Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

सर्व ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींचे‍ आभार

महामारीदरम्यान हजारो ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्ती जे काही महत्त्वाचे आहे त्याची वाहतूक करत राहिले.

रायडर्स आणि फूड डिलिव्हरी ग्राहक त्यांच्या ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींसह नियमितपणे जगभरात आपले आभार शेअर करतात. आम्ही जगभरातल्या प्रभाव टाकणाऱ्या काही ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींविषयीची ही संभाषणे भित्तीचित्रांसह जिवंत केली.

क्रिस्टिन, फ्लोरिडा, यूएस

फ्लोरिडामध्ये सुट्टीवर असलेलेले एक रायडर अँड्र्यू यांची पत्नी सुझॅनला गरोदरपणाच्या अर्ध्यातच बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर थोड्याच वेळाने त्यांची क्रिस्टिनशी भेट झाली.

क्रिस्टिनने त्यांना काही कपडे धुण्यासाठी लॉन्ड्रोमॅटकडे गाडी चालवत आणले. अँड्र्यूने त्यांना आपली कहाणी सांगितली आणि हा फक्त एकदाच केलेला प्रवास न राहता क्रिस्टिन त्याही पलीकडे गेल्या. सुझॅन रूग्णालयात असताना त्यांनी जोडप्यास आधार देणारी यंत्रणा म्हणून काम केले. घरी शिजवलेले जेवण आणि त्या जोडप्यास आवश्यक असणारी कोणतीही वस्तू पोचती केली. अँड्र्यू म्हणतात,“आमचा रूग्णालयात 10 आठवड्यांचा मुक्काम असेपर्यंत त्यांनी आम्हाला दत्तक घेतले."

“मला वाटतं माझ्या आयुष्यात क्रिस्टिन इतकी असामान्य दयाळू आणि उदार व्यक्ती मी बघितली नाही.” -अँड्र्यू, रायडर

मिशेल, मँचेस्टर, यूके

मिशेल ह्या इंग्लंडच्या मँचेस्टर येथे कुरियर आहेत. एक आई आणि 5 मुलांची काळजी घेणारी पालक म्हणून, त्यांना त्यांचा "स्वतःसाठीचा वेळ" म्हणून घराबाहेर पडून इतर लोकांना भेटण्यासाठी ड्रायव्हर अ‍ॅपचा वापर करणे आवडते. त्या म्हणतात, “लॉकडाऊनदरम्यान माझे बरेच वयस्कर ग्राहक होते." “मी जेवण दाराजवळच ठेवून त्यांनी ते आत घेण्याची वाट बघत दूर उभी राहत असे. आणि त्यांना केवळ थोडयाशा गप्पा मारायला आवडे, कारण कदाचित त्यांची कुणाशी भेट झालेली नसावी. तर मी ते करते: मी थांबते आणि मी गप्पा मारते.”

मिशेलने मँचेस्टरच्या लोकांच्या दारापर्यंत जेवण पोचवताना आपल्या उत्साही व्यक्तिमत्त्व आणि बडबड्या स्वभावाने त्यांना आनंदित केले आहे. धन्यवाद, मिशेल.

जसविंदर, चंदीगड, भारत

Uber सह गाडी चालवतानाच जसविंदर त्यांच्या कुटुंबाच्या शेतातली कामेदेखील करतात. आणि त्यांनी, गाडी चालवण्याच्या आपल्या 5 वर्षाहून अधिक काळात भारतातील कोणत्याही ड्रायव्हरपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 32,000 ट्रिप्स केल्या आहेत. ड्रायव्हर अॅपचा उपयोग करून, ते खर्च हाताळू शकले आहेत आणि आपल्या कुटुंबासाठी अधिक आरामदायक जीवनशैली तयार करू शकले आहेत. ते म्हणतात,“Uber सह गाडी चालवल्याने मला अभिमान वाटतो." "मी माझ्या स्वत:च्या नियमांनुसार गाडी चालवत माझा स्वतःचा व्यवसाय बघतो." धन्यवाद, जसविंदर.

जसविंदर म्हणतात,“Uber सह गाडी चालवल्याने मला अभिमान वाटतो." "मी माझ्या स्वत:च्या नियमांनुसार गाडी चालवत माझा स्वतःचा व्यवसाय बघतो."

क्रिस्टिन, मिशेल आणि जसविंदर ही Uber सह गाडी चालवणाऱ्या आणि डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींची काही उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या दैनंदिन संवादातून इतरांसाठी कायमच्या आठवणी निर्माण केल्या आहेत. त्यांच्या भित्तीचित्रांनी थोड्या काळासाठी न्यूयॉर्क, लंडन आणि मँचेस्टरमधील इमारतींची बाजू व्यापली होती. यापुढेही बराच काळ, जगभरात तुमचे आभार मानणे सुरू राहील.

तुम्ही आभार मानू इच्छिता अशी एखादी ड्रायव्हर किंवा डिलिव्हरी व्यक्ती आहे का? तुमचा रोजचा एव्हरीडे जायंटयेथेनामांकित करा.

आमच्या प्रभाव कार्याबद्दल अधिक वाचा

आमच्या वचनबद्धता

सर्वांसाठी हालचाल समान करत आहोत.

कृष्णवर्णीयांचे व्यवसाय महत्त्वाचे आहेत

कृष्णवर्णीयांच्या व्यवसायांना जगभरात सहाय्य करत आहोत.

काम करण्याचा एक अधिक चांगला मार्ग

जगभरातील ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी सहाय्य करत आहोत.