मुख्य सामग्रीवर जा

टोकियो हानेदा इंटरनॅशनल एयरपोर्ट (HND)

पारंपरिक हानेदा एयरपोर्ट शटल किंवा टॅक्सीला पर्याय शोधत आहात? तुम्ही HND एयरपोर्टवरून टोकियो स्टेशनला जात असाल किंवा शिंजुकू ते हानेदा एयरपोर्टला, तुम्हाला परिचित असलेल्या Uber ॲपसह तुम्हाला हवे तिथे पोहोचा. फक्त एक बटण टॅप करून HND येथे जाण्यासाठी किंवा तेथून येण्यासाठी राईडची विनंती करा.

4-3 Haneda-Kuko, 2-Chome, Ota-Ku, टोकियो 144, Japan
+81 3-5757-8111

प्रवास करण्याचा एक स्मार्ट मार्ग

जगभरात कुठेही राईडची विनंती करा

फक्त एक बटण दाबा आणि 500 हून अधिक प्रमुख हब्जवरून एयरपोर्टकरता वाहतूक सुविधा मिळवा.

एखाद्या स्थानिक व्यक्तीसारखेच फिरा

ॲपला आणि तुमच्या ड्रायव्हरला तपशील हाताळू द्या, जेणेकरून तुम्हाला अनोळखी शहरात रस्ते शोधत बसावे लागणार नाही.

Uber सह निवांत रहा

तुम्ही नवीन ठिकाणी असलात तरीही, प्रत्यक्ष त्यावेळचे किंमत निर्धारण आणि रोख रकमेविना पेमेंटसारखी तुमची आवडती वैशिष्ट्ये शोधा.

भागामध्ये राईड करण्याचे मार्ग

 • Taxi

  1-4

  Get matched with a taxi nearby. Booking fee will be charged separately (maximum JPY 420)

हानेदा एयरपोर्ट (HND) येथे पिकअप

तुम्ही बाहेर जाण्यासाठी तयार असाल तेव्हा विनंती करा

जेव्हा तुम्ही तयार असाल, तेव्हा तुमच्या अंतिम ठिकाणाकडे जाण्यासाठी राईडची विनंती करण्यासाठी Uber ॲप उघडा. तुमच्या समूहाचा आकार आणि सामानाच्या गरजेनुसार योग्य असलेला HND एयरपोर्ट वाहतूक पर्याय निवडा.

आगमन लेव्हलवरून बाहेर पडा

तुम्हाला हानेदा एयरपोर्ट पिकअप पॉइंट्सबद्दल थेट ॲपमध्ये दिशानिर्देश मिळतील. पिकअप लोकेशन्स टर्मिनलनुसार बदलू शकतात. पिकअप चिन्हे टोकियो हानेदा इंटरनॅशनल एयरपोर्ट वरदेखील उपलब्ध असू शकतात.

तुमच्या ड्रायव्हरला भेटा

ॲपद्वारे निर्दिष्ट केल्यानुसार तुम्हाला दिलेल्या HND पिकअप लोकेशनवर जा. कृपया नोंद घ्या: हे लोकेशन नेहमी तुमच्या सर्वांत जवळच्या बाहेरच्या जाण्याच्या मार्गाजवळ असेलच असे नाही. तुमच्या ड्रायव्हरचे नाव, लायसन्स प्लेट आणि कारचा रंग ॲपमध्ये दिसेल. आत जाण्यापूर्वी तुमच्या राईडची पडताळणी करा. तुम्हाला तुमचा ड्रायव्हर सापडत नसल्यास, ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधा.

हानेदा एयरपोर्ट नकाशा

हानेदा एयरपोर्ट 3 टर्मिनल्समध्ये विभागलेले आहे: इंटरनॅशनल टर्मिनल आणि डोमेस्टिक टर्मिनल्स 1 आणि 2.

फिरत असतानादेखील कनेक्टेड रहा

HND मधील वायफायशी कसे कनेक्ट करावे

तुम्ही हानेदा एयरपोर्टवरील मोफत वायफायला कनेक्ट करू शकता. वायफाय नेटवर्क्समधून HANEDA-FREE-WIFI निवडा, नंतर तुमचा ब्राउझर लाँच करा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.

स्थानिक सिमकार्ड घ्या

तुम्ही इंटरनॅशनल पॅसेंजर टर्मिनलच्या लेव्हल 2 वरील आगमन लॉबीमध्ये प्रीपेड सिमकार्ड खरेदी करू शकता.

डोमेस्टिक पॅसेंजर टर्मिनल्स 1 आणि 2 वर प्रीपेड सिमकार्ड्स विक्रीसाठी उपलब्ध नाहीत.

जपानमध्ये जपानी नसलेल्या रहिवाशांसाठी उपलब्ध असलेली प्रीपेड सिमकार्ड्स केवळ डेटा कम्युनिकेशनसाठी आहेत. जपानी कायद्यानुसार, जपानी नसलेले रहिवासी व्हॉइस कॉलला अनुमती देणारी सिमकार्ड्स खरेदी करू शकत नाहीत.

