योग्य कृती करणे. सर्वकाळ.
“हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की आपण काय साध्य करू हेच फक्त महत्त्वाचे नसते —तर आपण कसे यशस्वी होतो, आणि यशाच्या मार्गात आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आचरण कसे असते, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. सर्व Uber कर्मचार्यांनी सर्वकाळ विशिष्ट जबाबदार्या स्वीकाराव्यात आणि उच्च श्रेणीच्या सचोटीचे प्रदर्शन करावे, अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा असते.”
टोनी वेस्ट, मुख्य कायदा अधिकारी, Uber
नीतिमत्ता आणि सचोटी
Uber चे यश सुकर करणारा आणि सर्व कर्मचार्यांना आचरणात मार्गदर्शन करणारा एक विश्वसनीय भागीदार म्हणून सेवा देणे हे Uber च्या नीती आणि अनुपालन (ई अँड सी) टीमचे मिशन आहे. आम्ही हे या प्रकारे करतो:
- नैतिक कसोट्यांवर निर्णय घेण्याची संस्कृती वाढवणे आणि तिला सक्षम करणे
- सर्व लागू कायदे, धोरणे आणि नियमांचे पालन करण्यासाठी Uber च्या कर्मचार्यांना मार्गदर्शन देणे
&Enbsp; अनुपालन चॅम्पियन अचिव्हमेंट बॅज
एक निश्चयात्मक उद्देश असलेला कार्यक्रम
आमची ई अँड सी टीम Uber च्या धोरणांच्या दृष्टीने अनैतिक असलेले किंवा उल्लंघन करणारे आचरण रोखणे, शोधणे आणि त्याला प्रतिसाद देणे यासाठी धोरणे, प्रक्रिया आणि नियंत्रणांचा एक व्यापक आणि निरंतर कार्यक्रम निर्माण करण्यासाठी आणि तो कायम राखण्यासाठी Uber लीगलच्या सहकार्याने काम करत असते.
तृतीय पक्ष आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत कायदेशीररित्या गुंतणे.
वैयक्तिक हितसंबंध व्यावसायिक कर्तव्यांमध्ये हस्तक्षेप करू शकतील अशा परिस्थिती टाळा.
सार्वजनिक अधिकाऱ्यांशी संवाद साधताना प्रतिबद्धतेच्या नियमांचे पालन करा.
फेडरल आणि राज्य कायद्यांचे आणि कराराच्या जबाबदाऱ्यांचे पालन करणे सुकर करा.