Dublin Airport (DUB)
पारंपरिक Dublin Airport शटल किंवा टॅक्सीला पर्याय शोधत आहात? तुम्ही डब्लिन एयरपोर्टवरून शहराच्या मुख्य ठिकाणी जात असाल किंवा शहरातून डब्लिन एयरपोर्टकडे, तुम्हाला परिचित असलेल्या Uber ॲपसह तुम्हाला हवे तिथे पोहोचा. फक्त एक बटण टॅप करून DUB येथे जाण्यासाठी किंवा तेथून येण्यासाठी राईडची विनंती करा.
Collinstown, County Dublin,+353 1-814-1111
Request a ride around the world
आता एक बटण टॅप करून 700 हून अधिक प्रमुख केंद्रांवर एअरपोर्ट वाहतूक मिळवा.
एखाद्या स्थानिक व्यक्तीसारखेच फिरा
ॲपला आणि तुमच्या ड्रायव्हरला तपशील हाताळू द्या, जेणेकरून तुम्हाला अपरिचित शहरात रस्ते शोधावे लागणार नाहीत.
Uber सह घरच्यासारखे निवांत रहा
तुम्ही नवीन ठिकाणी असलात तरीही, रिअल-टाइम किंमत आणि कॅश फ्री पेमेंटसारखी तुमची आवडती वैशिष्ट्ये शोधा.
Ways to ride in the area
Pickup at Dublin Airport (DUB)
राईडची विनंती करण्यासाठी तुमचे अॅप उघडा
जेव्हा तुम्ही तयार असाल, तेव्हा तुमच्या अंतिम ठिकाणाकडे जाण्यासाठी राईडची विनंती करण्यासाठी Uber ॲप उघडा. तुमच्या समूहाचा आकार आणि सामानाच्या गरजेनुसार योग्य असलेला DUB एयरपोर्ट वाहतूक पर्याय निवडा.
ॲपमधील सूचनांचे पालन करा
तुम्हाला Dublin Airport पिकअप पॉइंट्सबद्दल थेट ॲपमध्ये दिशानिर्देश मिळतील. पिकअप लोकेशन्स टर्मिनलनुसार बदलू शकतात. राइडशेयर पिकअप चिन्हे Dublin Airport वरदेखील उपलब्ध असू शकतात.
तुमच्या ड्रायव्हरला भेटा
ॲपद्वारे निर्दिष्ट केल्यानुसार तुम्हाला दिलेल्या DUB पिकअप लोकेशनवर जा. कृपया नोंद घ्या: हे लोकेशन नेहमी तुमच्या सर्वांत जवळच्या बाहेरच्या जाण्याच्या मार्गाजवळ असेलच असे नाही. तुमच्या ड्रायव्हरचे नाव, लायसन्स प्लेट आणि कारचा रंग ॲपमध्ये दिसेल. आत जाण्यापूर्वी तुमच्या राईडची पडताळणी करा. तुम्हाला तुमचा ड्रायव्हर सापडत नसल्यास, ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा.
Top questions from riders
- Can you request a trip with Uber at Dublin Airport?
Uber is available at Dublin Airport, so you can enjoy a comfortable, convenient trip to wherever you need to go.
- Where is the Dublin Airport pick-up location for Uber?
Down Small To find your pick-up location, check the Uber app after you’ve requested a trip.
- How much is an Uber taxi fare for Dublin Airport?
Down Small Even if a trip is not very long, Uber rates to and from Dublin Airport may still be affected by time, traffic and other factors. Parking charges and airport fees might also be added to your final trip price.
- Uber द्वारे पिकअप करायला किती वेळ लागेल?
Down Small Pick-up timing can vary based on the time of day, how many drivers are on the road, and more. Once you’ve requested your trip, check the app for an estimated waiting time.
More information
Uber सह गाडी चालवताय?
रायडर्सना कुठून पिकअप करायचे यापासून ते स्थानिक नियम आणि कायदे पाळण्यापर्यंत, तुमच्या एअरपोर्ट ट्रिप्स अधिक चांगल्या कशा करता येतील ते शोधा.
वेगळ्या एअरपोर्टवर जात आहात का?
जगभरातील 700 पेक्षा अधिक एअरपोर्ट्सवर ड्रॉप ऑफ आणि पिकअप मिळवा.
Dublin Airport terminals
DUB विमानतळावर आगमन होणाऱ्या किंवा तिथून उड्डाण करणाऱ्या पर्यटकांसाठी Uber एक आदर्श पर्याय आहे. डब्लिन विमानतळ दरवर्षी 2 कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा पुरवणारे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्यामुळे ते युरोपमधील सर्वात व्यस्त वाहतुकीच्या केंद्रांपैकी एक बनते आहे. डब्लिन विमानतळ डब्लिन शहराच्या मध्यभागाच्या उत्तरेस 10 किलोमीटर (6 मैल) अंतरावर आहे, एम 1 आणि एम 50 मोटरवेजच्या जवळ आहे आणि तिथे कार, बस, टॅक्सी, शटल किंवा Uber द्वारे सहजपणे जाता येते.