अधिक माहिती

वेगळ्या विमानतळावर जात आहात का?

जगभरातील 600 पेक्षा अधिक विमानतळांवर पोहचवणे आणि विमानतळांवरून पिकअप करणे सोयीचा फायदा घ्या.

हानेदा एयरपोर्ट अभ्यागत माहिती

टोकियोमधील महत्त्वाच्या 2 एयरपोर्ट्सपैकी एक असलेले हानेदा एयरपोर्ट हे जपानचे सर्वात व्यस्त एयरपोर्ट आहे. हे एयरपोर्ट टोकियो आणि लगतच्या विस्तारित क्षेत्राला सेवा पुरवते. याच्या समकक्ष असणाऱ्या नारिता एयरपोर्टपेक्षा हे अधिक सोयीस्कर आहे, कारण हानेदा एयरपोर्ट टोकियोच्या मध्यवर्ती भागापासून फक्त 25-मिनिटांच्या कार राईडइतक्या अंतरावर आहे.

हानेदा एयरपोर्ट टर्मिनल्स

या एयरपोर्टचे इंटरनॅशनल टर्मिनल आणि डोमेस्टिक टर्मिनल असे दोन भाग आहेत. सर्व इंटरनॅशनल फ्लाइट्स हानेदा इंटरनॅशनल पॅसेंजर टर्मिनलमधून असतात, तर डोमेस्टिक फ्लाइट्स टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 यांच्यामध्‍ये विभागल्या जातात.

हानेदा एयरपोर्ट टर्मिनल 1

 • JAL
 • जपान ट्रान्सओशन एअर
 • स्कायमार्क
 • स्टार फ्लायर (किताक्युशू आणि फुकुओका या एयरपोर्ट्ससाठी फ्लाइट्स)

हानेदा एयरपोर्ट टर्मिनल 2

 • AIRDO
 • ANA
 • सोलासीड
 • स्टार फ्लायर (यामागुची-उबे आणि कानसाई एयरपोर्ट्ससाठी फ्लाइट्स)

हानेदा एयरपोर्ट परिसरातील प्रवास

हे एयरपोर्ट मोफत शटल बस सेवा पुरवते. डोमेस्टिक टर्मिनल्स आणि तुलनेने छोटे इंटरनॅशनल पॅसेंजर टर्मिनल यांच्यादरम्यान दर 4 मिनिटांनी शटल बसेस धावत असतात.

हानेदा एयरपोर्टवर चलन विनिमय

इंटरनॅशनल पॅसेंजर टर्मिनलच्या प्रस्थान लॉबीमध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर 24 तास चलन विनिमय केंद्रे उपलब्ध आहेत. इंटरनॅशनल प्रस्थान क्षेत्रात आणखी 2 चलन विनिमय केंद्रे आहेत.

हानेदा एयरपोर्टजवळील हॉटेल्स

तुम्हाला मोठ्या लेओव्हरसाठी किंवा फ्लाइटला झालेल्या विलंबामुळे रात्रीच्या वेळी राहण्यासाठी हॉटेलची गरज असल्यास, तुम्ही एयरपोर्टवरील हॉटेल तसेच जवळपास असलेली 30 हून अधिक हॉटेल्स आणि निवास व्यवस्था तपासू शकता.

हानेदा एयरपोर्ट (HND) बद्दल अधिक माहिती येथे शोधा.

फेसबुक

या पृष्ठामध्ये तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्सवरील माहिती समाविष्ट आहे जी Uber च्या नियंत्रणाखाली नाही आणि ती वेळोवेळी बदलली किंवा अपडेट केली जाऊ शकते. Uber शी किंवा त्याच्या कार्यांशी थेट संबंधित नसलेली या पृष्ठावर समाविष्ट असलेली कोणतीही माहिती ही केवळ माहितीच्या उद्देशांनी दिली आहे आणि येथे समावेश असलेल्या माहितीच्या संदर्भात व्यक्त किंवा सूचित केलेल्या कोणत्याही प्रकारच्या हमी तयार करण्यासाठी या माहितीवर कोणत्याही प्रकारे विसंबून राहू शकत नाही किंवा त्याचा अर्थ लावला जाणार नाही किंवा त्याचे विश्लेषण केले जाणार नाही. देश, प्रदेश आणि शहरानुसार विशिष्ट आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात. प्रोमो सवलत ही केवळ नवीन वापरकर्त्यांसाठी वैध आहे. ही प्रमोशन इतर ऑफर्ससह एकत्रित केली जाऊ शकत नाही आणि टिपांवर लागू होऊ शकत नाही. मर्यादित उपलब्धता. ऑफर आणि अटी बदलांच्या अधीन आहेत.