मुख्य सामग्रीवर जा
न्यूयॉर्क सिटीCircle x  मधील पात्र वाहने

या पृष्ठावरील माहिती फक्त सुविधेसाठी आहे. सर्व वाहनांनी Uber च्या वाहन आवश्यकता पृष्ठावरील तुमच्या भागासाठीच्या आवश्यकतांचे आणि यादीतील राईड पर्यायासाठीच्या आवश्यकतांचे पालन करणे आवश्यक आहे (उदाहरणार्थ, UberX करता किमान 5 सीट्स आणि 4 दरवाजे आवश्यक आहेत; UberXL करता किमान 7 सीट्स आणि 4 दरवाजे आवश्यक आहेत). एखाद्या वाहनाचे मॉडेल खालील यादीत दिसत असल्यास पण तुमच्या भागातील राईड पर्यायांसाठी वाहनांच्या आवश्यकता पूर्ण करत नसल्यास, ते वाहन तुमच्या भागात वापरण्यासाठी पात्र नसेल. वरील निकषांची पूर्तता करण्याव्यतिरिक्त, न्यूयॉर्कमधील सर्व वाहने आणि ड्रायव्हर्सना एनवायसी टॅक्सी आणि लिमोझिन कमिशनने लायसन्स दिलेले असणे आवश्यक आहे.

टीप: खाली प्रत्येक वाहनासाठी सूचीबद्ध केलेले वर्ष त्या राईड पर्यायासाठी परवानगी असलेले सर्वात जुने वाहन वर्ष दर्शवते. हे साधारणपणे दरवर्षी एक वर्षाने वाढते. UberX साठी पात्र असलेली मॉडेल्स Uber कनेक्ट, Uber Pet आणि UberX Share साठीसुद्धा पात्र आहेत. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन मॉडेल्ससुद्धा Uber Green साठी पात्र आहेत. Uber Black, Uber Comfort, Uber Comfort इलेक्ट्रिक आणि Uber Premier या पर्यायांसाठीच्या पात्रता ड्रायव्हर रेटिंग तसेच लेगरूम आणि बाह्य/आतील रंग यासारख्या घटकांवरदेखील अवलंबून असतात. एनवायसी टॅक्सी आणि लिमोझिन कमिशनची व्हीलचेअरने ॲक्सेस करण्यायोग्य वाहनांची तपासणी पास करणारी वाहने Uber WAV राईड पर्यायांसाठी पात्र आहेत. एखादे वाहन पात्र आहे की नाही याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास, Uber सहाय्याशी किंवा तुमच्या स्थानिक ग्रीनलाइट हबशी संपर्क साधा. राईड पर्यायांची उपलब्धता शहरानुसार बदलते.

Search