देशांमधील ऑपरेशन्स, राष्ट्रीय सुरक्षा आणि उत्पादनांच्या गुणवत्तेच्या सुरक्षेसाठी हे करत असतो.
पुरवठा साखळी अनुपालन
Uber बरोबर व्यवसाय करण्याची आणि आमच्या मिशनमध्ये भागीदारी करण्याची एक पूर्वअट म्हणून, आमच्या पुरवठादारांनी सर्वकाळ योग्य कृती करणे या आमच्या वचनबद्धतेमध्ये सहभागी असावे अशी आमची अपेक्षा असते. आम्ही योग्य पुरवठादार निवडत आहोत हे सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही आमच्या साइन अप प्रक्रियेचा एक भाग म्हणून सर्व संभाव्य पुरवठादारांचे बारकाईने परीक्षण करतो. या परीक्षणात त्यांच्यासंबंधी जोखमीचे मूल्यांकन केले जाते आणि अनुपालनाच्या तसेच कायद्याच्या आणि सचोटीच्या मर्यादेत राहून काम करण्याच्या त्यांच्या पूर्वेतिहासाचे मूल्यांकन केले जाते.