डब्लिन विमानतळ टर्मिनल्स
डब्लिन विमानतळाला 2 मुख्य टर्मिनल्सद्वारे सेवा दिली जाते: टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2. टर्मिनल 2 उल्लेखनीय आहे, कारण त्यामध्ये युएस प्री-क्लीयरन्स सुविधा आहेत, ज्याद्वारे तुम्हाला डब्लिनमध्ये असतानाच युएस कस्टम चेक्स आणि पासपोर्ट नियंत्रण करून घेता येते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही अमेरिकेत पोहोचाल तेव्हा ते तुम्ही देशांतर्गत हवाई प्रवास केल्यासारखे असेल, ज्यातून तुम्हाला बराच वेळ आणि दीर्घ प्रतीक्षेचा ताण वाचवता येईल.
टर्मिनल 1
- एअर कॅनडा
- कॅथे पॅसिफिक
- केएलएम
- रायनएअर
- स्विस
टर्मिनल 2
- एर लिंगस
- अमेरिकन
- डेल्टा
- एमिरेट्स
डब्लिन विमानतळ रेस्टॉरन्ट्स
तुमच्या फ्लाइटपूर्वी तुम्हाला आरामदायी जागा शोधायची असेल किंवा तुम्हाला रोजची कॉफी हवी असेल तर डब्लिन विमानतळावर रेस्टॉरंट्स एक्सप्लोर करण्यासाठी निवडीला खूप वाव आहे. टर्मिनल 1 मध्ये, तुम्ही राइट्स ऑफ होथ येथून शाही आयरिश भोजन घेऊ शकता, तर टर्मिनल 2 मधील गोर्मे बर्गर किचन फ्लाइट पूर्वीच्या जेवणासाठी आदर्श आहे. डब्लिन विमानतळाच्या बार्समध्येसुद्धा निवडीला खूप वाव आहे.
DUB विमानतळावर फिरणे
डब्लिन विमानतळ सहज चालण्यायोग्य आहे, तर विनामूल्य शटल टी1 आणि टी2 ला जोडते.
डब्लिन विमानतळावर करण्याच्या गोष्टी
डब्लिन विमानतळावरील दुकानांमध्ये 100 हून अधिक ब्रँड्स उपलब्ध असून अगदी चिकित्सक खरेदीदारांसाठीसुद्धा निवडीला भरपूर वाव आहे. टर्मिनल 1 आणि 2 मधील लूपमध्ये जो-मॅलोन आणि चॅनेलपासून डायर आणि मॅकपर्यंत जगातील नामांकित स्टोअर्सचे प्रचंड पर्याय आहेत. आणि विमानतळ ड्युटी-फ्री असल्याने, खरेदीदार मोठ्या सवलतीची अपेक्षा करू शकतात. काही वस्तू विमानतळाबाहेरील वस्तूंपेक्षा 40% पर्यंत स्वस्त असू शकतात.
डब्लिन विमानतळ शॉवर्स
बहुतांशी प्रवाशांसाठी शॉवर्स उपलब्ध नसले तरीही विमानतळावरील एक लाउंजमधून डब्लिन एअरपोर्टच्या शॉवर्सकडे जाता येतेे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या उड्डाणापूर्वी किंवा उड्डाणानंतर ताजेतवाने होऊ शकाल.
डब्लिन विमानतळाजवळील हॉटेल्स
विमानतळाच्या आसपासच्या भागात अतिथींना कित्येक डब्लिन विमानतळ हॉटेल्स आढळू शकतात आणि पहाटेच्या वेळी आयर्लंडमध्ये दाखल होणाऱ्यांसाठी तो उत्कृष्ट पर्याय आहे. जे लोक डब्लिनमध्ये अधिक दूर जाऊ शकतात, त्यांच्यासाठी निवासाच्या स्वस्त आणि महाग पर्यायांची व्यापक श्रेणी उपलब्ध आहे.
डब्लिन विमानतळाजवळची आवडीची ठिकाणे
जर तुम्ही डब्लिन विमानतळावर एखाद्या लेओव्हरवर असाल तर जवळपासच्या भागात बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आणि करण्यासारख्या आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्रवासाला लागणाऱ्या वेळामुळे (सुमारे 40 मिनिटे ते एक तास), तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर उत्तम. डब्लिन शहराच्या मध्यभागी, पहाण्यासासारखी बरीच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे आहेत, जसे की:
- डब्लिन कॅसल
- गिनीज स्टोअरहाऊस
- आयरिश व्हिस्की संग्रहालय
- किल्मेनहॅम जेल
- रिचमंड बॅरेक्स
डब्लिन आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल येथेअधिक माहिती मिळवा.
This page contains information from third-party websites that are not under the control of Uber and that may be periodically changed or updated. Any information included on this page that is not directly related to Uber or its operations is for informational purposes only and in no way shall be relied upon, or interpreted or construed to create any warranties of any kind, either express or implied, regarding the information contained herein. Certain requirements and features vary by country, region, and city.
याविषयी